Skip to main content

ब्रेकिंग न्यूज : जपानमध्ये सुनामीचा तडाखा

लेखक सागर यांनी शुक्रवार, 11/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सीएनएन वाहीनीचा दुवा बीबीसी वाहीनीचा दुवा ८.८ रिश्टर स्केल चा भुकंप झाला आणि या सुनामीने हाहाकार सुरु केला. आत्ताच लाईव्ह फुटेज न्यूज चॅनेलवर पाहिलेत.
From General
जपान मध्ये वास्तव्य करणार्‍या सदस्यांनी काळजी घ्यावी

वाचने 11113
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

संपादित करता येत नाहिये म्हणून इथे देतोय भूकंप ८.९ रिश्टर स्केलचा आहे

आधी ७.९ चा सांगत होते. मग ८.८ चा सांगायला लागले. आता ८.९ म्हणत आहेत. जे काही टीव्हीवर दाखवत आहेत ते भयानक आहे. एक आख्खे गाव वाहुन गेले. पाण्याच्या तडाख्यात घरं, बोटी, इंडस्ट्रियल शेड्स सगळेच्या सगळे वाहुन गेले आहे.

श्री. सुनिल पाटिल - http://misalpav.com/user/13796/guestbook हे मिपाचे सदस्य सध्या टोकियो येथे असतात. आपण सगळे त्यांच्यासाठी तसेच या आपत्तित सापडलेल्या सगळ्यांच्याच सुरक्षित असण्यासाठी प्रार्थना करु.

माझे एक नातेवाइक शेप कार्पोरेशन मध्ये आहेत. ते निट अस्तिल न?

In reply to by पिलीयन रायडर

जपान सरकारने २ दिवस आधीच ही माहीती / पुर्वसुचना प्रसारीत केली होती. मी सुद्धा काल याहुवर वाचली होती. त्यांना ही आधीच माहिती असेल.

रक्षण कर बाबा लो़कान्च !!

या भयानक नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या सर्व जपानी नागरिकांना सावरण्यासाठी सर्वतोपरी मनोबल मिळे, साहाय्य मिळो, अशी मनापासून पार्थना.. जपानी माणूस हा मुळातच अत्यंत चिवट व कष्टाळू असल्यामुळे तो या आपत्तीतून लौकरात लौकर उभा राहील याची खात्री आहेच.. सर्व जपान्यांकरता ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.. तात्या.

सुनामीची दृष्ये तर अंगावर शहारे आणणारी आहेत. एका जपानी न्यूज चॅनेलवर तर प्रत्यक्ष भूकंपाचे हादरे बसू लागल्यावर तिथे माजलेल्या गोंधळाचे दृष्य दाखवित होते त्यावेळेची परिस्थिती पाहता रिश्टर (की रिक्टर) स्केलवर तो किती तीव्र असेल याची काहीसा अंदाज आला. आता तर सुनामी तैवान, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या मार्गावर आहे असे वारंवार जाहीर केले जात आहे. इन्द्रा

In reply to by अविनाशकुलकर्णी

आँ. दरवर्षी या तीव्रतेचा १ भूकंप होतो असे म्हणतात. मिपाकर किंवा त्यांचे नातेवाईक सुखरूप असावेत अशी आशा करतो.

सध्या गुगलच्या मेनपेजवर हे लिहुन येत आहे :- Tsunami Alert for New Zealand, the Philippines, Indonesia, Papua New Guinea, Hawaii, and others. Waves expected over the next few hours, caused by 8.9 earthquake in Japan.

भूकंपाची अनेक दृष्ये टी. व्ही. वर दिसली ती भयानक आहेत. सेंदाई शहराच्या जवळ समुद्रात भूकंपकेंद्र होते. ह्या शहरातील एन. एच. के. च्या टी. व्ही. केंद्राच्या ऑफिसातील दृष्ये, त्याच्या बाहेरील रस्त्यावरील दृष्ये, तोक्योमधील बहुधा संसद असावे (अधिवेशन सुरू होते) अशा स्थळातील दृष्ये... सगळे जोरदार हलत आहे, शेल्फमधून वस्तू खाली पडत आहेत, क्यूबिकल्सच्या पार्टिशनवर ठेवलेले एल. सी. डी. मॉनिटर्स धडपडत आहेत, एका सुमरमार्केटमधील शेल्फ्स हलत राहिल्याने सामान खाली पडत आहे.... ह्या सर्वात तेथील माणसे शांत आहेत, ऑफिसातील तसेच सुपरमार्केटातील बहुतेक सर्व जण धडपडणार्‍या शेल्फ्स अथवा पार्टिशन्सना पकडून ठेऊन पडू न देण्याच्या प्रयत्नात आहेत.. अशा प्रसंगी जनतेने काय करावे ह्या सूचना दिल्या असल्याने शिस्तीने त्याचे ते लोक पालन करीत असणार.... इतके सर्व होउनही लोक उंदरांसारखे सैरावैरा पळत सुटलेले दिसत नाहीत..... पण त्सुमानीची दृष्ये, विशेषतः हेलिकॉप्टरमधून घेतलेले शॉट्स अत्यंत हृदयद्रावक होते. हळूहळू पाण्याची प्रचंड लाट पुढे सरकत येत आहे (१० मी. पेक्षा उंच होती असे सांगितले जाते), त्या लाटेने वाटेतील जे काही असेल ते गिळंकृत करण्याचा सपाटा चालवला आहे. गाड्या, घरे, सगळे क्षुल्लक होऊन लाटेबरोबर पुढे ढकलले जात आहे.... अगदी मोठ्या बोटी, सेलबोटी... सगळ्या आडव्यातिडव्या होऊन लाटेबरोबर खेचल्या गेल्या आहेत.... शहराच्या एका रस्त्यावरून एक- दोन गाड्या चाललेल्या आहेत. वरून दिसते आहे, की लाट जवळ येतांना आकांताने त्या गाड्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण लाट जिंकते, गाड्या क्षणार्धात खेचल्या जातात, पराभूत होतात. हे सगळे पाहिले ते अगदी विदीर्ण करणारे आहे. आपण माणसे निसर्गापुढे किती चिल्लर असतो, ह्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. ही खरे तर 'थंड धारदार सुरी'.. निसर्गाने मानवनिर्मीत जगावर चालवलेली. रिक्स्टर स्केलवर ८.९ क्षमतेचा हा भूकंप जपानमधे गेल्या १४० वर्षांपासून भूकंपाचे मोजमाप करावयास लागले तेव्हापासून सर्वात मोठा आहे, असे सांगितले जात आहे. तात्यांनी म्हटल्याप्रमाणे जपानी माणसे कष्टाळू व हुशार तर आहेतच (म्हणूनच त्यांनी घरे भूकंपाचा विचार करून बनवलेली आहेत), पण शिस्तप्रियही आहेत. आता व ह्यापुढील काळांत आपल्याल्या त्याचे प्रत्यंतर येत राहील. 'वाहून गेलेल्या दशका'तून नुकताच कुठे वर उठत असलेला हा देश ह्या दुर्घटनेमुळे आर्थिकदृष्ट्या पुन्हा मार खाणार आहे. जपान्यांना ह्या आपत्तितून अजून सक्षम होऊन, लवकर वर उठायची प्रेरणा मिळो.

In reply to by प्रदीप

आताच पाहिल खरच भयंकर प्रकार आहे हा.
आपण माणसे निसर्गापुढे किती चिल्लर असतो, ह्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.
अगदी.

In reply to by प्रदीप

वर प्रदीप यांनी वर्णन केले आहेच, त्यात अजून एक भर म्हणजे तेथी अणूशक्ती केंद्राना लागलेली आग आणि कुलींग सिस्टीम नीट न चालल्याने तयार झालेला धोका. जपान सरकारने हे होण्याआधीच अणूशक्तीसंदर्भात आणीबाणी जाहीर केल्याने, भूकंपक्षेत्रातली चार आण्विक शक्ती केंद्रे बंद करण्यात आली होती. तरी देखील आग लागल्याने तेथील ३ किमी त्रिज्ज्येतील रहीवाशांना त्याबाहेर जाण्यास सांगितले आणि ३-१० किमी मधील रहीवाशांना घरातच रहायला सांगितले. आता देखील जरी धोका टळला असे तज्ञ म्हणत असले तरी रहीवाशांसाठी स्पष्टपणे सुचना बदलल्या गेलेल्या नाहीत. या संदर्भात जैतापूरचा प्रकल्प जर होणारच असेल तर अधिक विचारपूर्वक होउंदेत - इंजिनियरींग डीझाईन, आपत्कालीन व्यवस्थेचे धोरण आणि स्थानिक जनतेस त्याचे शिक्षण, सराव वगैरे करणे महत्वाचे आहे असेच वाटते. म्हणूनच त्यांनी घरे भूकंपाचा विचार करून बनवलेली आहेत हवाई मध्ये या संदर्भात "व्हर्टीकल इवॅक्युएशन" हा नवीनच शब्द ऐकला. म्हणजे तिथल्या त्सुनामीप्रवण क्षेत्रातील इमरातींचे पहीले दोन मजले हे पाणी येईल आणि सर्व खराब होऊ शकेल हे गृहीत धरूनच बांधलेले असतात. पण बाकी बिल्डींग डीझाईन हे भूकंपाचा तडाखा सहन करू शकणारे केलेले असते. म्हणून धोक्याची सूचना मिळताच तेथील रहीवाशांना अशा धोक्याच्या प्रसंगी वरील मजल्यांवर हलवले जाते.

फार फार फार फार वाईट वाटले . गहीवरुन आले. - ( देवा मला जिवंत ठेव रे) टारझन कसं का असेना , मी जिवंत राहिलो पाहिजे. असं निसर्गाचं रुप पाहुन घाबरलोय

जगबुडी होईल असे वाटत आहे.. लवकरच चंगळ्वाद सुरु करावा म्हणतोय :)

In reply to by पिवळा डांबिस

येलो, टेक केअर मॅन. टारुबाळासारख्यानी थोडे प्रसंगावधान राखून बोलणे केले असते तर अजून काय हवे होते ? पण असोच.

In reply to by मुक्तसुनीत

टार्‍याच्या प्रतिक्रियांबाबत मुसुंशी सहमत आहे. पिडाकाकांना काळजी घ्या म्हणतो.

In reply to by आनंदयात्री

त्सुनामी येऊन गेली सुद्धा!! पण म्हणे समुद्राला त्यावेळेस ओहोटी होती म्हणून त्सुनामीला कायसुद्धा ड्रामा करता आला नाय! :( टार्‍याच्या प्रतिक्रियांबाबत मुसुंशी सहमत आहे. "शुभ बोल रे टार्‍या, तर पिडांकाका बुडाला त्सुनामीत!!!" आयडी बदलला म्हणून मूळ स्वभाव थोडीच जातो? :)

In reply to by पिवळा डांबिस

म्हण आवडली :) बाकी प्रतिक्रीयेचं तात्पर्य फक्त एवढंच होतं , की जर त्सुणामी आला , तर आपण सगळे हेल्पलेस आहोत . काही करु शकत नाही बघा. त्यामुळे जेवढं जगु हसत खेळत जगु असा आमचा षिंपल फंडा होता. :) बाकी आनंदयात्री आणि मुसु ह्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करुन आटोपतो. - मुक्तसुनामी

भयंकर आहे... त्या सर्व लोकांना मनोबल आणि आवश्यक मदत लवकरात लवकर मिळो...हे सगळं बघून डोकं अक्षरशः सुन्न झालंय. :(

ह्या भयानक अनुभवातुन अजुन बाहेर आलो नाहि आहोत.. दर ५ मि. अजुन धक्के बसत आहेत.... धीरा बद्दल आभार....

फार भयानक !!! :( परमेश्वर तेथील लोकांना या आपत्तीस तोंड देण्यास मनोबल देवो. सर्व जपानी लोकांच्या सुरक्षतेसाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो... आता जपान आणि जपानी जनतेला सर्वात मोठा धोका न्युक्लियर रिअ‍ॅक्टर मधुन होणार्‍या गळतीचा आहे, फुकुशिमा दायची प्लांट मधील उत्सर्जन पातळी, त्याच्या सामान्य पातळीच्या १००० पटीने वाढली आहे. या प्लांटच्या १० किमी मधील परिसर खाली करण्यात यावा असे जपानी पंतप्रधानांनी सांगितले आहे. जे कोणी जपान स्थित मिपाकर आहेत ते सुखरुप असावेत अशी आशा करतो, त्यांची आम्हाला काळजी वाटत आहे.

जे होवु नये असे वाटत होते तेच झाले, जपान मधे फुकुशिमा येथील आण्विक केंद्रात स्फोट झाला असुन,आता मोठ्या प्रमाणात रेडियेशन (विकरण) होवुन जपानच्या संकटात मोठी भर पडली आहे.

भारतात याच्यापेक्षा कमी क्षमतेचा भुकंप (विदाउट सुनामी ) झाला तरी पण या पेक्षा कित्येक पट अधिक नुकसान का होते ? ( किल्लारी , भूज ) . . जपानला यातुन लवकर बाहेर पडावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना!!!

निसर्गापुढे माणूस काहीही करू शकत नाही.. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.. देवा, सगळ्या लोकांच रक्षण कर..! सई मुंडले/ सुबक ठेंगणी.. तिथेच होती.. कुठे आहे सध्या?

जपानने अद्याप राष्ट्रपातळीवरील मदत स्वीकारणे सुरू केले किंवा नाही ह्याबद्दल कल्पना नाही परंतु वैयक्तिक पातळीवरील मदत (इच्छा असल्यास) येथून करता येईल. कोणाचे रक्त स्वीकारले जाणार नाही ह्याची सुची अभ्यासण्याजोगी!

In reply to by सुनील

परंतु वैयक्तिक पातळीवरील मदत (इच्छा असल्यास) येथून करता येईल. या उलट या परीस्थितीचा लाभ घेणारे चोर जालावर झाले आहेत. त्या संदर्भात रिडीफ मधील ही बातमी वाचनीय आहे. त्सुनामी होताच क्षणी खालील प्रमाणे अनेक जणांनी डोमेन नेम्स विकत घेतली: 3-11-2011-[removed].com 3-11[removed].com earthquake-[removed].com earthquaketsunami[removed].com earthquakerelief[removed].com त्यांचा गैरवापर सहज होऊ शकतो.... त्यामुळे अनोळख्या व्यक्तींकडून काही इमेल आली तर उघडू देखील नये असे सांगावेसे वाटते....

चंबा काका ( http://www.misalpav.com/user/245) बहुतेक जपान मधेच असतात, बहुधा बोटीवर काम असते त्यांचे...ते अजुन इथे दिसले नाहीत. :(

परिस्थिती अजून गंभीर होते आहे. सुमारे १४,००० लोक आत ३० किमीच्या पट्ट्यात अडकलेले आहेत. काही इमारतींमध्ये आधीच्या घटनांनी अडकलेल्या पण आता किरणोत्सर्गातही आलेल्या लोकांनी विनंती केली सोडवायलाही येऊ नका. :( आता इंधनाच्या नळकांड्या वातावरणात आल्याने किरणोत्सर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. १०० जणांचा एक चमू तेथे गेला आहे पण हा जवळपास आत्मघाती मार्गच आहे असे म्हणायला हरकत नाही. एकुणच कोणत्याही अणुभट्टीतील प्रक्रिया बंद करण्याचा तसा कोणताही सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही असेच दिसून येते. :(