बुटर मिल्श कुकन म्हणजे ताकातला केक.
साहित्य-२ कप ताक,१.५ कप साखर,४ कप मैदा,१ चिमूट मीठ, ३ अंडी,५ ते ६ चहाचे चमचे बेकिंग पावडर,२ चमचे वॅनिला अर्क,
१ लिंबाचा रस+१/२ लिंबाची किसलेली साल,२०० ग्राम बदाम तुकडा,१५० ते २०० मिली अन व्हिप्ड क्रिम
कृती- मैदा+मीठ+बेकिंग पावडर एकत्र करणे. त्यात अंडी व ताक घालणे , साखर घालणे आणि चमच्याने सारखे करून एकजीव मिश्रण तयार करणे. त्यात वॅनिला अर्क आणि लिंबाचा रस व किसलेली सालं घालणे आणि सारखे करणे.
एका उथळ बेकिंग ट्रेला तूप/लोणी लावून घेणे व त्यात हे वरील मिश्रण ओतणे. त्यावर बदाम तुकडे पसरून पूर्ण मिश्रण झाकून टाकणे.
२० ते २५ मिनिटे प्रिहिटेड अवन मध्ये बेक करणे.केक बेक झाल्यावर गरम केकवर अनव्हिप्ड क्रिम सर्व बाजूंनी ओतणे म्हणजे ते आत जिरेल. केक गार झाल्यावर वड्या कापणे.
वि.सू.- १. ह्या केक साठी तूप/लोणी ची आवश्यकता नाही.
२. उथळ बेकिंग ट्रे/डिश घेणे जरुरीचे आहे.
३. हा केक खूप दिवस टिकत नाही.२, ३ दिवसात संपवावा लागतो. (अर्थात तसा तो एकाच दिवसातही संपतो म्हणा!)
साखर
वॉव..
In reply to वॉव.. by मनस्वी
पर्याय
स्वाती
:)
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार
परवाचा केक..
In reply to परवाचा केक.. by स्वाती दिनेश
अरे वा
In reply to अरे वा by वरदा
हो..
In reply to हो.. by स्वाती दिनेश
अरे वा
स्वाती ताई लिंक बद्दल धन्यु.
वा वा.. छान लिंक.. ही कल्पनाच
छान पाक्रु करुन बघणार!
आता मात्र यावंच लागेल