ए पर्या..... झोपेत आहेस का.
पायदान म्हणजे पायरी. बीनाका गीतमालेत अमीन सयानी नेहमी वापरायचा हा शब्द.
पोथी ठेवायच्या घडीच्या टेबलासाठी ग्रंथपीठ हा शब्द योग्य ठरेल.
आमच्या घरी त्याला "पोथी ठेवायचे" असाच उल्लेख व्हाय्चा. स्वतन्त्र नाव कधीच मिळाले नाही
ग्रंथ, आसन, पोथी, पाट..... असल्या सगळ्या पोथ्या आणि त्या स्टँडच्या संदर्भात येणार्या शब्दांत तुला नेमका हा पाय कसा आणि कुठे दिसला जरा प्रकाश टाकता का हो जाणकार???
शब्दाच्या शोधात मीही खूप विचारपूस केली पण शब्द काही सापडला नाही. काही उगाच डोळ्यासमोर शब्द आहे म्हणत होते. ओठावर आहे असे म्हणत आहेत. पण अजून काही शब्द काही कोणाला सांगता आला नाही. :(
”व्यासपीठ’ [वारकरी लोक हा शब्द वापरतात] ’आडणी’ ”घोडी’* असे शब्द मिळाले पण वरीजनल त्यासाठी काय शब्द आहे, तो काही सापडला नाही. शोध मोहीम सुरु आहे.
*[घोडी हा शब्द किर्तनाच्या वेळेस मृदंग उभे राहून वाजवतांना ज्या लाकडी स्टँडवर ठेवतात त्यासाठी वापरतात]
मित्रांनो,
धर्मग्रंथ ठेवायच्या स्टँडला समर्पक शब्द नसेल तर अडून बसू नका. चांगलासा शब्द तयार करा आणि वापरायला सुरवात करा.
मला 'आधारिणी' हा शब्द वापरावासा वाटतोय. म्हणजे जी फळी/आसन/घडवंची ग्रंथाला आधार देते ती.
पण संस्कृत शब्दच वापरायचा असा आग्रह नाही. बोली भाषेत अजुन सोपा शब्द तयार करता आला तर उत्तम.
बातमी वाचून खूपच दु:ख होतंय.. अविनाश ओगले यांची माझी ओळख मिपावरच झाली. आम्ही कधी एक-दोन वेळा बोललोही होतो. संदर्भ कविताच.
दिवाळी अंकात की कोणत्या मासिकात त्यांच्या एका कवितेचा उल्लेख होता तेव्हा त्यांनी मला तो संदर्भ पाठवायचा सांगितला होता.
मी पाठवलाही. महिनाभरापूर्वी मी त्यांना क्षणभरासाठी मिपावर ऑनलाईन आलेलं पाहिलं.
सुनिल यांनी आता ही बातमी दिल्यावर आता त्यांच्याबद्दल कळतंय, खूपच दु:ख होतंय.
प्रतिक्रिया
नाव द्या
त्याला पोथीचा पाट म्हणाव्हे.
विनित
नाव द्या
त्याला पोथीचा पाट म्हणाव्हे.
विनित
प्रतिशब्द
पोथी खालच्या पाटाला, जो पोथी वाचताना उघडून ठेवतात व नंतर घडी घालून मिटता येतो त्याला मराठी अथवा संस्कृत शब्द कोणता?
त्याला "ग्रंथपीठ" असं म्हणता येईल.
रयाळ
रयाळ
येथील तज्ञ / जाणकार मंडळी आणखी प्रतिशब्द सुचवतील / यात दुरुस्ती करतील / या शब्दाचा अर्थ - व्युत्पत्ती यावर अधिक प्रकाश टाकतीलच.
हिन्दीत 'रियाल' म्हणतात. आताच
In reply to रयाळ by वारकरि रशियात
हिन्दीत 'रियाल' म्हणतात. आताच एका मुस्लिम कलिगला विचारले.
पायदान ?
पायदान ?
पायदान ? ए पर्या..... झोपेत
पायदान ?
ए पर्या..... झोपेत आहेस का.
पायदान म्हणजे पायरी. बीनाका गीतमालेत अमीन सयानी नेहमी वापरायचा हा शब्द.
पोथी ठेवायच्या घडीच्या टेबलासाठी ग्रंथपीठ हा शब्द योग्य ठरेल.
आमच्या घरी त्याला "पोथी ठेवायचे" असाच उल्लेख व्हाय्चा. स्वतन्त्र नाव कधीच मिळाले नाही
शब्दापुढे प्रश्नचीन्ह
In reply to पायदान ? ए पर्या..... झोपेत by विजुभाऊ
शब्दापुढे प्रश्नचीन्ह त्यासाठीच दिले आहे इजुभौ :)
नशीब....
In reply to शब्दापुढे प्रश्नचीन्ह by परिकथेतील राजकुमार
पायखाना का म्हणून विचारलं नाहीस ते!!!!
ग्रंथ, आसन, पोथी, पाट..... असल्या सगळ्या पोथ्या आणि त्या स्टँडच्या संदर्भात येणार्या शब्दांत तुला नेमका हा पाय कसा आणि कुठे दिसला जरा प्रकाश टाकता का हो जाणकार???
घडवंची..
म्हणजे हेच का? की कोणत्याही बैठकीला घडवंची म्हणतात. "घडी"चा काही संबंध नसावा बहुतेक.
बाय द वे:
त्या फोल्डिंग स्टँडला पोथीचे "आसन"ही म्हणतात.
चिं.विं.च्या "चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात" मधे चौरंग असाही उल्लेख आहे. पण तो खरा मोठा चौरंग की हे घडीचे छोटे पोथ्यासन काय माहीत..
घडवंची.. बरोब्बर.. आजी
In reply to घडवंची.. by गवि
घडवंची.. बरोब्बर..
आजी म्हणायची.. कालपासून आठवायचा प्रयत्न करत होतो शब्द आठवत नव्हता पण.. घडवंची म्हणतात खरं. :)
पोथीस्टँडला घडवंची म्हणत
In reply to घडवंची.. बरोब्बर.. आजी by मेघवेडा
पोथीस्टँडला घडवंची म्हणत नाहीत. घडवंचीचा संबंध घडीशी नसून घड्याशी आहे. कोणताही घडा ठेवण्याचे आसन म्हणजे घडवंची.
पोथीस्टँडला रयाळ हाच शब्द योग्य आहे.
असेच वाटते. आमच्या कडे
In reply to पोथीस्टँडला घडवंची म्हणत by नगरीनिरंजन
असेच वाटते. आमच्या कडे असलेल्या धातुच्या तीन पायी स्टँडला घडवंची म्हणतात.
आमच्याकडे त्या तीन पायी
In reply to असेच वाटते. आमच्या कडे by Nile
आमच्याकडे त्या तीन पायी स्टँडला तिवई म्हणतात.
पोथीची मांडणी असे म्हटल्याचेही आठवते.
"पोथीची मांडणी" असे
In reply to आमच्याकडे त्या तीन पायी by llपुण्याचे पेशवेll
"पोथीची मांडणी" असे म्हटल्याचेही आठवते.
"पोथीची मांडणी" Seems right...
तिवई सहसा घडवंची पेक्षा उंच
In reply to आमच्याकडे त्या तीन पायी by llपुण्याचे पेशवेll
तिवई सहसा घडवंची पेक्षा उंच असते असे वाटते.
तिवई वर माठ किंवा पिंप ठेवतात
In reply to आमच्याकडे त्या तीन पायी by llपुण्याचे पेशवेll
तिवई वर माठ किंवा पिंप ठेवतात , पोथी नव्हे .........घडवंची किंवा ग्रंथपीठ , पोथीपाट योग्य वाटते ........
त्याला जुन्या मराठीत "घडवंची"
त्याला जुन्या मराठीत "घडवंची" असादेखील शब्द आहे
शब्दाच्या शोधात मीही खूप
शब्दाच्या शोधात मीही खूप विचारपूस केली पण शब्द काही सापडला नाही. काही उगाच डोळ्यासमोर शब्द आहे म्हणत होते. ओठावर आहे असे म्हणत आहेत. पण अजून काही शब्द काही कोणाला सांगता आला नाही. :(
”व्यासपीठ’ [वारकरी लोक हा शब्द वापरतात] ’आडणी’ ”घोडी’* असे शब्द मिळाले पण वरीजनल त्यासाठी काय शब्द आहे, तो काही सापडला नाही. शोध मोहीम सुरु आहे.
*[घोडी हा शब्द किर्तनाच्या वेळेस मृदंग उभे राहून वाजवतांना ज्या लाकडी स्टँडवर ठेवतात त्यासाठी वापरतात]
-दिलीप बिरुटे
घोडी हा शब्द ४ पाय असणार्या
In reply to शब्दाच्या शोधात मीही खूप by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घोडी हा शब्द ४ पाय असणार्या शीडीसाठी पण वापरतात.
आणि हो घोड्याच्या बायडीला पण घोडी म्हणतात.
ह्यासाठी व्यासपीठ हाच शब्द
ह्यासाठी व्यासपीठ हाच शब्द मला सांगितला गेला.
शब्द नसेल तर तयार करा..
मित्रांनो,
धर्मग्रंथ ठेवायच्या स्टँडला समर्पक शब्द नसेल तर अडून बसू नका. चांगलासा शब्द तयार करा आणि वापरायला सुरवात करा.
मला 'आधारिणी' हा शब्द वापरावासा वाटतोय. म्हणजे जी फळी/आसन/घडवंची ग्रंथाला आधार देते ती.
पण संस्कृत शब्दच वापरायचा असा आग्रह नाही. बोली भाषेत अजुन सोपा शब्द तयार करता आला तर उत्तम.
ग्रंथासन सुचवलाच
In reply to शब्द नसेल तर तयार करा.. by योगप्रभू
ग्रंथासन सुचवलाच आहे.
शिवाय,
पोथीधर
ग्रंथपाट
ग्रंथाधार
-बोलीभाषेत
मिटफळी
पोथीफळी
पोथ्यासन
पोथीपाट
चौकडी
घडीचा चौरंग
पुस्तकपाट
फुली
कृपया माझा प्रतिसाद पुन्हा
In reply to ग्रंथासन सुचवलाच by गवि
कृपया माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नजरेखालून घालावा.
त्याला "ग्रंथपीठ" असे म्हणतात आणि हा शब्द किमान गेली २० वर्षे तरी माझ्या वापरात आहे.
श्रद्धांजली!
https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16646980.cms
हे तेच अविनाश ओगले काय?
श्रद्धांजली!
अरेरे.....
In reply to श्रद्धांजली! by सुनील
बातमी वाचून खूपच दु:ख होतंय.. अविनाश ओगले यांची माझी ओळख मिपावरच झाली. आम्ही कधी एक-दोन वेळा बोललोही होतो. संदर्भ कविताच.
दिवाळी अंकात की कोणत्या मासिकात त्यांच्या एका कवितेचा उल्लेख होता तेव्हा त्यांनी मला तो संदर्भ पाठवायचा सांगितला होता.
मी पाठवलाही. महिनाभरापूर्वी मी त्यांना क्षणभरासाठी मिपावर ऑनलाईन आलेलं पाहिलं.
सुनिल यांनी आता ही बातमी दिल्यावर आता त्यांच्याबद्दल कळतंय, खूपच दु:ख होतंय.
-दिलीप बिरुटे
श्रद्धांजली .!
श्रद्धांजली .!
तेच हे नसावेत !
ही अपेक्षा .