व्हेजिटेबल ऑ ग्रातिन ही खूप हॉटेलात मिळणारी डीश आहे. खूपदा ह्यात अननस पण घालतात (नवरतन कोरमा नामक गोड भाजी सारखा). भाज्या बेक करतात आणि त्यावर व्हाईट सॉस आणि चीज घालतात. माझ्या आजे सासू बाईंना 'ह्यात काही लाल तिखट वगैरे' घालत नाहीत का असं प्रश्न पडला होता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण मूळ कृतीत लाल तिखट नसते. आणि हो, जसं तुम्हाला माहीतच आहे, मी फारसे 'भरपूर चीज बटर' वाले पदार्थ करू शकत नाही (dietician झाले आहे तेव्हा पासून), म्हणून ह्या डीश चे पण लो कॅल लो चीज व्हर्जन देत आहे.
सामग्री:
२-३ मोठे बटाटे, चिरलेले
एक मूठभर फ्रेश/फ्रोझन कॉर्न
१ चमचा बटर
१ कप फरसबी, चिरलेली
१ कप गाजर, चिरलेले
१ कप शिमला मिरची किंवा रेड/येलो पेपर्स
१/२ कप ब्रेड क्रंब
१ क्यूब चीज (तुम्ही हवंतर जास्त पण घालू शकता)
व्हाईट सॉस साठी:
१ मोठा चमचा मैदा
१ १/२ कप गार दूध
१ चमचा बटर
मीठ आणि मिरपूड, चवीनुसार
कृती:
-प्रथम एका बेकिंग डीश मध्ये बटाटे आणि कॉर्न पसरवून त्यावर थोडं मीठ मिरपूड आणि बटर घालून त्याला २० मिनिट १८० डिग्री ओव्हन मध्ये ग्रील मोड वर ठेवावे.
-आता व्हाईट सॉस करून घावे. त्यासाठी, मैदा गार दुधात नीट मिसळून घ्यायचा. एका भांड्यात थोडं बटर गरम करून त्यात मैदा आणि दुधाचे मिश्रण घालून सारखं ढवळत रहायचे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. सॉस जरा दाट झालं (थोडे बुड बुडे आल्यावर) कि मग त्यात मीठ मिरपूड घालून बाजूला ठेवायचे. गोडसर सॉस आवडत असेल तर एक चमचा साखर पण त्यात घालू शकता.
- ओव्हन मधून बेक्ड बटाटा काढून त्यावर बाकी भाज्या घालायच्या. मग त्यावर ते व्हाईट सॉस सगळी कडे सारखे ओतायचे. आता, ब्रेड क्रंब चा एक थर करून सगळ्यात शेवटी किसलेले चीज घालायचे.
- ह्या बेकिंग डीश ला ओव्हन मध्ये २० मिनिट १५० डिग्री वर बेक करून मग ह्या व्हेजिटेबल ऑ ग्रातिन ला गरम गरम खायचे.
वाचने
4869
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खादाडताय मला वाटतं की ही
मला वाटते ही कृति आधी अमिताने
ह्म्म्म....मला मैदा वगैरे
व्हेजिटेबल ऑ ग्रातिन (बेक्ड
कॉर्न फ्लोर
मृणालिनी ताई
ओह, हे मला माहित नव्हते. मला
In reply to मृणालिनी ताई by खादाड अमिता
मला वाटते मैद्यामध्ये
In reply to ओह, हे मला माहित नव्हते. मला by Mrunalini
फक्त कॅलरीज?
In reply to मृणालिनी ताई by खादाड अमिता
मस्त डिश ...
पाकृ आवडली
In reply to मस्त डिश ... by sagarparadkar
होतेल दर्शन प्रभात रोड पुणे
बघूनच तोंडाला पाणी सुटले
तुमची पाकृ पाहून जाईची आठवण