✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुर्रुनाथ नाईक व बाबुराव अर्नाळ रांची

न
नाखु यांनी
Sun, 06/15/2008 - 09:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6042 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

स
संजय अभ्यंकर Sun, 06/15/2008 - 11:21 नवीन

गुरुनाथ नाईक..

शाळकरी वयात मी गुरुनाथ नाईकांचा फॅन होतो. कॅप्टन दीप, गरूड, सारंग, धुरंधर, पातांजली इ. नायक असलेल्या त्यांच्या कादंबर्‍या जवळपास सर्व वाचून काढल्या होत्या. गुरुनाथ नाईकांपासुन स्फुर्ती घेऊन त्याकाळात, अनेक लेखक ह्याच प्रकारच्या रहस्यकथा लिहू लागले. परंतु, गुरूनाथ नाईकांची बरोबरी कोणी करु शकले नाही. गुरुनाथ नाईकांनी नंतर स्वतःची प्रकाशन संस्था काढल्याचे स्मरते. त्यांनी बहुदा आपली प्रवास कं. काढल्याचेही वाचनात आले. त्यानंतर ते कोठे अंतर्धान पावले, ते आजतागायत सापडलेले नाहीत. शाळकरी वयात ह्या कादंबर्‍या लायब्ररीतुन आणुन वाचत असल्यामूळे, त्या संग्रही नाहीत. त्या काळात कामाठीपुर्‍याच्या नाक्यावर (अलेक्झांड्रा सिनेमाजवळ) एक टपरीवाला, ५०पैसे प्रती कादंबरी ह्या दराने, ह्या कादंबर्‍या वाचायला देत असे. त्याच्याकडूनही अनेकदा ह्या कादंबर्‍या मी आणत असे. बाबुराव अर्नाळकरांचे माझे कधी जमले नाही. त्यांची शैली मला भावली नाही. तसेच, ते आधीच्या पिढिचे असल्यामुळे (कदाचीत), त्यांची शैली मला रटाळ वाटत असे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 06/15/2008 - 18:02 नवीन

नादखुळा

नादखुळा साहेब, काळा पहाड आणि हर्षवर्धन कथा का भावल्या , हे थोडे लिहिले असते तर बरे झाले असते.... दोन तीन वाक्यांचे चर्चा प्रस्ताव शक्यतो नसावेत असे आम्हाला वाटते....,... आपण टंकायचे कष्ट घेतलेत तर लोक अजून भरभरून लिहितील.... बाकी आपली मर्जी... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भोचक Mon, 06/16/2008 - 14:36 नवीन

गुरूनाथ नाईक यांची ताजी मुलाखत

गुरूनाथ नाईक यांची ताजी मुलाखत येथे वाचा. http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/famouswriters/0711/01/1071101001_1.htm
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Mon, 06/16/2008 - 19:32 नवीन

बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक आणि...

नादखुळा यांच्या छोट्याशा प्रस्तावाने (आणि संजय अभ्यंकर यांच्या उत्तराने) खूप आठवणी जाग्या झाल्या. लिहण्यासारखे बरेच आहे. ते थोडक्यात... १. अर्नाळकरांचे नायक : काळापहाड, झुंजार (सोबत विजया, नेताजी) आणि धनंजय (सोबत छोटू) हे आठवतात. २. गुरुनाथ नाईकांचे नायक : कॅ.दीप (सोबत ले. शे़ख), गरूड, गोलंदाज उर्फ उदयसिंग चौहान, न्यायाधीश. ३. सारंग (सारनाथ रंगराव गजेंद्रगडकर) हा नायक अनिल टी. कुलकर्णी या लेखकाचा. त्यांचाच तिरंदाज हा नायकही लोकप्रिय होता. ४. पतंजली हा नायक दिवाकर नेमाडे यांचा. या कथा जादूटोणा, भूत पिशाच्च वगैरेवर आधारीत असायच्या. ५. हर्षवर्धन मात्र आठवत नाही. ६. याच काळात माया सामंत, अनंत तिबिले हे ही ले़खक दरमहा रहस्यकथा लिहायचे. गोव्यात दरवर्षी धारगळ-पेडणे येथे शेकोटी साहित्य संमेलन भरते. २००७ च्या संमेलनात श्री. गुरुनाथ नाईक यांची मुलाखत मी आणि प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी घेतली होती. रहस्यकथा या प्रकाराला साहित्य शारदेच्या दरबारी मान नसल्याची खंत नाईकांनी व्यक्त केली. अर्नाळकरांची नोंद गिनीज बुकात आहे. नाईकांच्या कॅ.दीप कथेतील दीप यांचा सहकारी ले. शेख याचा एका कथेत मृत्यू होतो. पण वाचकांच्या दबावाने नाईकांना त्याला पुन्हा जिवंत करावे लागले होते.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Fri, 06/20/2008 - 23:35 नवीन

बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक आणि...

ओगले साहेब, चुकी बद्दल क्षमस्वः. गुरुनाथ नाईकांच्या सागर कथा. सारंग अनिल टि. कुळकर्णींचा व पातंजली दिवाकर नेमाडेंचा. तसेच अनंत तिबिले ठाऊक नाही, परंतु ऊर्मिला तिबिले व एस. एम. काशीकर (धूमकेतू कथा) आठवले. परंतु गुरुनाथ नाईकांच्या शैलीला तोड नव्हती. तरुण वयात, फ्रेडरिक फोर्सिथ वाचु लागलो आणी गु. नां. वर असलेला त्याचा प्रभाव जाणवु लागला. कथेची तपशिलवार मांडणी तसेच सेक्स बद्दल अवास्तव, अघळ पघळ न लिहीण्याचा कटाक्ष, हे फोर्सिथचे खास गुण गु. नां. मध्येही होते. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले
न
निनाद मुक्काम … Wed, 04/22/2015 - 03:46 नवीन

दहावीच्या सुट्टीत गुरुनाथ

दहावीच्या सुट्टीत गुरुनाथ सावंत विजय देवधर पंढरीनाथ सावंत धारप ; सुशी अश्या अनेक मातब्बर लेखकांची ओळख झाली ; नाईकांचा दीप पाकिस्तानात जाऊन ज्या लीलयाने अचाट कामगिर्या पार पाडायचा ते जाम आवडायचे; परदेशात माझ्या पाहण्यात ट्रेन मध्ये गार्डन मध्ये रहस्य भय कथा वाचणारे शेकड्याने पहिले की खूप बरे वाटते ; उगाच सध्या काय वाचतोय अश्या गर्भित उच्चभ्रू प्रश्नाचा मला तिटकारा आहे साहित्यात सुद्धा वर्ण व्यवस्था असल्याचे पाहून वाईट वाटते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा