Skip to main content

डॉ. जयंत नारळीकर - महाराष्ट्र भूषण

Published on मंगळवार, 08/03/2011
डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र शासनाचा ' महाराष्ट्र भूषण ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन खगोलशास्त्रातील संशोधनात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा अमोल केळकर ---------------------- मला इथे भेटा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2989
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कालच पेपर मध्ये वाचली. डॉ. नारळीकर यांचे हार्दिक अभिनंदन! :)

डॉ. जयंत नारळीकरांचे हार्दिक अभिनंदन. या जागतिक किर्तीच्या संशोधकास 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्काराचाच सन्मान झाला आहे. अवांतरः अलीकडेच एका दूरच्या आकाशगंगेत एक २० अब्ज वर्षांपूर्वीचा तारा मिळाल्यामुळे हॉईल-नारळीकरांच्या स्थिर स्थिती सिद्धांताला(स्टेडी स्टेट थियरी) पुष्टी मिळतीय.

In reply to by प्रचेतस

डॉ. जयंत नारळीकरांचे हार्दिक अभिनंदन. अवांतरः अलीकडेच एका दूरच्या आकाशगंगेत एक २० अब्ज वर्षांपूर्वीचा तारा मिळाल्यामुळे हॉईल-नारळीकरांच्या स्थिर स्थिती सिद्धांताला(स्टेडी स्टेट थियरी) पुष्टी मिळतीय. +१ बिग बैंगचे बिंग फुटणारच होते.

In reply to by विनायक बेलापुरे

नारळीकरांचे अभिनंदन. >>>बिग बँग छे छे बिग बँगचे समर्थक आता ते सगळे १३ अब्ज नाही २० अब्ज वर्षांपुर्वी झाले असे म्हणतील. वाद चालूच राहिल... :)

डॉ. नारळीकरांचे त्रिवार अभिनंदन. महाराष्ट्र भुषण तर ते होतेच. आता त्याला राजमान्यता मिळाली.

In reply to by ५० फक्त

डॉ. नारळीकरांचे त्रिवार अभिनंदन. महाराष्ट्र भुषण तर ते होतेच. आता त्याला राजमान्यता मिळाली. सहमत! नारळीकरांचे अभिनंदन!

डॉ. जयंत नारळीकरांचे मनःपुर्वक अभिनंदन. ते महान खगोलतज्ञ आणि संशोधक तर आहेतच, पण ते अतिशय सोप्या भाषेत छान छान विज्ञानकथा पण लिहीतात. तसेच, "सायंटिस्ट" म्हटल्यावर जो घुमा, एकलकोंडा चेहरा मनासमोर येतो त्यालापण त्यांच्या हसतमुख चेहर्‍याने चांगलाच तडा जातो.. पुन:श्च नारळीकर सरांचे हार्दिक अभिनंदन... अवांतर : इथे आसामात "जयंत नारळीकर" नावाचे एक आय. ए. एस. अधिकारी आहेत. मात्र ते महाराष्ट्रीयन नाहीत. असं ऐकलयं, की त्यांच्या घरच्यांनी त्यांचे नाव आपल्या जयंत नारळीकरांवरुन ठेवलेय.. :-)