✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिनिक्सची भरारी....?

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Sun, 03/06/2011 - 17:29  ·  लेख
लेख
आयर्लंडकडून जबरदस्त चपराक बसल्यावर आणि समस्त इंग्लिश क्रिकेटप्रेमींच्या टीकेचे लक्ष्य झालेली स्ट्रॉस आणि कंपनी ढेपाळून गेलीच होती आणि तिचे प्रत्यंतर आजच्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ज्या पद्धतीने क्रमाने त्यांचे फलंदाज नांगी टाकीत गेले ते पाहिल्यावर असेच वाटले की आजच इंग्लंडची टीम " पुरे झाले बाबानू....जातो आम्ही लॉर्डसकडे परत..." म्हणत आज पॅकिंग करणार. १७१ चे सोपेसे लक्ष्य गाठायला स्मिथ, अमला आणि कलिस किती ओव्हर्स घेणार एवढाच प्रश्न होता. ~~~~ आणि क्रिकेट किती अनिश्चततेचा खेळ आहे याची परत एकदा प्रचिती आली. इंग्लंडच्या फलंदाजांनी नव्हे तर त्यांच्या गोलंदाजांनी नेमक्या वेळेला कमाल केली.....आणि ही रोमहर्षक लढत केवळ ६ धावांनी जिंकली.....१७१ धावा द.आफ्रिकेचे बलाढ्य फलंदाज काढू शकले नाहीत....आणि ब्रॉड्+अ‍ॅण्डरसन या दुकलीने स्ट्रॉसच्या आशा पुन्हा प्रज्वलित केल्या. सारा भारत बेंगलोरकडे लक्ष देऊन बसल्याने द.आफ्रिका वि. इंग्लंड हा सामना किती रंगतदार होईल याची कल्पनाही कुणाला आली नाही. इन्द्रा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11467 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

आणि आम्ही ती म्याच पहायचीच

भडकमकर मास्तर
Sun, 03/06/2011 - 17:43 नवीन
आणि आम्ही ती म्याच पहायचीच विसरलो... तो क्यालिस गेल्यापर्यन्त पाहिली होती.. पण म्हटले तरी हे लोक आरामात मारतील... आणि आपली सुमार बोलिन्ग पाहिली... आणि फक्त शेवटच्या दोन अफ्रिकेच्या विकेट्स पाहिल्या... स्ट्रॉसला शुभेच्छा.... बरा खेळ.. खूप मोठा हो अवांतर;: हरणार हे माहित असते तर क्यालिस "चालला" असता का? फेमस वॉक्स आर ऑलवेज सीन व्हेन द टीम इज इन गूड पोझिशन--- जालिन्दर जलालाबादी
  • Log in or register to post comments

स्ट्रॉसचा आशावाद

पैसा
Sun, 03/06/2011 - 17:55 नवीन
"It's a matter of winning three ties, and we have beaten South Africa, West Indies and Bangala Desh before!" असं स्ट्रॉसने सामन्याआधी म्हटलं होतं! आणि दक्षिण आफ्रिकेने 'चोकर्स' हे नाव कधीचं कमावलेलं आहेच.
  • Log in or register to post comments

लै भारी

रमताराम
Sun, 03/06/2011 - 17:55 नवीन
आम्ही हीच म्याच पहात होतो. इंग्लंडने अतिशय अचूक बोलिंग करून अगदी जखडून टाकले होते. फील्ड्-प्लेसिंग सुद्धा अतिशय अचूक होते, हॅट्स ऑफ टू स्ट्रॉस. मझा आला. स्साला आपली बोलिंग बघता क्वार्टरफायनलला पोहोचलो तरी भैरोबाला क्वार्टर देईन म्हणतोय (प्रसाद शेवटी भक्तालाच मिळतो हे ध्यानात ठेवून. ;) )
  • Log in or register to post comments

आम्ही दोन्ही मॅचा पाहिल्या.

Nile
Sun, 03/06/2011 - 18:00 नवीन
आम्ही दोन्ही मॅचा पाहिल्या. इंग्लंडने अनपेक्षित निकाल द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आधी जिंकलेली भारताबरोबरची मॅच ड्रा करुन घेतली मग आयर्लंड बरोबर तर हागलेच, पण आज छोट्या स्कोअरसमोरही हारले नाहित. (आफ्रिकेची बॅटिंग खराब झालीच अर्थात)
  • Log in or register to post comments

+१

शाहरुख
Sun, 03/06/2011 - 18:16 नवीन
>>इंग्लंडने अनपेक्षित निकाल द्यायचं ठरवलेलं दिसतंय +१ इंग्लंड स्विंग्ज लाईक अ पेंड्युलम डू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा