साहित्यः
मटण खिमा - ५०० ग्रॅम
कांदा - १ बारीक चिरुन
आले लसुण पेस्ट - २ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
काळी मिरी पावडर - १ चमचा
आमचुर पावडर - २ चमचा
कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरुन
अंडे - १
बटर - ३ चमचे
मिठ चवीनुसार
चाट मसाला, कांदा आणि टोमॅटोचे गोल काप सजावटीसाठी
कबाब करण्या साठी सळ्या किंवा बांबु स्टिक्स
कृती:
१. मटण खिमा स्वच्छ धुवुन, चाळणीमधे १/२ तास निथळत ठेवावा. १/२ तासानंतर खिमा paper napkin ने कोरडा करुन घ्यावा.
२. खिम्या मधे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, काळी मिरी पावडर, आमचुर पावडर, २ चमचे बटर व मिठ टाकुन निट मिक्स करुन घ्यावा.
३. ह्या खिम्या मधे १ अंडे फेटुन टाकावे व एकत्र करुन फ्रिज मधे १/२-१ तास झाकुन ठेवावे.
४. ओवन २७५ degree celcius ला १५ मिनिटे preheat करावा.
५. खिमा बाहेर काढुन मिक्स करावा. हाताला थोडे पाणी लावुन हा खिमा सळ्यांवर लावावा. त्याला साधारण हाताच्या मुठीचा आकार द्यायचा प्रयत्न करावा.
६. ह्या सळ्या ओवन मधे ठेवुन १५ मिनिटे भाजुन घ्याव्यात. हे करताना ५ मिनिटांनी कबाबला वरतुन बटर लावुन त्याची खालील बाजु वरती करावी. त्या बाजुला सुद्धा बटर लावावे.
७. ५ मिनिटांनी कबाब बाहेर काढावेत. कबाब सळ्यांवरुन काढुन घ्यावेत.
८. आवडत असल्यास वरतुन चाट मसाला sprinkle करुन कांदा व लिंबु सोबत गरम serve करावा.
टिपः
१. तुमच्या कडे सळ्या किंवा बांबुच्या स्टिक्स नसतील, तर आपली नेहमीची लाकडी पळी, ज्याचा मागचा दांडा गोल असतो. त्या दांड्याला थोडे पाणी लावुन, त्यावर खिमा लावावा. तो खिमा अलगद हाताने काढुन ओवन मधे भाजण्या साठी ठेवावा.
२. ओवन नसल्यास खिम्याचे लांब गोळे करुन तव्यावर shallow fry केले, तरी खुप छान लागतात.
३. मटण आवडत नसल्यास त्या जागी तुम्ही चिकन, beef किंवा pork चा खिमा वापरु शकता.






वाचने
7776
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
बघुनच खायची इच्छा
+१
In reply to बघुनच खायची इच्छा by शेखर
शी बै अच्र्त
In reply to +१ by टारझन
हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे.
In reply to +१ by टारझन
हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे.
In reply to हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. by Mrunalini
चुम्मा
मटन चे टेक्श्चर (मराठी
कबाब तर आवडलेच पण उतरन बद्दल
कबाब
हो, बरेचदा कुठल्याही खिम्याचा
In reply to कबाब by विशाखा राऊत
सीख कबाब म्हणतात की शीग कबाब
मला नक्की माहित नाही, पण
In reply to सीख कबाब म्हणतात की शीग कबाब by नगरीनिरंजन
उर्दूत सीख म्हणजे इंग्रजीत SKEWER
In reply to सीख कबाब म्हणतात की शीग कबाब by नगरीनिरंजन
धन्यवाद वाहीदा. फार दिवसांचा
In reply to उर्दूत सीख म्हणजे इंग्रजीत SKEWER by वाहीदा
रेडिओ होटेलमधे सिख कबाब आणि
झकास :)
करुन पाहणार
फारच छान.
फोतो अजिबात नाही आवद्ला