Skip to main content

ब्रिगेडी वृत्ती

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 02/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिगेडी वृत्ती जेवढी वाढत आहे तितकाच क्लेश महाराजांच्या आत्म्याला होत असेल नाही का ? थोर व्यक्तींचे कार्य त्यांना जनमानसातून पुसता येत नसल्याने ब्रिगेडी लेखक आणि कार्यकर्ते जिवाचा आटापिटा करून त्यां थोर व्यक्तींना शिवीगाळ करत आहेत.शिव्या दिल्या म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिमा जनमानसातून खाली उतरली अशी भाबडी समजूत करून घेतात ते .ह्यांची ४-५ रुपयावाली पुस्तके जी खपवत असतात त्यात वाक्याची शेवटी पूर्णविराम नसेल पण शिवी तरी असेलच .आणि बऱ्याच चुका आहेत त्यामध्ये आणि ते त्यामध्ये बिनधास्तपणे ठोकेबाजी करतात ह्याबद्दल गम्मत वाटते .त्यांनी स्वामी विवेकानंदांचे चातुर्वण्यावरचे भाष्य जे छापले आहे त्याखाली त्यांनी अजून एक स्वामी विवेकानंदांचे वाक्य छापावे ते म्हणजे "विद्वेषाच्या आधारावर केलेले कोणतेही काम फार काळ टिकत नाही .

वाचने 13672
प्रतिक्रिया 63

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

+१

९६.५% ना आरक्षण देवुन टाका.. हाय काय अन नाय काय.. कोन नाहि कोनाच अन दाल भात लोनच

....

'विष्णू म्हणजे विषाचा अणू' असे ब्रिगेडच्या एका पुस्तकात वाचले. बहुतेक पुरुषोत्तम खेडेकर लेखक होते. ही फोड त्यांना कशी मिळाली ते तो विष्णूच जाणे. माझा 'निर्मिती सावंत/सैफ अलि' झाला तेव्हा. काय बोलावे, हसावे, चिडावे का काय करावे तेच कळेना. पुस्तक साभार परत केले.

ह्या बिरगेडला राजकिय वजनदार पुढार्‍यांचा पाठिंबा आहे का?हे असे करण्यामागे त्यांचे काय हेतु आहेत? अपमान झाला म्हणून राडा करणारे,तोंडाला काळे फासणारे ब्रिगेडबद्दल गप्प का ?

देवा रे. मनोरंजक लिखाण म्हणून अशा ब्रिगेडी लेखनाकडे पहावे. कोणी अनुयायी वगैरे मोठ्या संख्येने मिळाले आहेत या संघटनांना असे वाटत नाही. हल्ली लोक भडकाऊ लिखाणापासून सावध राहतात असं वाटायला लागलंय. भडक प्रक्षोभक बोलणार्‍या नेत्याच्या भाषणाला गर्दी खूप. पण ऐकायला, करमणुकीसाठीच. निवडणुकीत काही वेगळेच. तसा प्रकार इथेही आहे.

In reply to by गवि

हा हा! हे ब्रिगेडी लोक हिन्दु देव-देवतांचा प्रचन्ड द्वेष वगैरे करतात.. उदा. 'गणपती' हा भटांनी त्यान्च्या सोईसाठी शोधून काढलेला देव आहे. म्हणूनच त्याच्या गळ्यात जानवे असते.. गणपतीचा आणि शन्कराचा काहीही सम्बन्ध नाही. शन्कर हा स्मशानात राहणारा .म्हणून..ईस्पेशली ब्राह्मणेतर लोकांचा देव आहे. =)) =)) =)) =)) आणि गम्मत म्हणजे या ब्रिगेडी लोकांमध्ये नावे मात्र "ब्राह्मणी" आढळतात... की ज्या नावांच्या लोकांचा आणि देवांचा ते प्रचंड द्वेष करतात! ;) उदा. "परशुराम" वाडेकर, "रामदास" आठवले, " पुरुषोत्तम"(जे की विष्णु'चे नाव आहे!) खेडेकर!... =)) =)) =)) अर्थात "प्रवीण" गायकवाडांच्या नावातलं "प्रवीण" हे नाव मात्र थेट राजस्थानातल्या "प्रवीण मेन्दी"शी निगडित आहे!.. बहुधा प्रवीण दादा ...अजूनही राजस्थानातल्या "सिसोदिया"वन्शाशी नाळ जोडून आहे! ;) ;) ;) ____________________ टीप : दादोजींचा पुतळा हटवण्यासाठी सक्रिय सहभाग आणि भक्कम पाठिम्बा देणार्या "दीपक मानकर"च्या दुर्वांकुर'मध्ये जाणं आम्ही कधीच सोडून दिलंय! कारण दुर्वांकुरच्या ग्राहकांनी दिलेल्या पैशावरच तर दादोजींचा पुतळा हटवला गेला... असे ऐकीवात आहे! ;) बेटरली आम्ही सुकान्ता किन्वा अभिषेक प्रेफर करतो... किन्वा तुळशीबागेत गेलं.. तर "वझे " यांच्या "अक्षय"ला पावन करतो! :)

In reply to by मृगनयनी

माझ्या माहीतीनुसार दुर्वांकूर हे दीपक मानकरचे नाही. दीपक मानकर हा नारायण पेठेतला आणि नंतर केळेवाडीतला गुंड. दुर्वांकूर हे मानकर खाणावळ वाल्याचे हॉटेल आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

"दुर्वांकुर" हे हॉटेल "शाम मानकर" यांनी सुरु केले. या शाम मानकरांचे पुत्र : दीपक मानकर.. जे की आत्ता कॉंग्रेस्'चे नगर्सेवक अहेत. तेच आत्ता "दुर्वांकुर'चा कारभार बघतात!... शुक्रवारातली, शिवाजीनगरची आणि सदाशिव पेठे मधली 'नातू' कुटुम्बीयांची प्रॉपर्टी हडप करताना जास्त प्रकाशात आलेला एक चेहरा म्हणजेच : दीपक शाम मानकर! :| टीपः याच "नातूं"चे पूर्वज पूर्वी पेशव्यांच्या पदरी सरदार होते... ;)... बरं का पुण्याचे पेशवे! ;)

In reply to by मृगनयनी

"टीपः याच "नातूं"चे पूर्वज पूर्वी पेशव्यांच्या पदरी सरदार होते... Wink... बरं का पुण्याचे पेशवे! Wink" बाळाजीपंत नातु हे पेशव्यांच्या पदरी होते पण मग इंग्रजांना फितुर झाले. पेशवाई दरबारी राजकारण समजायला इंग्रजांना, नातुंची खुप मदत झाली.

In reply to by शैलेन्द्र

शनिवारवाड्यावर इंग्रजांचे निशाण लागल्यावर आणि पळपुट्या बाजीरावाची रवानगी बिठूरला झाल्यावर पुण्यावर साहेबाचा अंमल प्रस्थापित झाला. बाळाजीपंत नातूने केलेल्या मदतीचे बक्षीस म्हणून साहेबाने पंतांना जहागीर, सरंजाम बहाल केला. पण उत्तरायुष्यात बाळाजी त्याचा उपभोग घेऊ शकला नाही. मराठा राज्य बुडवण्यास मदत केल्याचा कलंक त्याच्या डोक्यावर राहिला. पुढे बाळाजीपंताच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो वेडा झाला. काशीला जाऊन राहिला व तेथेच मरण आल्याचे म्हणतात. पेशव्यांशी एकनिष्ठ सरदार म्हणू लागले, 'बरं झालं. करावं तसं भरावं. पापाचे आणि फितुरीचे बक्षीस पचत नाही.' वैयक्तिक मत : बाळाजीने केले ते अगदी बरोबर केले. उत्तर पेशवाईतील कारभार म्हणजे 'कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. सर्वसामान्य जनता गांजली होती' अशा वेळी एक शिस्तबद्ध शासन व्यवस्था असणे गरजेचे होते. ती इंग्रजांच्या रुपाने मिळाली. झाले ते बर्‍यासाठीच.

In reply to by योगप्रभू

सहमत! योगप्रभू! पण सद्यस्थितीला... नातूंच्या जमिनी, प्रॉपर्टी हडप करायचं दीपक मानकर'चं प्रयोजन मात्र निन्दनीय आहे!... हे खरं.... किन्वा नातूंच्या जमिनी हडपून तिथे "दादोजी- महाल" बान्धायचा मनसुबा असावा मानकर'चा! ;) ;) =)) =)) =)) ____

In reply to by गवि

मनोरंजक लिखाण म्हणून अशा ब्रिगेडी लेखनाकडे पहावे.
डॉक्टरेट समजा करायची झाली, आणि त्यासाठी प्रबंधाचा विषय 'ब्रिगेडी साहित्यातील त्रुटी' असं निवडला तर प्रबंध पूर्ण करण्यास किती वेळ लागावा असे वाटते. (माझ्या मते एक दशक) ;)

अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. त्याबद्दल चर्चा करुन त्यांचे महत्व वाढवू नये.

In reply to by तिमा

मा. ति.मा. दुर्लक्ष करून तर ही वेळ आलीये ना! ;) दुर्लक्ष केलं... म्हणून तत भान्डारकर्वर हल्ला झाला... दुर्लक्ष केलं.. म्हणून तर दादोजी...हटवले गेले... दुर्लक्ष केलं... म्हणून तर माकडाच्या हातात कोलीत आहे ना! (पक्षी: अजित पवार उपमुख्यमन्त्री आणि पुण्याचे पालकमन्त्री आहेत ना! ;) ) त्यामुळे या ब्रिगेडी लोकांना शिव्या घालताना "लई" मजा येते... ;) ;)

In reply to by मृगनयनी

खासम-खास प्रतिक्रीया वाचण्यासाठी धागा उघडला आणि अपेक्षित प्रतिक्रीया वाचायला मिळाल्या. आता 'आम्हाघरीधन' ह्यांच्या परतिकिरियेची वाट बघत आहे.

आर्याभट्ताने शून्याची संकल्पना एका मूलनिवासी तज्ञाकडून आत्मसात करून त्याचा निर्घुण खून केला व त्यांची सर्व पुस्तके जाळली व नंतर जावून मी शून्याचा शोध लावला असे खोटे सांगू लागला असे मध्ये कुठल्या पुस्तकात वाचले होते .

मी बऱ्याच वेळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांना विचारले आहे की तुमचा जो तथाकथित शिवधर्म आहे त्यात तुम्ही प्रार्थना देवळात करता की मशिदीत की अग्यारीत की चर्च मध्ये ? मेल्यावर जाळता,पुरता की अजून काय ? शिव धर्मामधल्या मुलामुलींची नावे काय आहे ?बरे जय जिजाऊ जय शिवराय करता आणि मुर्तीपुजेच्या विरोधात आहात असे म्हणतात मग हा जिजामातेंचा आणि महाराजांचा अपमान नाही काय ? त्यांनाच माहित नाहीये की आपण काय करायचे आहे ते ? त्यांची ४-५ रुपयाची पुस्तके वाचण्यापेक्षा चंपक आणि ठकठक वाचलेले बरे

In reply to by अँग्री बर्ड

त्यांची ४-५ रुपयाची पुस्तके वाचण्यापेक्षा चंपक आणि ठकठक वाचलेले बरे
म्हणजे तुमचा पुढचा धागा आता चंपक किंवा ठकठक वर का?

ह्या विषयी फार माहिती नव्हती म्हणून जाऊन ब्रिगेड ची साईट पहिली... सगळी मज्जाच मज्जा आहे... एक तर निम्म्या गोष्टी अगम्य भाषेत दिसत आहेत... आणि जे काही वाचता येतंय ते विनोदी आहे... पण त्यात एका ठिकाणी लिहिलंय कि "ह्या पुढे ते आपली अक्कल वापरणार आहेत... " (We are going to use our brains hereafter).... ह्यातच काय ते आला... शिवाजी महाराज ब्राह्मणाच वर्चस्व उलथून देण्या साठी लढले हे माहित नवता.. मला वाटायचा कि ते मुघला विरुद्ध लढले... औरंगजेब वगैरे... (Jijabai prepared her son Shivaji for the overthrowing of the Brahminical order and releasing the Bahujan from their tyranny) काही पोर असतात न... उगाच गाड्या उडवत फिरणारी... गळ्यात सोन्याचे दोरखंड... दाढ्या वाढवलेल्या... कानात काहीतरी घातलेला.. अंघोळ न केल्या सारखा लूक... शिक्षण... जाऊ द्या... घरात बक्कळ पैसा... हजारो एकर शेती... कोट्यावधीची इस्टेट... आणि निवडणुका लढणे हा future प्लान... अशा एखाद्या माणसांनी लिहिलेली भाषणे वाटली... ह्यांनी कधी कुणीही लिहिलेला शिवाजी महारांजाच चरित्र वाचला असेल का हो? किंवा कुठल्याही पुस्तकाची २- ४ पानं?

१.सचिन,सौरव,अनिल कुंबळे,व्हीव्हीएस,आर.पी.सिंग,इशांत शर्मा,अमित शर्मा,रवी शास्त्री ,सुनील गावस्कर इत्यादी ब्राह्मण लोकांच्या जुन्या नवीन matches बघू नयेत.. ह्यातले काही लोक १९८३ च्या विश्वचषकात असल्याने तो आपण जिंकलाच नाही असा समजा तर काही लोक हे T20 विश्वचषक २००७ मध्ये असल्याने तो देखील आपण जिंकलाच नाही असे समजावे. २.विश्वनाथन आनंद जिंकला तर आनंद व्यक्त करू नये.. ३.चितळे उत्पादन घेऊ नये,अय्यंगार बेकरी टाळावी. ४.सध्या रेल्वे मंत्री ममता बनर्जी असल्याने रेल्वेत बसू नये ,रुळाच्या कडेकडे चालत जावे वा गाडी करावी . ५.कृपा करून बिरबल च्या गोष्टी ऐकू नये.. ६.भास्कराचार्याने आणि आर्यभट्टाने त्यात आधी शोध लावून ठेवले असल्याने खगोलशास्त्र आणि गणित कृपया करून शिकू नये . ७.पंडित जसराज ,पंडित भीमसेन जोशी ,मंगेशकर घराणे ,किशोर कुमार,बैजू बावरा ,श्रेया घोशाल,उदित नारायण ,कुमार सानू,शंकर महादेवन ,हरिहरन,राहुल देशपांडे,अवधूत गुप्ते आणि इतर बऱ्याच मंडळींची गाणी ऐकू नयेत कुठल्याही शो मध्ये ही गाणी म्हटल्यास अथवा ह्यावर नृत्य केल्यास गुण मिळणार नाहीत . ८ .हेमा मालिनी,मिथुन,कमाल हसन,राणी मुखर्जी,काजोल,माधुरी दीक्षित ह्यांचे चित्रपट तथा संवाद घोळवू नयेत. ९.दादासाहेब फाळके ह्या अविचारी ब्राह्मणाने मराठी चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवल्याने शक्यतो मराठी चित्रपट टाळाच.मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये गरजेपेक्षा जास्त ब्राह्मण असल्याने ते बघू नयेत. नटरंग मधली लावणी रेकॉर्ड डान्स मध्ये ग्राह्य धरली जाणार नाही ,कारण ती गुणा कागलकर (अतुल "कुलकर्णी") आणि सोनाली "कुलकर्णी" ने सादर केल्याने विटाळली आहे.सोनाली कडे बघून घायाळ होऊ नये,पाप लागेल. त्याऐवजी आपण मूलनिवासी दैवत म्हणजेच डायनोसोर ह्याचे Jurasic Park with Series मोफत दाखवण्यात येतील ते अवश्य बघा . १०.इंडियन आयडॉल श्रीराम ला मते का दिलीत,तो ब्राह्मण होता आणि त्याने पोवाडे नाही म्हटले ! परत अशी चुकी करू नये . ११.अत्रे,काळे,देशपांडे,जोशी ते मिलिंद बोकील यांची पुस्तके वाचू नयेत,वाचावी लागल्यास विनोदांवर हसू नये,तो शिवधर्माचा अपमान आहे . १२.TVS च्या गाड्या घेऊ नयेत..भले APACHE कितीही चांगली असो ,इन्फोसिस जॉईन करू नये,पेप्सी प्रोडक्ट्स घेऊ नयेत,त्याची संचालिका इंद्रा नुयी ही ब्राह्मण आहे १३.बाबा आमटेंच्या आश्रमातील मूलनिवासी लोकांनी माघारी फिरावे आणि पूर्वी सारखे सन्मानाने स्टेशन,रस्ता,बाग येथे भिक मागत फिरावे.सन्मानाने भिक मागा पण ब्राह्मणाकडे कसले उपचार घेता ? १४.शक्यतो IIT टाळावी,तिथले बरेच प्रोफेसर ब्राह्मण आहेत. तसेच शालेय ,विद्यालयीन आणि महाविद्यालयीन जीवनात जर धडे,कविता हे ब्राह्मण लेखक,कवींचे असतील तर ते टाळा..भले नापास व्हा पण शिवाभिमान दाखवा. हे सध्या नियम दिले आहेत त्यांची कटाक्षाने पाळणूक करावी अन्यथा ...

In reply to by अँग्री बर्ड

भाषेवरुन अजिबात पटणार नाही अशी नियमावली. भटी बामणी कावा, षडयंत्र आणि असेच अनेक शब्दप्रयोग प्रत्येक वाक्याला आणि शिवाय यातील प्रत्येक पात्राचा एकेरी उल्लेख, तोही शक्य तितका तुच्छ / अपमानकारक करुन परत लिहा आणि मग परत सादर करा. तेव्हा कदाचित विश्वास बसेल.

In reply to by गवि

बामणांनी बामणांच्या टिमक्या वाजवायला चालु केलेला अजुन एक धागा ! जरा बामणांना काय बोलले की हे नैनी आणि पेशव्यासारखे लगेच चवताळतात. कधी सुधारणार तुमी बामण ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बामणांनी बामणांच्या टिमक्या वाजवायला चालु केलेला अजुन एक धागा ! जरा बामणांना काय बोलले की हे नैनी आणि पेशव्यासारखे लगेच चवताळतात. कधी सुधारणार तुमी बामण ? आला का "कळीचा नारद" ? ;) काय रे तू विष्णु'चा नारद आहेस की विषाणु'चा नारद आहेस्स? ;) आपल्या जानव्याने दुसर्‍याची शेन्डी ओढण्याचे उद्योग चाल्लेत... बाकी कै नै! ;)

In reply to by मृगनयनी

आला का "कळीचा नारद" ? काय रे तू विष्णु'चा नारद आहेस की विषाणु'चा नारद आहेस्स? आपल्या जानव्याने दुसर्‍याची शेन्डी ओढण्याचे उद्योग चाल्लेत... बाकी कै नै!
झोंबल झोंबल लगेच. आली झाशीची राणी... विषाणुनयनी

In reply to by परिकथेतील राजकुमार

कॄपया त्यांचे णाव आदराने घ्यावे .. त्या " णयणिद ... सद्धा मुक्काम नर्‍हे (मधे नव्हे) " आहेत . :) - पिनय क्रशवाले सर (प्रो. गणीत , भुमिती , प्रमेय - व्यत्यास , पायथागोरस , डेरिव्हेशन , इंटिग्रेशन , पॅरिटी बिट : संत तुकाराम काँव्हेंट शाळा) भुमीती से काटकोन लुंगा

In reply to by टारझन

भुमीती से काटकोन लुंगा
=)) =)) च्यायला ह्या टार्‍याची निनावी तक्रार केली पाहिजे आता. परावडी

In reply to by परिकथेतील राजकुमार

झोंबल झोंबल लगेच. अं हो.. ना!.. आमची त्वचा आणि आमचं मन दोन्ही नाजूकच असतं हो! ;) आम्ही खानदानी ब्राह्मण आहोत! ;) ;) आली झाशीची राणी... आहेच मुळी!... ब्राह्मणांची तेजस्वी कुलदीपिका म्हणून सर्वांत आधी "झाशीच्या राणीचंच" नाव घेतात बरं! ;) विषाणुनयनी हो हो ... अगदी!... आमच्या नयनांतील जादूमुळे म्हणा किन्वा तेजामुळे म्हणा... भले भले.. विषाणु खल्लास होतात ! ;) ________ =)) =)) =)) =)) काय रे प.रा.... तुला तो "आम्हा घरी धन" चावला वगैरे की कंय? ;)

In reply to by मृगनयनी

अं हो.. ना!.. आमची त्वचा आणि आमचं मन दोन्ही नाजूकच असतं हो! आम्ही खानदानी ब्राह्मण आहोत!
झाले स्वतःच्या जातीच्या कौतुकाचे गोडवे सुरु.
आहेच मुळी!... ब्राह्मणांची तेजस्वी कुलदीपिका म्हणून सर्वांत आधी "झाशीच्या राणीचंच" नाव घेतात बरं!
का? बाकीच्या जातीत ज्या श्रेष्ट स्त्रीया जन्मल्या त्या कुलदीपिका नव्हत्या का? ऑ ?
हो हो ... अगदी!... आमच्या नयनांतील जादूमुळे म्हणा किन्वा तेजामुळे म्हणा... भले भले.. विषाणु खल्लास होतात !
_ किती हा खोटा आत्मविश्वास! ;)
=)) =)) =)) =)) काय रे प.रा.... तुला तो "आम्हा घरी धन" चावला वगैरे की कंय?
मला आजकाला बामण दिसलीकीच पिसाळल्यागत होतं. टेक्सास परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा... तू एक मूव्ही काढ... टेक्सास सारखी... परा की पारू किन्वा पारु की जोरू ? ;) किन्वा करू की सरू -पार्ट -२ =)) =)) =)) =)) =)) पण त्या आधी तू एक इन्जेक्शन घे! रेबीजचं! ;) ;) आणि मग पायजेल तेवढा पिसाळ! ;)

In reply to by मृगनयनी

परा... तू एक मूव्ही काढ... टेक्सास सारखी... परा की पारू किन्वा पारु की जोरू ? किन्वा करू की सरू -पार्ट -२
परा कि जवानीच काढतो आता.
पण त्या आधी तू एक इन्जेक्शन घे! रेबीजचं! आणि मग पायजेल तेवढा पिसाळ
अय्यो अय्यो रेबीजचे इंजेक्शन कुत्रा चावलेल्या माणसाला देतात, कुत्र्याला नै कै ;) कुत्र्याचे वेगळे असते; कुठले ते रँबोला विचारुन सांगतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अय्यो अय्यो रेबीजचे इंजेक्शन कुत्रा चावलेल्या माणसाला देतात, कुत्र्याला नै कै कुत्र्याचे वेगळे असते; कुठले ते रँबोला विचारुन सांगतो. घ्या!... बरें झालें... आपले आपल्यांच कळ्ळे तें...! ;) मागच्या जन्मी नक्की एखाद्या बामनाची जमीन तू हडपली असणार!... म्हणून या जल्मी तू कुत्रा बनलास! ;) ;) आणि हो!.. मागच्या जन्मी तुझं एखादं "हॉटेल असणार.... =)) =)) म्हणून या जन्मी तू एखाद्या बुभुक्षितासारखा असतोस!!!! =)) =)) =)) =)) संदर्भः 'तन्नु वेड्स मन्नु' च्या तन्नुस्म्रुती'त हे पूर्वजन्माचं काही तरी वाचल्याचं स्मरतं! ;)

In reply to by मृगनयनी

मागच्या जन्मी नक्की एखाद्या बामनाची जमीन तू हडपली असणार!... म्हणून या जल्मी तू कुत्रा बनलास!
बामनाकडे कसली आली जमिन ? राखायची अक्कल नाही आणि कसायची त्याहून नाही.
आणि हो!.. मागच्या जन्मी तुझं एखादं "हॉटेल असणार.... =)) =)) म्हणून या जन्मी तू एखाद्या बुभुक्षितासारखा असतोस!!!! =)) =)) =)) =)) संदर्भः 'तन्नु वेड्स मन्नु' च्या तन्नुस्म्रुती'त हे पूर्वजन्माचं काही तरी वाचल्याचं स्मरतं!
=)) =)) बभुक्षित काय च्यायला =)) ह्यावरुन फु बाई फु चा एक एपिसोड आठवला. त्यात त्या क्षिती जोगचा डॉक्टर नवरा मार खाऊन घरी येतो. ती त्याला ओळखतच नाही. नवरा म्हणतो "माझ्या डोळ्यात बघ... डोळ्यात बघ." हि त्याच्या डोळ्यात बघते आणि म्हणते "अय्या येवढी वासना ? म्हणजे नक्की तुम्हीच आहात !" फुटलो होतो अक्षरशः =))

In reply to by परिकथेतील राजकुमार

ह्यावरुन फु बाई फु चा एक एपिसोड आठवला. त्यात त्या क्षिती जोगचा डॉक्टर नवरा मार खाऊन घरी येतो. ती त्याला ओळखतच नाही. नवरा म्हणतो "माझ्या डोळ्यात बघ... डोळ्यात बघ." हि त्याच्या डोळ्यात बघते आणि म्हणते "अय्या येवढी वासना ? म्हणजे नक्की तुम्हीच आहात !" =)) =)) =)) यावरून एक गोष्ट लक्षात येते... ती म्हणजे... "डॉक्टर्-लोकांच्या नजरेत नेहमी वासना असल्यामुळे ते बाहेरून मार खाऊन येतात! " ;) ;) ;) टीपः कुणीही वैयक्तिक घेऊ नये! ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

खेडेकरांच्या पत्नी १५ वर्षे भा ज प आमदार होत्या,आताही भा ज प च्या मोठ्या पदावर आहेत.

In reply to by मालोजीराव

'रेखा पुरुषोत्तम खेडेकर' या बुलढाण्यातील चिखली या गावी भा.ज्.प.च्या आमदार होत्या.... पण त्यान्च्या साठीला आलेल्या नवर्याने शिवधर्माची स्थापना केल्यावर बाईन्ची भाजपा'तून हकालपट्टी झाली... सध्या रेखाबाई... भाजपा'त कोणतेही पद भुषवित नाही. कृपया नोन्द घ्यावी! :)

In reply to by मृगनयनी

भा.ज्.प.च्या आमदार होत्या
मी पण होत्याच म्हणालो होतो. पण त्या बाई अजूनही पदाधिकारी आहेत,केवळ संघाच्या विरोधामुळे भाजप ने तिकीट नाकारलं..हकालपट्टी झाली नाही....आणि तिथे भाजप उमेदवाराने २५००० मतांनी आपटी खाल्ली... पुढच्या टर्म ला पण त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह मुंडे-फुंडकरांनी धरलाय.जर पक्षच ब्रिगेडी विरुद्ध एकजूट नसेल तर सामान्य माणसाने काय करावं

In reply to by परिकथेतील राजकुमार

बामणांनी बामणांच्या टिमक्या वाजवायला चालु केलेला अजुन एक धागा ! सहमत आहे. सर्व ब्राह्मणांना भारतातुन हाकलुन लावल्याशिवाय देशाची प्रगती होणे अशक्य आहे. ना ना काळुंखे

In reply to by गवि

पूर्ण पणे सहमत.. शिवाय ह्या सगळ्या वाक्यांचा अर्थ लागतोय... कुठेही शिवाजी महाराज आणि जिजाऊ ह्यांचा उल्लेख नाहीये... आणि ब्राह्मणी वर्चस्व झुगारून देण्याची प्रतिज्ञा?? ती कुठाय??

In reply to by अँग्री बर्ड

सदर प्रतिसाद, ओर्कुट वरच्या मुक्तपीठ या समूहातल्या एका चार्त्चेतून जशास तसा उचलेगिरी करून टाकलेला आहे लेखिका आय थिंक मृण्मयी तांबे

वरची चर्चा बर्‍याच वेळापासून वाचतो आहे. काही गोष्टींची नवीन माहिती मिळाली आणि काहींमुळे मनोरंजनही :). पण हा विषय जितका समजला जातो, तितका छोटा नाही. जे आपल्याला सध्याचं स्वरूप दिसतं, तो हिमनगासारखा त्याचा पाण्यावरचा भाग आहे (याच्या विचारांचे पेपर निघतात, ऑर्कुट कम्युनिटी आहेत, त्याचे विचारवंत आहेत, राजकीय, सामाजिक व वैचारिक आघाड्या आहेत, अनेक सुशिक्षित लोक याच्या कार्यात सहभागी आहेत इ.). मृगनयनीशी सहमत की, तो दुर्लक्ष करून नाहीसा / कमी होण्यासारखा नाही (कारण त्याला राजकीय पाठिंबा आहे+तो अतिजुन्या १००-१५० वर्षांपूर्वीच्या जातिभेदाच्या पायावर उभा आहे.); किंबहुना दुर्लक्ष केल्यामुळेच तो आताएवढा मोठा झालेला असण्याची शक्यता बरीच आहे. पण म्हणून त्यांना शिव्या घालून तो कमी होईल हीही शक्यता नाही. या वादामध्ये जे (इतर समाज) चुकीच्या ज्ञानाच्या आहारी जाताहेत, तेही आपलेच लोक आहेत. तस्मात्, त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना त्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. (इथे भाबडा/टोकाचा गांधीवाद अपेक्षित नाही, ही खरी मराठी समाजाची गरज आहे.) पूर्वी हा अतिरेकी ब्राह्मणविरोध फक्त भावनिक पातळीवर व्यक्त होत होता (गेल्या काही वर्षांपर्यंत). सध्या पुस्तकं, पुतळा हटवणं, व्याख्यानं देणं 'हे' जे चालू आहे; ते त्याला तात्विक अधिष्ठान देणं. कोणत्याही चळवळीला 'तात्विक अधिष्ठान देणं' ही एक मोठी गोष्ट असते, जी तिला बुध्दीच्या पातळीवर नेऊन ठेवतं, ज्याकडे समाजातला वरचा (सुशिक्षित) वर्ग कुतूहलाने पाहतो आणि खालचा (अशिक्षित) वर्ग श्रध्देने. त्यामुळे तिला नवीन आवाका, सामर्थ्य मिळतं. आता हा राडा वाटत असला, तरी करणारे ते चळवळ म्हणून करत आहेत; त्याची उद्दिष्टं, परिणाम, गृहितकं, साधनं काहीही सगळ्या मराठी समाजाच्या दृष्टीने चूकीचं असलं तरी. आता मराठी समाजासाठी बरोबर/चूक काय हे ठरवताना मला ब्राह्मण/मराठे कोणातरी एकाची बाजू घ्यायची आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. याच्या पलिकडे समाज आणि राष्ट्रासाठी कल्याणकारक अशी एक नीती/बाजू/गोष्टी असतात, त्या अपेक्षित आहेत (त्या कोणत्या, ते छ. शिवाजी महाराज/टिळक यांच्या कार्याचा अंदाज घेतला की लक्षात येऊ शकतात). असो. आत्ता या गोष्टीचा विचार करताना हे बघणं गरजेचं आहे असं वाटतं की, १. ही चेष्टेवारी नेण्याची, दुर्लक्ष करून कमी होणारी गोष्ट नाही. चुकीच्या कोणत्याही छोट्या/मोठ्या गोष्टीकडे (विशेषत: सामाजिक बाबतीत) दुर्लक्ष करणं बरोबर नाही. २. ही चळवळ आता पूर्वीपेक्षा जास्त जोरात आहे व ती वैचारिकदृष्ट्या व आचरणदृष्ट्या ब्राह्मण/मराठा/इतर व एकंदर भारतीय समाजासाठीही योग्य नाही. ३. ब्राह्मणेतर समाजातील इतर अनेक समाज अजूनही खरंच अतिखालावलेल्या अवस्थेत आहेत (उदा. पारधी समाज), आणि ती सुधारल्याशिवाय अशा चळवळीला मिळणारा आंधळा पाठिंबा कमी होणार नाही. पण एकट्या ब्राह्मणसमाजावर त्याची जबाबदारी नाही, सगळ्या मराठी समाजांवर आहे (ब्राह्मणसमाजाकडे फारसं सामाजिक, राजकीय बळ आता नाही, ही गोष्ट इथे लक्षात घ्यावी). ४. सगळ्या मराठी समाजाचं हित व्हायचं असेल, तर या चळवळीचा प्रतिवाद बुध्दीच्या साधनाने, मिडियाच्या साधनाने (योग्य व सत्य ज्ञान पुराव्यासह वरच्या ते खालच्या समाजापर्यंत प्रसारित करून), जातिभेदाची भावना आपल्या पातळीवर कमी करून करणं गरजेचं आहे. ५. सुशिक्षित समाजाने सामाजिक गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं. यथानुशक्त्या योग्य प्रकारे, जमेल तितकं/तेव्हा चांगल्या गोष्टी करणं/पाठिंबा व्यक्त करणं आणि वाईट गोष्टी न करणं/विरोध व्यक्त करणं गरजेचं आहे. ही चळवळ व अशा गोष्टींचं मूळ त्यात आहे.

In reply to by अमित देवधर

अप्रतिम प्रतिसाद .. एकदम बरोबर .. समस्त मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे ही कळकळ आहेच .. फक्त मराठा.. ब्राम्हण .. माळी .. कोकणी .. घाटी ... अशी जातीय आणि राहत्या जागेवरुन भांडने करणारी लोक पाहिली की अतिशय वाईट वाटते .. आणि असे कित्येक धागे ठोस मार्ग न दाखवता आपापसात आपण कसे कुठल्या जातीचे आणि ते कसे चुकीचे यात अडकतात तेंव्हा कीव येतेच.

ब्रिगेड या नावाखाली होनारे प्रताप बघुन फार वाईट वाट्ते . सन्ताप याचा येतो कि मोठे म्हणवणारे पुढारी मूग गिळुन आहेत. मी एक मराठा आहे. पण हे विषारी विचार प्रसवणारे या समाजचे असुच शकत नाहित.दादोजी...हटवले गेले.. ते कोणी देशद्रोही होते का ? अतिरेकी ब्राह्मणविरोध करता, पण हेही लक्शात असावे की ज्या इतिहासा चा गर्व करता तो ब्राह्मणा नी जतन केलाय . समाजाच भले करायचे असेल तर अजुन ही खुप काही करता येइल. मला खात्री आहे की समस्त मराठा समाज्या एक सहस्रा ने हि याच्या मागे नसेल.

In reply to by अशोक पतिल

समस्त मराठा समाज यांच्या मागे नाही हे माहित आहे, पण मराठा समाजातील मान्यवर पुढे येऊन यांचा जाहीर विरोध का करत नाहीत हा प्रश्न मला पडला आहे. (हे तिरकस पणे नाही लिहिले, मला खरच कळत नाही आहे)

तुम्हाला ० मार्क . तांबे बाई माझ्या प्रोफाईल वर आहेत,हे मुद्दे लिहून मी माझ्या नोट्स मध्ये टाकले होते आणि मग मी संभाजी ब्रिगेड ला टाकले होते . ते मुद्दे सगळीकडे पसरलेत .. वहात शौल्द आय डॉ

In reply to by अँग्री बर्ड

"वहात शौल्द आय डॉ.." क्लास !! =)) या वाक्यावर चुचु आणि प्रविनभप्करचे पन्नास प्रतिसाद ओवाळून टाकले !!

In reply to by ज्ञानेश...

>>या वाक्यावर चुचु आणि प्रविनभप्करचे पन्नास प्रतिसाद ओवाळून टाकले !! हीहीही !!! अरे काल मी खूप प्रयत्न केला पण ते वाक्य कळले नव्हते. आज हा प्रतिसाद वाचून परत प्रयत्न केला, मग कळले.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

त्यांना, 'व्हॉट शुड आय डू' असे मराठीत लिहायचे होते असे ५ सदस्यीय तज्ज्ञ समितीच्या पुष्कळ निरीक्षणाअंती समजले असे आमचा वार्ताहर कळवतो. मेंदूवरील अतिताणामुळे समितीतील दोघे येरवडा येथे तर एक ठाणे येथे उपचारासाठी गेले आहेत. दोघे बेपत्ता आहेत.

In reply to by प्यारे१

हे आम्हास माहिती आहे . पण गुगल ट्रान्सलेशन ची मजा अनुभवायची असेल तर सरळ धोपट लिहिण्यात काय अर्थ आहे हो

In reply to by ज्ञानेश...

आई ग... "वहात शौल्द आय डॉ.. म्हणजे.. "व्हॉट शुड आय डू?" ... निदान १० वेळा वाचले... अर्थ लावण्यासाठी! अहो... ५० काय ५०० प्रतिसाद ओवाळून टाकावेत इअतकं सुंदर आहे ते वाक्य!

ब्रिगेडच्या शेणापतीची बायको बीजेपीची आमदार होती. म्हणजे ब्रिगेडला आतल्या हाताने बीजेपीचा पाटिंबांच असला पायजे. शेणेने साथ सोडली तर ब्रिगाडवालेच कामाला येतील. कोनीतरी राडेबाज लोक आपल्याबरोबर पायजेत ना. शेवटी राजकारन महत्वाचं बाकी सब झूट. तत्व वगेरे. शेणेने दलीत आणि मुसलमाणांना बरोबर घेतलं म्हनजे आपलं कसं जमनार ? मग आपली बी ब्रिगेड पायजे म्हनून बीजेपीचं कारस्थाण चाललेलं हाये.