मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोबीची भजी

कच्चा पापड पक्का पापड · · पाककृती
उरलेली कोबीची भाजी, ह. डाळिचे पीठ, तिखट, मीठ, बारीक चिरलेला का॑दा, आल लसुण पेस्ट, १ अ॑ड . उरलेली कोबीची भाजी मिक्सर मधे बारीक करुन घेणे. . वरिल सर्व पदार्थ भाजी मधे घालुन गरम तेलात भजी तळणे. . . .

वाचने 6953 वाचनखूण प्रतिक्रिया 12

टारझन Sat, 02/26/2011 - 16:33
पुरातन काळात जेंव्हा आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही होता आणि फक्त दुरदर्शन हीच वाहिणी यायची , तेंव्हा मुकबधीरांसाठी खास बातम्या येत असत त्यात सगळं पाहुन ( साइन कन्व्हेण्शन्स) बातम्या समजुन घेता येत , ही पाककृती वाचन दृष्टया विकलांगांनाही समजावी म्हणुन एक अभिनव प्रकारे मांडल्या गेली असल्याने पाककृती क्षेत्रात मैल्याचा दगड ठरावी . बाकी आधी ही "कोदा ची भजी " आहे असे वाटल्याने दोन सेकंद रोचक वाटुन गेले . - कच्चा कच पक्का पक

रेवती Sat, 02/26/2011 - 19:19
अंडे? ही भजी अंडे न घालता मस्त होतात. माझ्या लग्नाच्या केळवणाला सगळ्या जेवणाबरोबर मैत्रिणीच्या घरी ही भजी केली होती. त्यानंतर तितकी चांगली भजी खाल्ली नाहीत. तुमच्या फोटोतील भजी जरा मध्यम आचेवर तळायला हवी होती काय?

In reply to by रेवती

माझ्या लग्नाच्या केळवणाला सगळ्या जेवणाबरोबर मैत्रिणीच्या घरी ही भजी केली होती.
ती उरलेल्या भाजीची नसवीत अशी आशा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो.

In reply to by मुलूखावेगळी

स्वाती२ Sun, 02/27/2011 - 17:04
आमच्याकडेही नैवेद्याच्या स्वयंपाकात तसेच चातुर्मास पाळणार्‍यासाठी कोबीची भजी करतात. कोबी बारीक चिरुन त्यात हळ्द, तिखट, मीठ घालून साधारण अर्धा तास ठेवायचे. कोबीला पाणी सुटते त्यात मावेल इतपत पीठ आणि अगदी थोडे पाणी घालून पीठ भिजवायचे. मस्त खेकडा भजी होतात.