लेखकसानिकास्वप्निलयांनी शनिवार, 26/02/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
१ कप दूध
१ कप डबल क्रिम
१/२ कप साखर३ टेस्पून जिलेटीन पावडर
२ टेस्पून व्हॅनिला ईसेन्स
२ टेस्पून पाणी
रास्पबेरी सॉस चे साहित्यः
२ कप रास्पबेरी
१/४ कप साखर
१/२ टेबलस्पून लिम्बाचा रस
कृति
जिलेटीन पावडर थोड्या थंड पाण्यावर भुरभुरा व ते फुलण्यासाठी ५ मिनिटे बाजुला ठेवा.
एका भांड्यात दूध, डबल क्रिम आणि साखर एकत्र करुन एक उकळी आणा.
माएक्रोव्हेव मध्ये जिलेटीन पावडर १२ सेकंदासाठी ठेवून वितळवून घ्या.
गॅस बंद करून दूधाच्या मिश्रणामध्ये व्हॅनिला ईसेन्स आणी जिलेटीन पावडरचे मिश्रण घाला व नीट एकत्र करा.
रॅमॅकिन पॉट मध्ये मिश्रण ओतून फ्रिज्मध्ये सेट होण्यासाठी कमीत कमी ४-५ तास ठेवा.
सॉसची कृति
रास्पबेरी, साखर आणि लिम्बाचा रस एकत्र करून गॅसवर ठेवा. रास्पबेरी वितळून एकजीव झाली की गाळ्णीतून गाळून घ्या.थंड होउ द्या.
पॅन्ना कोटा ला डीमोल्ड करा एका प्लेटमध्ये. त्यावर रास्पबेरी सॉस ओता. वर रास्पबेरी आणि पुदिन्याचे पान लावुन खायला सुरूवात करा :)
माफ करा....
रॅमॅकिन पॉट म्हण्जे सिरॅमिक किन्वा काचे चे छोटे बाउल ( वाट्या) जर का तुम्च्याकडे हे बाउल नसतील तर तुम्ही वाट्या ही वापरू शकता :)
डीमोल्ड चा अर्थ असा की एकदा का पॅन्ना कोटा तयार झाले कि ते एका ताटलीत वाटी उलट करून हलके आपटून काढणे.
मला हा प्रकार खूप आवडतो.
पूर्वीच्या घराजवळच्या हाटेलात चांगला मिळायचा.;)
मेन्यु बदलणार होता तेंव्हा त्या लोकांना आम्हाला आधी सांगितले.
त्यांचा शेवटचा पेन्ना कोटा मला मिळाला होता......नंतर नाही.
तुम्ही दिलेला फोटू ग्रेट आलाय.
डबल क्रिम मध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असल्यामुळे त्याचे व्हिपक्रीम चांगले होते.
क्रिमबद्दल इथे तुम्हला जास्त माहिती मिळु शकते http://whatscookingamerica.net/Sauces_Condiments/CreamDefinitions.htm
वरच्या पाकृमध्ये तुम्ही हेविक्रिम देखिल वापरु शकता आणी हो रास्पबेरी नसेल तर ब्ल्यूबेरी ही चालतील :)
प्रतिक्रिया
डीमोल्ड = ???
वाऊ , स्ट्रॉबेरी इज माय
डीमोल्ड = ???
स्ट्रॉबेरी नसून ती रास्पबेरी आहे :)
खूलाश्याबद्दल धन्यवाद
फोटो तर खुप्प् मस्त .
धन्यवाद :)
वाट्या कुठल्याही चालतील :)
मस्त!
मस्त
मला हा प्रकार खूप
मस्तच! एका नव्या डेसर्ट ची
फटू एकदम मस्त
छान दिसतोय हा प्रकार
डबल क्रिम