Skip to main content

अ‍ॅपल पुडींग

लेखक स्नेहश्री यांनी शनिवार, 26/02/2011 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज विकेंड.. त्याची तयारी मात्र काल पासुन सुरु केलीय. आज आमच्याकडे मुंज मुलाला केळवण आहे. त्याला आवडेल अस पुडींग आणि अजुन एक डेझर्ट्चा प्लान आहे. एक पुडींग रेडी आहे.. आणि डेझर्ट् रेडी होत आहे. तर आज पुडींग ची रेसिपी देते. साहित्यः ४/५ सफरचंद ३/४ चमचे साधी साखर (सफरचंदाच्या गोडी नुसार) १०/१२ मारी बिस्कीटाचा चुरा व्हिप्ड क्रीम २ चमचे पिठीसाखर व्हॅनिला इसेंस स्ट्रॉबेरी क्रश सजावटीसाठी:- चेरी, द्राक्ष, जेम्सच्या गोळ्या, चॉकलेट सॉस. कृती: १. सफरचंदाची साले काढुन ती किसुन घ्यावीत २. त्यात साधी साखर घालुन गॅसवर साखर वितळे पर्यंत ठेवावीत मग गॅस बंद करवा व ते मिश्रण थंड होवुद्यात व नंतर त्या मध्ये व्हॅनिला इसेंस घाला ३. व्हिप्ड क्रिम हलके होईपर्यंत फेसुन घ्या. ४. त्याचे दोन भाग करा दोन्ही भागात पिठीसाखर व व्हॅनिला इसेंस घाला ५. एका भागात स्ट्रॉबेरी क्रश घालुन घ्या व दोन्ही क्रिमचे भाग फ्रिज मध्ये थोडे गार होवु देत. ६. ज्यात पुडींग सेट करायचे आहे असे काचेचे भांडे घ्या. ते फ्रिज मध्ये आधीच थोड्यावेळ ठेवुन घ्या. ७. आता त्या भांड्यात १/२ सफरचंदाचे मिश्रण घाला व वरती १/२ बिस्कीटाचा चुरा दाबुन बसवा. ८. त्यावर पांढरे व्हिप्ड क्रिम पसरा व सारखे करुन घ्या. ९. परत उरलेले सफरचंदाचे मिश्रण घाला व वरती उरलेला बिस्कीटाचा चुरा दाबुन बसवा. १०. आता वरती स्ट्रॉबेरी क्रश घातलेले क्रिम पसरा व ते सारखे करुन घ्या. ११. त्यावर चेरी, द्राक्ष, जेम्सच्या गोळ्या, चॉकलेट सॉस ने साजावट करा १२. आता भांडे सिलिंग फाईल ने झाकुन ७/८ तासा साठी सेट करा. व नंतर त्याचा आस्वाद घ्या. काही चित्रे. apple puding1 puding2 puding3 puding4

वाचने 7738
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्तं आणि सोप्पी पाकृ . सजावटदेखील छान दिसतेय :)

मस्त !आणि काहीतरी नविन ,छानच!

वाह

आवडलच. श्रावणात एखाद्या यजमानानी शिय्राऐवजी हा असला प्रसाद ठेवला तर किती सोय होईल? त्या शिय्राला कं-टाळलेल्या सत्य नारायणाची, आणी माझीही..! ;) ह्ही ह्ही ह्ही! =))