नुकतीच एक बातमी वाचली. https://www.dailymail.co.uk/news/article-1357886/Taxi-driver-slammed-ju…
त्याबातमीतले रोचक वाक्य -
'These are serious matters and custody appears to be appropriate in this case,' said the judge.
'Also what troubles me, although it's not something that bears on sentence, [is that] he has been her for nigh on 20 years and he requires an interpreter.
'I suspect he lives within his own community and has never bothered to learn English.
'It is highly desirable that those who come to this country from abroad integrate, rather than live isolated within their own community.'
मिपाकरांचे मत जाणुन घेण्यासाठी काथ्याकुट.
म्हणूनच कालपासुन मिपावर आंग्ल शब्द दिसत आहेत का? ;)
वाचने
3651
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यो प्रश्न काल पासुन पड्ला
ह्यो प्रश्न काल पासुन पड्ला होता....त्याच अत्ता उत्तर मिळालं......
मिपा काळाबरोबर राहण्याचा
मिपा काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करत आहे बहुतेक . ;)
काही तांत्रिक कारणामुळे आणि काही मुद्दामहून. :)
अशुद्धलेखन
अशुद्धलेखनामुळे मराठीवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी उचललेले हे योग्य पाऊल आहे. पुर्वदृश्य वगैरे अशुद्ध शब्द गेल्यामुळे बरे वाटले.
अच्छा ! म्हणजे ही तांत्रिक
In reply to अशुद्धलेखन by आजानुकर्ण
अच्छा ! म्हणजे ही तांत्रिक समस्या नाहीतर !
मिसळपावच्या तांत्रिक समितीची शुद्ध (!) मराठीच्या रक्षणासाठी स्वतःला कटिबद्ध करवुन घेत प्रगल्भतेकडे जोमाने वाटचाल चालु असलेली पाहून डॉळे प्वाणावले.
शुध्दलेखनाचे उमाळे
ज्यांना शुध्दलेखनाबद्दल अतीउमाळे आहेत त्यांना तात्यांनी याआधीच सडेतोड उत्तर दिले आहे. जुण्या जाणत्या सदस्यांना ह्याबद्दल अज्ञान असेल असे वाटत नाही. तरी सुध्दा त्यांना शोध घेता येईल. मिपाचा शोध चालला नाही तरी गुगलबाबाने मिपाची आवृत्ती ठेवलेली असेलच.
सबब मिपावर यापुढे शुध्दलेखनाच्या नावाने गळे काढू नये आणि मिपाची काळजी घेण्यासाठी संपादन आणि व्यवस्थापन मंड़ळ सक्षम आहे. याची खात्री बाळगा व असे धागे सुध्दा काढू नका.
- नीलकांत
जेब्बात. केवळ या मुळेच शुद्ध
In reply to शुध्दलेखनाचे उमाळे by नीलकांत
जेब्बात.
केवळ या मुळेच शुद्ध लेखनाची बोंबाबोंब असुनही आम्ही अजुन येथे टिकुन आहोत. :)
मुबारक
In reply to शुध्दलेखनाचे उमाळे by नीलकांत
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा.
जुना सल
In reply to मुबारक by पंगा
जुना सल अजुन खुपतोय ?
धन्यवाद
In reply to जुना सल by आनंदयात्री
आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आणि प्रगल्भतेचा आदर आहे.
अवांतरः मिपावरच्या
अवांतरः मिपावरच्या मुखपृष्ठावरच्या भिमण्णाम्च्या चित्राखाली ते चित्र कोठून आले आहे याचा उल्लेख कुणीच का करत नाही
Right click
In reply to अवांतरः मिपावरच्या by विजुभाऊ
त्या चित्रावर उजवी टिचकी मारून, व्ह्यू इमेज असे केले की ते चित्र योग्य जागी उघडते. तिथे ते चित्र कोठून आले आहे हे कळेल.
वैयक्तीक विचारणा करावी.
मिसळपावच्या व्यवस्थापनाबाबत काही अडचण असेल तर वैयक्तीक विचारणा करावी.
अडचण विचारणारे सदस्य जुणे व जाणते असल्यामुळे कुठे आणि कुणाला याची सविस्तर माहिती येथे देत नाही.
- नीलकांत
खुलासा
In reply to वैयक्तीक विचारणा करावी. by नीलकांत
वरती धाग्यात दोन विषय अंतर्भुत आहेत.
वरती दिलेला परिच्छेद ज्या घटनेविषयी आहे त्या घटने बद्दल मिपाकरांचे मत काय आहे हा प्रमुख विषय जो
या वाक्याने दर्शवला आहे.
चर्चा केवळ जड शब्दांनी एकसुरी आणि अति गंभीर होऊ नये ह्या साठी किंचित नर्म विनोदी
हे वाक्य.
अशा प्रकारे एकात एक दोन चर्चा व्हाव्यात असा प्रयत्न होता. बहुदा एकंदरीत आमची प्रगल्भता थोडी कमी पडली असावी असे वाटते. असो.
मपले पन ह्येच वाटत होत्...का
मपले पन ह्येच वाटत होत्...का मल्लच सगलं विंग्रजी दिसून राह्यलंय की काय....
मिपावरच लै घसरू राह्यले
मिपावरच लै घसरू राह्यले लोकं.
गदारोळात मूळ मुद्दा राह्यला की बाजूला राव! खरं म्हणजे दोन मुद्दे.
१) या जज्जवाणीच राज ठाकरे म्हणतात भैय्यांनी मराठी शिकलं पाहिजे तर त्यात काय चुकलं?
२) बघा हे लोकं. साह्यबाच्या देशात राहूनपण त्यांच्या भाषेला तोंड नाय लावलं. नाय तं आपले, निघाले लगी लोटा घीऊन वाघिणीचं दूध प्यायला अन आता आपल्याच गावात आगंतुकांसाठी हिंदी बोलायला.
धागा फक्त तुम्हालाच समजला !
In reply to मिपावरच लै घसरू राह्यले by नगरीनिरंजन
धागा फक्त तुम्हालाच समजला !
व्वा ह ननी!! सह्ही बोललात!
In reply to मिपावरच लै घसरू राह्यले by नगरीनिरंजन
व्वा ह ननी!! सह्ही बोललात!