माननीय नितीन काकांनी नुकताच भाषेवर एक लेख लिहून बरीच करमणूक केली. हसून हसून पोट दुखले. त्या लेखाच्या विडंबनाचा प्रयत्न करत आहे.
तसे आम्ही जात्याच नुर्बुद्ध. तरीसुद्धा हे विडंबन गोड मानून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे.
भारतातल्या राजकीय क्षेत्राचा आता (फ़ार चांगला) काल आला आहे. या पुढच्या काही महिन्यात अनेक पक्षांकडून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील.
त्यावेळी तुमची आणि तुमच्या कौशल्यांची माहिती सीव्ही मधून विचारली जाईल आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची बोलण्याची भाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये 'त त प प' भाषा न विसरता लिहा.
पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा कधीकधी वापरतो. व्यवहारात वापरली जाणारी हि भाषा 'त' व 'प' दोन चिह्नांनी बनलेली असते तसेच भारतातील मोठे मोठे पदावरील व्यक्ती सुद्धा या भाषेचा उपयोग करताना दिसतात.
हि 'त त प प' ची भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. एका जाहीर सभेत जुनी जाणकार मंडळी वगळता कोणीही 'त त प प' भाषा शिकण्याच्या मानसिकतेत नाही आणि त्यामुळे या भाषेला आउटडेटेड (कालबाह्य) समजले जावू शकते.
भारतातील सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या भाषेत दिली जाऊ शकतात. (किंबहुना दिली गेलेली आहेत.) तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो.
भारतासारख्या महान देशात उच्च पद मिळविण्यासाठी हि भाषा किती लाख मोलाची ठरू शकते हे तुम्हाला खाली दिलेले दोन व्हिडियो बघूनच समजून येईल. या व्हिडियो मध्ये सुप्रसिद्ध वक्त्याने 'त त प प' भाषेचा वापर करून आपल्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक प्रश्नाचे ठोस उत्तर दिले आहे.
व्हिडियो क्र. १ ) http://www.youtube.com/watch?v=nXdBPPHZXh0
व्हिडियो क्र. २ ) http://www.youtube.com/watch?v=ZDJFBFYr720 (पहिले ३० सेकंद प्रत्येक भारतीयाने पाहीलेच पाहीजे)
व्हिडियो खूप मोठे आहेत, पण अगदीच वेळ नसेल तर दुसर्या क्र. चा व्हिडियो फक्त पहिले ३० सेकंद नक्की चालवून पहावा, आणि त्यात वक्त्याने 'त त प प' च्या भाषेत दिलेले उत्तर पाहून अगदी कोणीही हरखून जाऊन याच्या प्रेमात पडेल. मी देखील असाच या भाषेच्या प्रेमात पडलेलो आहे. आणि आजपासून मी माझ्या resume मध्ये ह्या भाषेचा उल्लेख करण्यास सुरुवात केलेली आहे.
ज ज जर त त तुम्हाला हा विचार प प पटत असेल त त तर जरूर अ अ आपल्या मित्रांना सुद्धा स स सांगा.
ध ध धन्यवाद.
वाचने
2193
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
हॅ हॅ हॅ
पण...
In reply to हॅ हॅ हॅ by प्रचेतस
त्यांच्याकडे पाहिल्यावर Accidental hero या चित्रपटाची आठवण होते