प्रेम कथा म्हणजे नक्की काय?
खरी प्रेमकथा नक्की कशी असते.
इथे प्यासा चित्रपटाच्या चर्चेवर कोणीतरी प्यासा ही प्रेमकथा आहे किंवा नाही असा आक्षेप घेतला आहे.
काहीजण "रजनीगंधा ,अॅपॉकॅलेप्टो ,आंधी , सुजाता इत्यादींचा उल्लेख केला आहे.
एकाने तर " पिंजरा" हा प्रेमकथा असलेला चित्रपट आहे असे देखील सांगितले आहे.
हिंदी मराठी भारतीय चित्रपटात नायकाला नायीका असणे हा एक आवश्यक घटक मानलेला आहे.
नायक नायीकेचे प्रेम हाच एक निकष लावायचा ठरला तर महल , चलती का नम गाडी ,पाकीझा , रझीया सुलतान , ( चोरी चोरी ( मूळ चित्रपट रोमन हॉलिडे ),हाथी मेरे साथी ,क्रान्ती , देस परदेस ( मूळ चित्रपट :माय फेअर लेडी) , पासून , अंधा कानुन , अंदाज अपना अपना ,शोले, शान पासून ते लगान,जाने भी दो यारो ,कथा ,जब वी मेट , चिनी कम ,
३ इडिअट्स ,सिवाजी द बॉस , रोबोट पर्यन्त सर्वच चित्रपट प्रेमकथा मानावे लागतील.
संपूर्ण रामायण ही तर अभिजात प्रेमकथा मानावी लागेल.
माझ्या मते प्रेम कथा म्हणजे चित्रपटात नायक नायीकांमधील फुलत जाणारे प्रेम हा मुख्य विषय असावा. प्रेम प्राप्त करण्यासाथी नायक नायीकांच्या स्वभावात/ वागण्यात बदल होतो. नायकाला नायीका ऑर व्हाईस व्हर्सा स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत करते स्वाभीमान देते . पण जे काही घडते ते प्रेमासाठीच.
सूड / पैसे मिळवणे / खानदान का बदला वगैरे मुख्य मुद्दे दाखवून यातून प्रेम वगैरे चटणी प्रमाणे वापरलेली कथा ही प्रेमकथा होणार नाही.
राजेश खन्नाचा "आनन्द" ही कथा चांगली आहे पण प्रेमकथा होत नाही. ३ इडिअट्स ही देखील प्रेम कथा नाही , बातोबातो मे , छोटीसी बात चलती का नाम गाडी , या प्रेमकथा नाहीत.
रजनीगंधा ही एका तरुणीच्या मनातील हिंदोळ्यांची कथा होते , त्यातील नायक अथवा नायीका प्रेमासाठी काहीच करत नाहीत. ( अमोल पालेकर निशीगंधाची फुले आणतो इतकेच)
आंधी मध्यमवयीन जोडप्याची ही प्रेमकथा होते.
अमिताभ बच्चन च्या चित्रपटात प्रेमकथा असावा असा एकमेव चित्रपट "चिनी कम"
जब वी मेट हे थोडी वेगळ्या धर्तीची कथा आहे. नायीकेचे प्रेम नसतानादेखील नायकात झालेला बदल नन्तर नायकाने नायीकेला तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी केली मदत हे त्या कथेला वेगळ्या धर्तीची प्रेमकथा बनवतात.
" दिल , मैने प्यार किया , ( आणि राहुल रॉय, अनु अग्रवाल चा तो कोणता चित्रपट नाव आठवत नाही)
एक दुजे के लिये हा चित्रपट मला अस्सल प्रेमकथा वाटतो.
मैने प्यार किया हा चित्रपट प्रेमकथा आहे.
मराठीत या बाबतीत तशी बोंबच आहे.
असे काही चित्रपट मग ते विनोदी असोत की गंभीर काही अस्सल प्रेम कथा तुम्हाला आठवताहेत?
वाचने
7652
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अलिकडेच पाहिलेला सिणेमा "येह
"येह साली झिंदगी "
In reply to अलिकडेच पाहिलेला सिणेमा "येह by टारझन
कांती शाह के अंगुर ??? बाकि
श्री श्री श्री टारझन यानी
होतकरु णक्की आपण तर नाही ना ?
In reply to श्री श्री श्री टारझन यानी by विजुभाऊ
मचाक म्ह्न्जे काय रे
In reply to होतकरु णक्की आपण तर नाही ना ? by टारझन
वय वेड असते !
तुझे मेरी कसम, RHTDM
तुझे मेरी कसम +१००
In reply to तुझे मेरी कसम, RHTDM by वपाडाव
"साथिया" विसरलात?
"वीर झारा"
विर झारा सारखा बावळट आणि
अगदी असंच वाटलेलं ४ वर्षापूर्वी
In reply to विर झारा सारखा बावळट आणि by टारझन
@आणि राहुल रॉय, अनु अग्रवाल
लव्ह स्टोरी ही एक प्रेमकथा
तसे म्हणाल तर...
रजनीगंधा :)
लागा चुनरी मे दांग
देव डी?
LSD नको का?
In reply to देव डी? by नगरीनिरंजन
मला सत्या (चक्रवर्ती, उर्मिला
ओंकारा व मकबुल मधली
आडवले... एकदम... ऑफबीट
In reply to ओंकारा व मकबुल मधली by ५० फक्त
राईट हो मला आवडलेला एकदम
In reply to आडवले... एकदम... ऑफबीट by वपाडाव
छोटी सी बात
सेम टू सेम
In reply to छोटी सी बात by असुर
अत्यंत सहमत ....
In reply to सेम टू सेम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूप खूप आवडतो हा चित्रपट.
In reply to छोटी सी बात by असुर
भावनेपेक्षा कर्तव्य थोर असते
कर्तव्यापेक्षा भावना थोर असते
"अनुभव" म्हणजे तोच
तोच तोच हो. पण त्यात पद्मा
In reply to "अनुभव" म्हणजे तोच by विजुभाऊ