लहानपणी ज्या ज्या लोकांनी आम्हाला मारहाण केली त्या सार्यांना सप्रेम सादर :
प्रेरणा अर्थात ही
पाठीखालच्या भागावर
बसलेले अनेक रट्टे
दात लहानपणी गोट्या खेळतांना पाडलेले,
क्रिकेटच्या स्टंपने फोडताना कधी,
तर कधी उगाचच.
बापाचे बाहु बुकलण्यासाठी आतुर झालेले.
चुकार आयशी मधूनंच ,
मार देत फुकणी परजत,
आणि
झाडणीने अंगभर सडकत
मारताना वेळेचे भान नसे.
अकलेचा कांदा असल्याच्या
सबबीवर मुस्काट फोडताना
पोटात मारलेल्या बुक्क्या अन
हाताला लागलेला
खडू अंगभर पसरत असे.
आता स्वतः बाप झाल्यावर
पोरासोरांना बुकलताना
उगाचच पाय कुठेतरी पाय मुरगळतो,
बोट-बीट सुजतं
आणि
मूव्ह लावल्याचा वास
जाता जात नाही.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2327
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ, ह्या तीनही
ये धत्तड तत्तड धत्तड
ढब
कडक !
+१
In reply to कडक ! by अवलिया
आयला, ही सुद्धा समृद्ध अडगळच!
झकास
हाहा!
बाप आहात!