मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंगिबिरंगी पनिर बुरजी.

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य: पनिर लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन) २-३ हिरव्या मिरच्या चिरुन १ ते २ मध्यम कांदे चिरुन मटार अर्धा वाटी कोथिंबीर थोडी चिरुन मिठ १ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस. तेल थोडा गरम मसाला ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या हे काही लागणारे वरील जिन्नस क्रमवार पाककृती: पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या.म्हणजे सोप्या शब्दात कुस्करुन घ्या हो. तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिरच्या घालुन शिजु द्या. मटार लवकर शिजावा म्हणुन फोडणीत घातला आहे. मटार शिजत आला की त्यात टोमॅटो घालुन थोडा शिजवा. आता सिमला मिरच्या (तिन्ही रंगाच्या), पनिर त्यात घालुन परतवा. एक वाफ आणुन त्यात मिठ, गरम मसाला, कोथिंबीर घाला व परत एक वाफ आणुन परतुन गॅस बंद करा.

वाचने 8365 वाचनखूण प्रतिक्रिया 20

कवितानागेश Tue, 02/15/2011 - 12:26
भाज्या शिजवतानाच त्यात थोडे थोडे मीठ घालत राहिले की, चव पण येते आणि रंग पण टिकतो. सिमला मिर्ची करताना मे नेहमी असंच करते.

जागु Tue, 02/15/2011 - 15:09
मुलखावेगळी, गणपा, सहज धन्यवाद. सहज आता थोड्या वेळाने खोबरे, तांदळाचे पिठ, साबुदाणा, दुध ह्या गोष्टीपण येतील.

In reply to by मदनबाण

रेवती Tue, 02/15/2011 - 20:34
दोन्ही शब्द बरोबर आहेत. उगीच शंका कुशंका विचारू नकोस बाणा. समोर ताटात येइल ते आनंदानं खायची सवय लावून घे.;)

निवेदिता-ताई Tue, 02/15/2011 - 19:11
एकदम छान.......रंगीबेरंगी...मुले खुश...सर्व भाज्या मुलांनी खाल्ल्यामुळे आपणही खुश...

लवंगी Wed, 02/16/2011 - 13:50
पनीर्-अंडे असे दोन्ही एकत्र टाकून करून पाहिन.. ;) मी पनीर-३ रंगाच्या सिमला मिरचीची अशीच भाजी करते पण सगळ जूलीयन कापून घेते आणी पनिर कुस्करण्याऐवजी छोटे-छोटे तुकडे घालते..