मागील भाग - http://misalpav.com/node/16785
***
उन्हाळातल्या लाहा लाहा होणार्या दिवसांत अचानक कुठुन तरी चुळुक चुळुक आवाज येतो. घूंगरांचा तो परिचित आवाज येताच मनाला जवळच रसवंती असेल असे समजते आणि कोरड्या झालेल्या घशाला अन तापलेल्या डोक्याला थंड करण्यासाठी पाय आपोआप त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतात. कधी जोरजोरात आवाज करणारा टेपच जवळच्या रसवंतीची सूचना देत असतो. गेल्याबरोबर हाफ नाही तर फुल्ल ची ऑर्डर देत आपण हाश्श हुश्श करत बसतो. समोर रस येताच पटकन ते अमृत घेत, तृप्त होत परत आपल्या मार्गाने निघुन जातो. किती वेळा आपण त्या रसवंतीत कामाला असलेल्या लोकांचा विचार करतो ? बहुधा नाहीच. पण एखादा बसल्याबसल्या रसवंती, तिथला अविरत फिरणारा चरकाचा चक्राकार प्रवास पहात एखादी छोटे खानी जीवाला चटका लावणारी कथा सांगून जातो.
ब्लेझर
गॉगल
दुकानांचे पत्ते
पुष्प - http://www.orkutpapa.com/scraps/yellow-rose.jpg
ब्लेझर - http://product-image.tradeindia.com/00224107/b/0/Men-s-Blazer.jpg
गॉगल - http://www.eyeweartalk.com/wp-content/uploads/2008/12/ray-ban-aviator-s…
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
त्याला आठवले .. हो तीच ती ... किती बदलली होती. कुठे ढगळ ढगळ पंजाबी ड्रेस मधल, पाठीवरची बॅग समोर धरुन चालणारी, चापुन चोपुन बसवलेल्या लांब केसांची ती .. अन कुठे आताची. पाठीच्या खालचा बराचसा गुबगुबीत भाग दाखणारी ती जिन्स, बारबालेला शोभावा असा चमचमीत पट्टा .. अन तो टिशर्ट पाहुन तर रघ्याच ओशाळला .. थरथरत्या हाताने त्याने रसवंतीचा खटका ओढला. त्याच्या कानात घुमणारी खळ्ळ-खळ्ळ-खळ्ळ थांबली. त्याने मागे वळुन पाहिले, तिच्या कंबरेच्या पट्ट्याच्या आरश्यावरुन उन चमकले .. लख्ख्कन त्याच्या डोळ्यात. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. डोळे गच्च मिटुन त्याने चाचपडतच खिशात हात घातला. बंडलातुन एक बिडी काढुन तिचा चपटा भाग जिभेवर ठेवला आणी तित जराशे दात रुतवुन त्याने काडी ओढली. दोन झुरके घेउन त्याने परत मागे वळुन पाहिले. ती बहुदा रिक्षेची वाट पहात असावी. मागच्या खिशात पाकिट काढायला हात घातला तो कंगवा खिशातल्या छिद्रात अडकलेला. त्याने कचकच्चुन शिवी घातली अन पाकिट जवळपास ओढुनच काढले. मागच्या वर्षीच्या क्यालेंडरखाली बोटे सारुन त्याने घडी घातलेला कागद काढला. एकवार चापपला. त्यावर ते लिहले त्याकाळी उडवलेली चमकी आता राहिली नव्हती, घड्या दबुन तो फाटायला आला होता. वर्षानुवर्षे दाबलेली इच्छा अचानक उफाळुन आली. त्याला छातीत हलकीशी थरथर जाणवली, डोळ्याखाली जडपणा जाणवला. ते पत्र द्यावे म्हणुन तो पुढे झाला तो तीच वळुन पट्ट्कन म्हणाली .. "जरा एक रस देरे .. बिनाबर्फाचा."अधिक वाचा - http://misalpav.com/node/10795 *** लहान पणच्या आठवणी कुणाला प्रिय नसतात. जुन्या गोष्टींना उजाळा देणे हे अनेकांचा फावल्या वेळचा छंदच असतो. त्यातच जर त्या खेड्यातील निरागस जीवनाशी संबंधित असतील तर मन कधी गुंगुन जाते तेच कळत नाही. अजुन अजुन लिहिले असते तर मजा आली असती असेच असे लेख वाचून वाटत असते.
अंगणाच्या शेवटी छतावर जायला जिना होता, त्याच्या पायर्या उंच उंच असल्याने मला चढता येत नसत. मग मी, आजोबा आज्जी आणी मावश्या तीन वर छतावर जात असु. वर गेल्या गेल्या मी आज्जीच्या कडेवरुन सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असे. कारण बाजुचे मोठ्ठे लिंबाचे झाड आणी त्याच्या फांद्या अगदी माझ्या उंचीला आलेल्या दिसत. गच्चीवर लिंबाचा पाला पाचोळा असे, त्यावरुन धावतांना वाळलेली पाने पायानी चुरतांना मोठी मौज येई. माझी मजा संपते न संपते तोच मावशी खराटा घेउन गच्ची झाडायला लागे. एक मावशी बादलीभर पाणी आणुन हलकासा सडा शिंपडे, दुसरी मावशी चटई अंथरे. चुरमुर्यांना तिखट मीठ तेल लावुन आणलेले असे. गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत होई. मीही खेळुन खेळुन थकायला येई. आम्ही सगळे खाली घरात यायचो. सातच्या मराठी बातम्या लागायच्या. जेवणात माझी आवडती शेवयांची खीर असे. मी झोपायला आलो की आज्जी मला अंगाई गाउन झोपवी, काही ओळी मला अजुन ऐकु येतात,अधिक वाचा - http://misalpav.com/node/10745 *** मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/172 इथे वाचता येईल. बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे आनंदयात्री. :) अनेक सुंदर सुंदर कविता, मनाला भिडणारे ललित लेखन करणारा आनंदयात्री आमचा या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे हल्ली बरेच दिवसांत त्याने आम्हाला त्याच्या लेखांमधुन एका हळव्या भावविश्वात नेलेले नाही. हरकत नाही. आम्ही त्याला एक मस्त गॉगल भेट देत आहोत. त्याच बरोबर फुल आणि ब्लेजर देत आहोत. त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर एखादा मस्त लेख लिहावा की तो वाचून रसिक जन उद्गारतील " वा ! लेख असावा तर असा !" बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे? पुष्प
ब्लेझर
गॉगल
दुकानांचे पत्ते
पुष्प - http://www.orkutpapa.com/scraps/yellow-rose.jpg
ब्लेझर - http://product-image.tradeindia.com/00224107/b/0/Men-s-Blazer.jpg
गॉगल - http://www.eyeweartalk.com/wp-content/uploads/2008/12/ray-ban-aviator-s…
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
वाचने
4946
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
चौथा भाग झाल्यावर आता नेक्ष्ट
सहमत आहे ... हा आंद्या
In reply to चौथा भाग झाल्यावर आता नेक्ष्ट by रेवती
आनंदयात्री यांनी लिहिते
पहिला दुसरा
In reply to आनंदयात्री यांनी लिहिते by मस्त कलंदर
खरंच..
+१
In reply to खरंच.. by स्वाती दिनेश
आनंदयात्री यांचे लेखन मला
आंद्या
वा!!!
In reply to आंद्या by प्रकाश घाटपांडे
स्तुत्य मालिका
+१ असेच म्हणते!
In reply to स्तुत्य मालिका by राजेश घासकडवी
+२
In reply to +१ असेच म्हणते! by स्वाती२
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to +२ by छोटा डॉन
मलाही आनंदयात्रींच
नविन असणार्या आम्हाला अश्या
लग्न झाल्यापासून आम्द्याला
लिहिते व्हा!
सहमत आहे
In reply to लिहिते व्हा! by सुनील
अरे ह्याचं पण नुकतच लग्न झालय
आंद्याचं छोटेखानी लेखन
मिपावर समर्थ लेखन करणाऱ्या पण
In reply to आंद्याचं छोटेखानी लेखन by ३_१४ विक्षिप्त अदिती
आंद्या लिही रे बाबा आता
अरे
आंद्या तुझी आठवण येते. अंबळ
अवलियांचे धन्यवाद....
धन्स रे नाना !!
धन्यवाद