काढण्या साठी माहिती खालील प्रमाणे
लागणारे पुरावे
१) तुमचे ओळखपत्र (PAN कार्ड), पारपत्र, वाहन चालवण्याचा परवाना तत्सम.
२) रहिवासाचा पुरावा ( Ration कार्ड, महावितरणाचे बिल, दूरध्वनी बिल शक्यतो भारत संचार निगम मर्यादित).
आमच्या इथे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत याची व्यवस्था करण्यात आली होती.
तिथे गेल्यावर एक अर्ज भरून द्यावा लागतो. नंतर तुम्हाला तो पूर्ण भरलेला अर्ज (फॉर्म) त्या संबधित व्यक्ती कडे दिल्यावर ते तुमच्याकडचे ओळखपत्र व रहिव्साचा पुरावा बघतात व स्कॅन करून त्यांच्या संगणकावर घेतात.
नंतर हाताच्या १० बोटांचे ठसे घेतात व नंतर बुबुळाचे छायाचित्र घेतात.
सर्वात शेवटी तुम्हाला सर्व माहिती बरोबर आहे का नाही ते बघून झाल्यावर पोचपावती देतात.
ज्यांच्या कडे रहिवासी पुरावा नाही त्यांच्या करिता सुद्धा काही तरी पद्धत आहे पण ती मला माहित नाही. ती तिथे जुनाच बघावी लागेल.
पोहच मिळाल्या नंतर साधारण २५ दिवसांनी UNIQUE ID कार्ड घरी येईल असे सांगितले आहे.
>> आमच्या इथे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत याची व्यवस्था करण्यात आली होती.
अजुन आहे का व्यवस्था?
माझ्या ड्रायविंग लायसन्स वरील पत्ता हा जुन्या घराचा म्हणजे उरुळी कांचन चा आहे.
नविन घर रहाटनी मधेय आहे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतच येते.
मग येथील इडेक्स २ आणि पेन कार्ड चालेल काय ? की रेशन कार्ड पण आधी इकदचे पाहिजे .. ?
थोडी मदत करा राव
ड्युप्लिकेट आयडीची सोय नाही काय? छ्या:! मग काय मजा?
ते काही नाही. ड्युप्लिकेट आयडीची सोय झालीच पाहिजे. खुद्द पंतप्रधानांपासून सुरुवात झाली पाहिजे. (म्हणजे मग 'यथा राजा, तथा प्रजा' या न्यायाने इतरांनाही अनुकरण करता येईल, नि पायंडा पडेल.)
पंतप्रधानांनासुद्धा कधी उफराटे धंदे करावेसे वाटत असतीलच की नाही? तेही आपल्या "स्वच्छ" (आणि भारतीय पंतप्रधान या नात्याने "प्रतिष्ठित") प्रतिमेस धक्का लागू न देता? मग त्यांना अशी सोय नको?
शिवाय, फारच होऊ झाले, तर पंतप्रधान म्हणून स्वतःच्याच ड्युप्लिकेट आयडीला जाहीर समज दिली, की काम झाले! पब्लिकला काय समजतेय?
विचार करायला गेले, तर या सोयीचे आनुषंगिक फायदे कितीतरी दिसतात. तेव्हा अशी सोय उपलब्ध करून देणे इष्ट ठरेल.
(बाय द वे, पंतप्रधानांचा ड्युप्लिकेट आयडी काय रहावा बरे? 'ग्रीन स्प्यान'? भारतीय रिज़र्व ब्यांकेचे माजी गवर्नर म्हणून, अॅलन ग्रीनस्प्यानच्या धर्तीवर?)
अरे हो, एक सांगायचे राहूनच गेले. वरील सर्व हा निव्वळ कल्पनाविलास आहे हं. "पंतप्रधान उफराटे धंदे करतात" असले काही यातून आडमार्गानेही सुचवायचे नाही.
भारतीय पंतप्रधानांविषयी मला संपूर्ण आदर आहे.
हं, आता "पंतप्रधान कोणाचेतरी पिथ्थू आहेत, कोणाच्यातरी आदेशाप्रमाणे वागतात, कोणाच्यातरी हातातले बाहुले आहेत" असेही काहीकाही पंतप्रधानांबाबत समज आहेत म्हणे. पण त्याहीबद्दल आपल्याला काही माहिती नाही बुवा.
नसावेत!
प्रतिक्रिया
स्वतःचा आधार क्रमांक काढून
+१
अर्ज कसा करावा
>> आमच्या इथे पिंपरी चिंचवड
हेच म्हणतो
हो चालू आहे आजुन बरेच दिवस असेल, नक्की माहित नाही.
तिथे जाउनच चौकशी करावी लागेल
आधार क्रमांक काढण्यासाठी
हो कारण तिथे बोटाचे ठसे व बुबुळाचे छायाचित्र घेतात
युनीक आयडी?
हा हा
डिस्क्लेमर
पुण्यात कुठे मिळतो..? क्रूपया
नगर पालिकेत जाउनच चौकशी करावी लागेल