दारासमोरचा रस्त्यावर
असलेले अनेक खड्डे
काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले
क्रिकेटचे स्टंप लावतांना काही
तर काही असेच
काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले.
चुकार दगडं मधुनच
वर येत पायाला टोचत
आणि
धुळमाती अंगावर उडवत
खेळतांना वेळेचे भान नसे.
पावसाळ्यात डबके झालेल्या
रस्त्यावर थपथप भरलेल्या
पाण्यात मारलेल्या उड्या अन्
पायाला लागलेला
चिखल घरभर पसरत असे.
आता डांबरीकरण झाल्यावर
मऊसुत रस्त्यावरुन चालतांना
उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो
काहीतरी टोचतं
आणि
चिखल लागल्याचा भास
जाता जात नाही.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4691
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त..
मस्त दारासमोरच्या हवं
छान.
मस्त
वाह नाना .. जबरा कवीता ..
हा हा हा ते "विडंबन"
In reply to वाह नाना .. जबरा कवीता .. by टारझन
काय नाना , अप्रगल्भ सदस्याची अशी कुचेष्टा ?
In reply to हा हा हा ते "विडंबन" by अवलिया
हं...
मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले
=)) =)) =))
In reply to मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले by परिकथेतील राजकुमार
के व ळ हुच्च
In reply to मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले by परिकथेतील राजकुमार
हाहाहाहा
In reply to मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले by परिकथेतील राजकुमार
परा धागा हॅक करायची मकीची सवय
In reply to मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले by परिकथेतील राजकुमार
गुरु-शिष्याची जुगलबंदि मस्त
In reply to मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले by परिकथेतील राजकुमार
अवलिया मस्त आहे कविता अनि
+१
In reply to अवलिया मस्त आहे कविता अनि by मुलूखावेगळी
मुळ कविता आनि परांचे विडंबन
हेच म्हणतो
In reply to मुळ कविता आनि परांचे विडंबन by गणेशा
मस्त !
सुंदर ,सुरेख ,मस्त !!
वाहवा!
आई गं !
जियो...
बेष्ट