संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास
नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता. काही चुका राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती.
सुमारे दोन महिन्याभरापूर्वी धम्मकलाडू यांनी सद्यपरिस्थित मराठी संस्थळे किती प्रगल्भ आहेत, त्यांची प्रगल्भता मोजावी कशी व वाढवावी कशी यावर चिंतन करणारा एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने त्यांनी स्पष्टपणे लिहून इन्कार केला असला तरी त्यांचा खोडी काढण्याचा हेतू असल्याप्रमाणे वाचकांनी त्यावर मते मांडली. मात्र या सगळ्या गदारोळात प्रगल्भता मोजण्याच्या निकषांकडे दुर्लक्षच झाले. या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचेच लक्ष पुनर्केंद्रित व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.
लेखनहेतू
प्रगल्भतेचे निकष कसे ठरवावे हा अतिशय गहन प्रश्न आहे. कारण प्रगल्भता ही काही भौतिक राशी नाही जी एखाद्या
उपकरणाने मोजता यावी. तसेच ती जनसामान्यांच्या कौलावरूनही ठरू नये असे वाटणे साहजिक आहे. नाहीतर जे लोकप्रिय ते प्रगल्भ असे मानले जाण्याचा धोका उद्भवतो. म्हणजे केवळ आमीर खानचा चेहेरा फिल्मफेअरच्या सर्वसामान्य वाचकांना गोड वाटला म्हणून त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बनण्याचा मान मिळतोच, पण त्या जखमेवर मीठ चोळणे म्हणून की काय 'पापा केहेते है बडा नाम करेगा' वगैरेसारख्या रचना या गुलजारने इजाजत साठी केलेल्या कवितांपेक्षा अधिक चांगल्या आहेत असा निर्वाळा मिळतो. तेव्हा जनसामान्यांच्या मतांवरून प्रगल्भता ठरवणे योग्य नाही.
परंतु मग प्रगल्भता ठरवावी कशी, हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. त्यासाठी तुलनात्मक अभ्यास हा एकच पर्याय शिल्लक रहातो. सुदैवाने संस्थळांवर होणाऱ्या लेखनात अनेक सामायिक दुवे असतात, जेणेकरून हा अभ्यास शक्य होतो. एकच लेखक, एकच लेख दोन संस्थळांवर प्रसिद्ध करतो. अशा सामायिक लेखांना विशिष्ट संस्थळावर काय प्रकारचे प्रतिसाद मिळतात, किती खोलवर चर्चा होते, चर्चा भरकटते की फुलते, अवांतरात जाते की मूळ विषयांच्या अनेकविध पैलूंना स्पर्श करते, वाचक चर्चाविषयाबाबत उदासीन आहेत की तावातावाने तावताव लिहितात यावरून काही निष्कर्ष काढता येतात. या लेखात अशाच दोन संस्थळांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.
तुलनेच्या पद्धती व निकष
मिसळपाव व उपक्रम या दोन संस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या गेल्या महिन्याभराच्या काळातल्या लेखनाचा या तुलनेत अंतर्भाव आहे. या काळात जे जे सामायिक लेख दोन्ही संस्थळांवर प्रसिद्ध झाले तेवढेच या तुलनेसाठी विचारात घेतले आहेत. तुलना करताना मूळ लेखाचा अगर चर्चाप्रस्तावाचा दर्जा विचारात घेतला नाही, कारण अर्थातच तो दोन्ही संस्थळांसाठी समान आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिसादांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. या मूल्यमापनासाठी खालील गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत.
१. प्रतिसादसंख्या - अर्थातच संख्येवरून दर्जा ठरत नाही हे उघडच आहे, पण तरीही प्रतिसादसंख्येवरून एकंदरीत वाचकवर्गाच्या चर्चाप्रस्तावाबद्दलच्या उत्साहाचं मोजमाप होऊ शकते. अवांतर प्रतिसादांमुळे हा आकडा फुगलेला नाही याचाही विचार करण्यात आला.
२. वाचकांचा सहभाग/समरसता - निव्वळ 'लेख आवडला' इतपतच प्रतिसाद असेल तर त्या प्रतिसादांना 'हा लेख आवडला याचे कारण म्हणजे...' या स्वरूपाच्या प्रतिसादापेक्षा कमी महत्त्व दिलेले आहे. एखाद्या चर्चेत किती लोकांनी किती समरसून भाग घेतला हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो.
३. माहिती/पैलू - एखाद्या विषयाची नवीन माहिती चर्चेतून उपस्थित झाली का? चर्चाविषयाचे वेगवेगळे पैलू प्रतिसादकर्त्यांनी उपस्थित केले का? यावरून निश्चितच दोन चर्चांची तुलना करता येते.
४. वाचनीयता - ही चर्चा पुन्हा वाचावीशी वाटेल का? या चर्चेत सहभाग न घेणाऱ्याला ती वाचताना आनंद मिळेल का? आपण यावेळी उपस्थित असायला हवे होते, चर्चेत भाग घ्यायला हवा होता असे वाटेल का? या प्रश्नांच्या उत्तरांतून चर्चा किती यशस्वी झाली याबद्दल अटकळ बांधता येते.
या चारही निकषांचा सर्वांगीण विचार करून प्रत्येक लेखा/चर्चेसाठी मिसळपाव व उपक्रम या संस्थळांवरील चर्चांना सामान्य, चांगली, व उत्तम अशा श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. सामायिक लेखांसाठी असलेल्या श्रेणींचे एकत्रीकरण केल्यास संस्थळांच्या तुलनात्मक प्रगल्भतेचा अंदाज यायला मदत व्हावी.
तुलनात्मक सारणी
एकंदरीत या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सात लेखांसाठी सारांश असा येतो
संस्थळ ----उत्तम मध्यम सामान्य
उपक्रम ------0----2-----5
मिसळपाव----2----1-----4
उत्तम चर्चांच्या संख्येमध्ये मिसळपाव पुढे असले तरी मध्यम व सामान्य दर्जाच्या चर्चांमध्ये उपक्रमने बाजी मारलेली आहे.
निष्कर्ष व पुढील चर्चा
संस्थळांची प्रगल्भता कशी मोजावी यासाठी एक तुलनात्मक अभ्यास आम्ही सादर केला. यातून अर्थातच कुठचे संस्थळ प्रगल्भ आहे याबाबतीत निष्कर्ष काढायचा नसून धम्मकलाडूंनी मांडलेल्या मूळ प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रगल्भतेचे निकष निश्चित करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल अशी आशा आहे. ही पद्धती प्रस्थापित झाली तर यापुढे दर महिन्याला संस्थळांचे रँकिंगही ठरवता येईल. अर्थातच या पुढच्या गोष्टी झाल्या.
Sheet1
| A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | ||||||||||||
| 2 | ||||||||||||
| 3 | ||||||||||||
| 4 | ||||||||||||
| 5 | ||||||||||||
| 6 | चर्चा/लेखाचे नाव |
लेखक | उपक्रम | मिसळपाव | ||||||||
| 7 | हॉम रॉंग | निनाद | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती सामान्य, वाचनीयता सामान्य |
6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती सामान्य, वाचनीयता सामान्य |
||||||||
| 8 | ऍबल कॉन एला |
निनाद | १४ प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू व वाचनीयतेला मर्यादा |
१४ प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू व वाचनीयतेला मर्यादा |
||||||||
| 9 | तोक्यो गोमी ओन्ना |
निनाद | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य | ||||||||
| 10 | पानिपताची मराठी भाषेला देणगी |
चिंतातूरजंतू | 14 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग मध्यम, माहिती व पैलू मध्यम, वाचनीयता मध्यम |
52 प्रतिसाद, वाचक सहभाग उत्तम, माहिती व पैलू उत्तम, वाचनीयता उत्तम |
||||||||
| 11 | वॉल्व्हर | निनाद | 9 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू सामान्य, वाचनीयता सामान्य |
31 प्रतिसाद, वाचक सहभाग चांगला, पैलू व माहिती चांगली, वाचनीयता चांगली |
||||||||
| 12 | सायलेंटियम | निनाद | 5 प्रतिसाद, वाचक सहभाग सामान्य, पैलू सामान्य, वाचनीयता मध्यम |
13 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू सामान्य, वाचनीयता मध्यम |
||||||||
| 13 | घरकाम/बालसंगोपन आणि जीडीपी |
राजेश घासकडवी | 13 प्रतिसाद, यथातथा सहभाग, मर्यादित पैलू, मर्यादित वाचनीयता |
80 प्रतिसाद, समरसून सहभाग, अनेकविध पैलूंना स्पर्श, वाचनीयता उत्तम |
||||||||
| 14 | ||||||||||||
| 15 | ||||||||||||
| 16 | ||||||||||||
| 17 | ||||||||||||
| 18 | उत्तम | मध्यम | सामान्य | |||||||||
| 19 | उपक्रम | 0 | 2 | 5 | ||||||||
| 20 | मिसळपाव | 2 | 1 | 4 | ||||||||
| 21 |
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१. संस्थळांची तुलणाच मुळात
जय हो
प्रगल्भतेची तुलना करण्याची अप्रगल्भता!
भंजाळलेय..
आमच्या मते श्री आळश्यांचा
वरील अप्रगल्भ चर्चेला जे उधान
संस्थळांवर लिहीणारी लोकं ही
अवलिया ह्यांना चौथे सावज
कोदांचे ग्रहमान उत्तम
विद्यापीठ आणि मंडई!
सुचवण, शुभेच्छा आणि कुतूहल
प्रगल्भतेचे निकष ठरवण्याची
असल्या तुलानांना फाट्यावर
+१
अय्या खरंच की काय?
अशी असते होय प्रगल्भता !! बर
लय भारी, मी लीव्हलेले लेखांचा
प्रयत्न आवडला
सर्वप्रथम
निरिक्षणाशी सहमत.
पुरवणी
आंतरजालावर सदस्यांची लैच
मला तरी मिपा हे सर्वच बाबतीत ऊजवे वाटते
कंपूबाजी सोडल्यास. कंसात
अगदी माझ्या मनातलं बोललात.
आमच्या तात्याची सही आठवली
तुलनेची तागडी...!
पण त्यातुन 'प्रगल्भ की
स्नेहल राव
स्त्री-पुरुष
येस्स
* स्तुत्य प्रयत्न आणि प्रतिसाद
ठीकच
लेखाप्रमाणेच कॉपी-पेस्ट
समतोलाच्या गरजेबद्दल साशंक, पण...
सँपल बरोबर आहे का?
निश्चित
षक्यता णाकरता येत णाय.
थोडे वेगळे