साहित्यः १ वाटी मटार , १ बटाटा, १०-१२ काजूगर,३-४ लवंगा, २ तुकडे दालचिनी, ३-४ मिरी,१-२ वेलची, १ वाटी ओले खोबरे,१/२ वाटी कोथिंबिर, ३-४ हिरव्या मिरच्या, छोटीशी चिंच, मीठ, १/४ चमचा साखर, २ चमचे तेल, पाणी, १/४ चमचा धणेजीरेपूड.
कृती: बटाटयाच्या चौकोनी फोडी,मटार व काजुगर एकत्र शिजवुन घ्या. ओले खोबरे, वाटी कोथिंबिर, चिंच, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर मिक्सर मध्ये वाटुन हिरवी चटणी बनवुन घ्या. तेलात लवंग, दालचिनी, मिरी,वेलची यांची फोडणी बनवा. यात हिरवी चटणी,धणेजीरेपूड व पाणी घालुन शिजवुन घ्या. नीट शिजली ग्रेव्ही की शिजलेले बटाटे,मटार व काजुगर घालुन एक उकळी येऊ द्यावी.

(मटार उसळीचा फोटो स्वतः काढलेला व इतर सर्व ईंटरनेट वरुन घेतलेत.)

वाचन संख्या
6704
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आहे ग पा़कृ... आणि मला
वा वा !!!
मी साधारण अश्याच प्रकारे
फोटो निट नसल्यामुळे उसळ रटाळ
उसळीत चिंच..प्रकार नविन