स्त्री बद्दल ची एक बाजु
चर्चा सत्रावर माझा हा पहिलाच धागा.. शक्यतो माझी मते जास्त ठाम असतात . पण खाली काही मुद्दे आहेत (सत्य आहेत हे सगळे मुद्दे ) त्यांची उत्तरे अजुनही मला मिळत नाहित.. तुम्ही मला मदत केली तर आवडेल
स्त्री ही माता भगिनी असते म्हणुन सर्रास त्यांच्यावर प्रशन उपस्थीत केले असेल तर क्षमस्व, परंतु असे नाहि घडले पाहिएज हे मनापासुन वाटते.. अजुनही मुद्दे आहेत पण नंतर लिहितो ..वेळ कमी आहे.
---
स्त्री -पुरुष समानता विषयी खुप पोटतिडकीने बोलले जाते, वयक्तीक रीत्या माझ्या सर्व मित्र -मैत्रीणी ह्या रोखठोक आणि स्वतंत्र विचार .. घरच्यांची अवास्तव बंधने नसलेल्या आणि काही महिला मुक्ती मोर्च्यासम असलेल्या आहेत. मस्त भांडन वगैरे ही होते आमच्यात पण फक्त वैचारीक , एकमेकांच्या विचारांचा रेस्पेक्ट पण केला जातो, पण त्यांच्या बाबतीतल काही प्रश्न खुप भयानक आहेत असे मला वाटते .. त्यांना सांगुन ही ते पटत नाहि .. खाली येणार्या मुलींची नावे मी बदलतो आहे .. क्रुपया कोनी वयक्तीक घेवु नये.
१. माझी मैत्रीण शरयु आहे, खुप निरागस लाघवी गोड.. स्वतंत्र विचारसरणी असली तरी घरच्यांच्या गावाकडील वातावरणाचा आणि मॅनेजर आहे म्हनुण कंपणीतील लोकांचा व्यवस्थीत संगम तिच्या राहणीमानात आहे,
आमच्या घरचे ही मुलगी म्हणुनच तिच्याशी बोलतात.
सांगण्याचा मुद्दा हा आहे की, अशी मुलगी जेंव्हा तिचे लग्न ठरत असते तेंव्हा, एका मुलाच्या प्रेमात पडते आणि नंतर सर्व मित्रांशी भेटने तर दूर बोलणे ही खुप कमी करते.
चुकुन १०-१५ दिवसांनी मित्रांचा फोन घेतला तरी नीट बोलत नाहीच पण त्यावेळेसच त्या मुलाचा फोन आला की लगेच तो फोन उचलते,
एकदा तर एका मित्राने डायरेक्ट विचारले का ग, तु त्या मुलाशी लग्न कर पण बाई.. खाता-पिता, जागता - उठता तु त्याचाच धावा करते , कुठे ही जाताना .. येताना तो म्हणेन तसेच करते ..
मग तुझा जो अधिकार आहे तो तु लग्ना आधीच त्याला बहाल करते आहे, मग अश्याने तुमच्यावर तो हळु हळु त्याचेच म्हणन्याने झाले पाहिजे असे बिंबवेल ना पुढे जावुन ...
परत त्याचा फोन आला की इतर चालु असलेले फोन कट नाहि केला तर असे नाहि वाटणार का त्याला पुन्हा की माझा फोन आला तरी ही का मला वेटींग वर ठेवते आहे. कारण त्याला असली सवयच नसते
मला याचे उत्तर अपे़क्षित आहे, की बर्याच मुली पाहिल्या आहेत मी बर्या पैकी अशी परिस्थीती असते त्यांची , स्वता त्या इतक्या वाहुन घेतात प्रेमात की सगळे त्याच्याच साठी ..त्यावेळेस त्या स्त्री -पुरुष समानता सगळे विसरुन जातात .. सगळे तो म्हणेन तसेच आणि लग्न ही करतात
मग नंतर त्या चिडुन - तो म्हणेल तसे झाले पाहिजे त्याला प्राधान्य दिले पाहिजे हे त्या कसे म्हणुन शकतात ? आणि शिवाय स्त्री पुरुष समान आहेत असे ह्यांचे मत असते मग पहिल्यापासुन ते स्वाधिन का होतात .. आणि मग नंतर जेंव्हा वेळ जाते तेंव्हा समस्त पुरुष जातीस त्या का सगळॅ असेच असतात असे संबोधतात.
मला प्रश्न हा आहे की येव्हड्या शिकल्या सवरलेल्या मुलींना पण तो सोडुन असणारे जग आपले मित्र मैत्रीण.. घरचे इतर असली नातीच राहत नाहित .. सगळे त्यावर दिपेंड होतात , आणि नंतर मुलेच लग्न झाल्यावर बदलतात असेही बोलतात.
नक्कीच स्त्री ने भान ठेवुन व्यवव्थीत प्रेम करावे .. पहिल्यापासुन आप्ले मुद्दे व्यव्स्थीत क्लिअर ठेवावे असे मनापासुन वाटते नाहितर मग पुढे इगो प्रॉब्लेम मुळे संसार उद्ध्वस्त होतात.
२. माझी आनखिन एक मैत्रीण आहे, मनाली.
स्त्री मुक्ती बद्दल ही खुप बोलते. घरचे लग्न कर म्हणुन मागे लागले आहेत तर मुले लग्न केल्यावर बंधने टाकतात म्हणुनच लग्न नको असा हट्ट पण करते ही बर्याचदा. २-४ मुले घरच्यांनी दाखवली तर त्यांना हीने विचारले होते की मी मंगळसूत्र घालणार नाही.. मी हे करणार नाही.. मी ते करणार नाही.. समान पाहिजे सगळे (त्या मुलांनी डोयीजड होते आहे म्हणुन नाहि म्हंटले रादर हिनेच आधी त्यांना नकार दिला)
इथपर्यंत मला मान्य आहे
पण आता कंपणीतील एक मुलगा तिच्या प्रेमात आहे, लग्नाचे विचारले आहे.. तर त्याचे म्हणने आहे हीने कुठल्याही मुलाशी बोलु नये... मैत्री ठेवु नये ..बाकी सर्व मला मान्य आहे घरकाम सोबत .. मंगळसूत्र नको घालु .. पुण्यातच राहु .. असेच आणि तसेच.
पण त्याला हीने कोणा मुलाशी बोललेले नाहि आवडत, हिलाही तो आवडतो.
माझ्या मैत्रीणीला एक बेस्ट फ्रेंड म्हणुन खुप समजावले मी नको करु तुझे अस्तित्व संपेन .. तो आताच तुझ्याशी या विषयावरुन भांडतो.. तुझे विचार कसे आहेत तु कशी आहे .. आणि तु का अधीन होते आहे ..
तरीही ति त्याच्याशी लग्न करणार आहे म्हणते आहे.
मला उत्तर कळत नाहिये की मुली स्वताचे स्वातंत्र्य येव्हड्या लवकर का गहान टाकतात , स्वताचे विचार .. अस्तित्व यांपासुन त्या विरक्त होउन काय मिळवत आहेत.
जेंव्हा परिस्थीतीची जाणीव होयील तेंव्हा वेळ निघुन गेली असेन मग पुरुषांवर खदे फोडण्यापेक्षा आताच का त्या निर्णय व्यव्स्थीत घेवु शकत
.
नोट :
आणि येथे मी जे उदाहरणे दिली आहेत ती फक्त एक प्रातिनिधिक आहेत .. असे सर्रार घडते आहे.
हे आधी नको का सुधारावयाला.
(कृपया येथे वयक्तीक मैत्रीणी असे लिहिले आहे , तरी कोणॅए वयक्तीकतेवर येवु नये. मला लेख जास्त लिहिता येत नाही पण हे प्रश्न पडलेच आहेत म्ह्यणुन विचारले .
प्रश्न उपस्थीत करण्याचे कारण कामापुरते नर हा धागा आहे. आता ३ दिवस सुट्टीवर आहे.. त्यामुळे उत्तरे द्यायला मी नसेल, मंगळवारी येइन )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आत्ता गडबडीत आहे... तीन
चला कविता कळो न कळो
आत्ता कं नै ?
खी खी खी
प्रेमात पडणे हाच एवढा
स्वतंत्र विचारसरणी .. घरातील
असो तरी २ नंबरची मैत्रीण आहे
+१ सहमत
बेस्ट फ्रेंड.. मित्र-मैत्रीणी
.प्रेमात पडण्यापर्यंत
छान उदाहरणे घेतलीस
ज्यांना फक्त नवर्याला सहमती
जाऊ द्या
नाक खुपसणे नाहिये हे असे मला
माझे फ्रेंड्स हेच माझी अॅसेट
चला निघतो ... फक्त २-३
प्रेमाची हवा डोक्यात जाणे
"माझे फ्रेंड्स हेच माझी
समजावणे बेक्कार महाग पडुअ
मला असे वाटतंय....
बरोबर .. पण ह्या पिंजर्याचा
पुरुष प्रचंड इनसिक्युअर
काय पण (गोड) गैरसमज पोसलाय.....
यालाच चोराच्या ऊलट्या बोंबा
.
आपले ज्ञान बघुन वारंवार मन
बाकी माझी काळजी घेण्यास मी
<<<ठीक आहे मग क्रूपया तूमच्या
केवळ शारीरीक द्रूष्ट्या बलवान आहेत म्हणून
साप धाकला अन नवरा आपला असे
मी २
हा ! हा ! हा !
प्र का टा आ
वाहीदा ताई
I understand ...
शिल्पा जी, पुरुष इन्सेक्युर
त्याला जोडीदार निवडुच नये असे वाटते !
हम्म! ज्या मुलींना 'सशक्त
एक मजेदार वाक्य ढकलपत्रातून
'सशक्त नाते'
सगळ्याच मुली अशा नसतात रे