Skip to main content

जनगणना २०११ , टप्पा दुसरा , सहकार्य करा !

Published on शुक्रवार, 11/02/2011
लोकहो, ही माझी पहिलीच वेळ आहे मिपा वर लिखाण टाकण्याची.मी नवीन सदस्य आहे. पण वाचक फार पूर्वी पासून.. माझी आई सध्या जनगणना ह्या भयंकर कामात आहे. तिच्या सोबत अख्खा मे महिना रणरणत्या उन्हात फिरून काम केलेले असल्याने ह्या कामात किती अडथळे येतात हे मी पहिले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये परत एकदा एक फेरी होत आहे ज्यात अजून २९ प्रश्न विचारले जातील. जनजागृती करूनच ह्या समस्या कमी करता येतील असे माझे मत आहे. यंदा जो फोर्म आला आहे त्यातील २९ प्रश्न मी इथे देत आहे . जेणेकरून हि माहिती लोक गोळा करून घरी राहणाऱ्या सदस्याजवळ ठेवतील. १. व्यक्तीचे नाव २. कुटुंब प्रमुखाशी नाते ३. लिंग ४.जन्म तारीख, वय ५.जन्म ठिकाण ६.वैवाहिक स्थिती ७.विवाहाच्या वेळेसचे वय ८.साक्षर ९.अनुसूचित जाती / जनजाती मध्ये समावेश १०.अपंगत्व ११.मातृभाषा १२.अवगत भाषा १3. शैक्षणिक संस्था (शाळा, कॉलेज) १४.प्राप्त शैक्षणिक उच्च दर्जा १५.काम करता काय? (होय / नाही, कालावधी ) १६.काम करत असाल तर : कामाचे स्वरूप (उदा : नोकरी ) १७.काम करत असाल तर कामाचे वर्णन (उदा : कंपनी चे नाव ) १८.काम करत असाल तर : कामाचे पद (मालक, कर्मचारी इ. ) १९.उत्पन्नाचे साधन (शेती, व्यापार इ) २०. कामाच्या ठिकाण पर्यंतचे साधन , अंतर २१. काम करत नसाल तर, कामाच्या शोधात आहात काय? २२. काम करत नसाल तर: बिन आर्थिक कार्य: (विद्यार्थी इ ) २३. स्थलांतर झाले असल्यास : पूर्वीचा निवास पत्ता , स्थलांतराचे कारण २४. पूर्वीचा निवास प्रकार: ग्रामीण/ शहरी २५. स्थलांतर होऊन झालेला कालावधी २६. हयात असलेली अपत्ये २७.झालेली अपत्ये २८. गेल्या वर्षभरात झालेली अपत्ये २९. धर्म (हा प्रश्न ७ व्या क्रमांकावर आहे ) वरील माहिती मी यंदा आलेल्या फोर्म मध्ये वाचून जशी आठवेल तशी लिहिली आहे. क्रम थोडा खाली वर असला तरी साधारणपणे असाच आहे. मी मराठीत अशासाठी दिला आहे कारण फोर्म मधील भाषा अशीच आहे. http://www.censusindia.gov.in/2011-manuals/Index_hl.html संकेत स्थळावर आपणास वेगवेगळ्या pdf मिळू शकतात. ( Path : Home / Census Manuals / Census Houslisting and Household Manuals ) त्यातील “Instruction manual for updating of Abridged Houselist and filling up of the Household schedule” हि उपयोगी आहे. त्यात सर्व प्रश्न दिलेले आहेत. आणि अजूनही बरीच माहिती आहे. तसेच माझ्या दिलेल्या माहितीत आणि त्या pdf मधल्या माहिती मध्ये थोडा फरक असू शकतो, In English : as per instruction manual Q.1 : Name of the person Q.2 : Relationship to head Q.3 : Sex Q.4 : Date of Birth and Age Q.5 : Current marital status Q.6 : Age at marriage Q.7 : Religion Q.8 : Scheduled Caste (SC)/Scheduled Tribe(ST) Q.9 : Disability Q.10 : Mother Tongue Q.11 : Other languages known Q.12 : Literacy Status Q.13 : Status of attendance in Educational Institution Q.14 : Highest educational level attained Q.15 : Worked any time during last year Q.16 : Category of Economic Activity Q.17 : Occupation Q.18 : Nature of Industry, trade or service Q.19 : Class of Worker Q.20 : Non-Economic activity Q.21 : Seeking or available for work Q.22 : Travel to place of work Q.23 : Birth Place Q.24 : Place of Last Residence Q.25 : Reason for migration Q.26 : Duration of Stay in this village or town . Q.27 : Children Surviving Q.28 : Children ever born Q.29 : Number of children born alive during last year जाता जाता एवढेच सांगीन की, तुमच्या घरी जेवा प्रगणक येतील तेवा त्यांना फिरत्या विक्रीवल्या लोकांसारखा वागवू नका. त्यांच्या अंगावर कुत्री सोडू नका. जमल्यास एक ग्लास पाणी विचारा. कारण ती सुद्धा तुमच्या सारखीच चांगली कमवणारी, चांगल्या घरात राहणारी, आणि मागच्या कामाचे पैसे न मिळून सुद्धा (दिवसभर शाळा करून ) मिळेल त्या वेळात जनगणना करणारी "माणसे " आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2454
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जातगणनेचा अंतर्भाव या जनगणनेत असल्याचे वाचले होते. अनुसूचित जाती/जमाती वगळता इतरांच्या जातीची गणना होणार आहे का?

"जाता जाता एवढेच सांगीन की, तुमच्या घरी जेवा प्रगणक येतील तेवा त्यांना फिरत्या विक्रीवल्या लोकांसारखा वागवू नका. त्यांच्या अंगावर कुत्री सोडू नका. जमल्यास एक ग्लास पाणी विचारा. कारण ती सुद्धा तुमच्या सारखीच चांगली कमवणारी, चांगल्या घरात राहणारी, आणि मागच्या कामाचे पैसे न मिळून सुद्धा (दिवसभर शाळा करून ) मिळेल त्या वेळात जनगणना करणारी "माणसे " आहेत." - हे अतिशय उत्तम लिहिले आहेत पिरा तुम्ही. एवढ्या महत्वाच्या विषयाला हात घातल्या बद्दल अतिशय धन्यवाद. ह्या माहितीचा निश्चित उपयोग होईल आम्हाला, मी तर घरी नसतो, पण मराठि पिडिएफ प्रिंट काढुन घरी ठेवेन माहिती भरुन.

तुमच्या सर्व प्रश्नांची उतारे तुम्हाला मी वर दिलेल्या संकेत स्थळावरील माहिती पुस्तकात मिळतील. त्यात सर्व काही सविस्तर दिले आहे. हे पुस्तक प्रगणकांना कार्यशाळेत दिले जाते. त्याच्याच आधारावर प्रश्नांची उत्तरे घेतली जातात.

चांगली माहिती,