फ्लाईट ९
१९८२ सालचा २४ जूनचा दिवस. ब्रिटिश एयरवेजचे फ्लाईट ९ लंडन च्या हीथ्रो विमानतळावरून निघाले होते. ही फ्लाईट मुंबई, चेन्नई, कौलालम्पूर, पर्थ अशा मार्गे मेलबर्नला जायची होती. हे एक बोईंगचे ७४७ जातीचे विमान होते. चार इंजिने असलेले हे भले मोठे विमान ब्रिटिश एयरवेजच्या ताफ्यात अनेक वर्षांपासून होते.
फ्लाईट उत्तमरित्या चालली होती. विमान निरनिराळ्या ठिकाणी थांबत प्रवासी उतरवत घेत होते.
आता विमानाने भारतीय उपखंड जवळपास सोडला होता. आता भारतीय समुद्रावरून मलेशिया इंडोनेशिया या मार्गावरून मार्गक्रमण सुरू झाले. रॉजर ग्रिव्हज हा अतिशय अनुभवी इंजिनियर आणि एरिक मूडी हा पायलट विमानाचे सारथ्य घेऊन बसला होता. सोबत बॅरी फ्रीमन हा सिनियर इंजिनियर ऑफिसर होता. रडारचा पडदा सर्वकाही आलबेल असल्याचे दर्शवत होता. हवामान उत्तम आणि निर्वेध आहे असे कळवण्यात आल्याने पायलटही निवांत होते. गपाटप्पा आणि मस्करी अशी मस्त फ्लाईट चालली होती.
मूडी ने अकरा हजार मिटर्सची उंची गाठल्यावर विमान ऑटॉपायलटवर टाकले. लघवीला जाण्यासाठी म्हणून टॉयलेटमध्ये गेला. आत गेल्यावर त्याला काहीतरी जळते आहे की काय असा वास आला. म्हणून त्याने तेथे शोधाशोध केली पण त्याला तसे काही आढळले नाही. काहीवेळा काही मूर्ख प्रवासी त्यांच्या जळत्या सिगारेटी भलतीकडे टाकून असले प्रकार घडवत, हे त्याला माहिती होते.
तरीही त्याने कॉकपीट मध्ये येऊन त्याच्या क्रू ला सर्व टॉयलेट निट पाहून यायला सांगितले.
याच वेळी काही प्रवाश्यांना विमानात धूर येत आहे असे वाटत होते. पण कदाचित हा धूर विमानात सुरु असणार्या धूम्रपानामुळे असावा असा समज त्यांनी करून घेतला होता. त्याकाळी विमानात धूम्रपानास परवानगी होती.
कॉकपीटमध्ये पायलटस वेगळ्याच प्रसंगात होते. त्यांना त्यांच्या काचेवर समोरून ठिणग्यांचा एक प्रवाहच विमानावर आदळतांना दिसत होता. रॉजर ने परत परत रडार पाहिली पण त्यावर काहीच वेगळे दिसत नव्हते. एयर ट्रॅफिकनेही सांगितले की मार्ग निर्वेध आहे.
बॅरीला संशय आला की ही सेंट एल्मोची आग तर नव्हे? सेंट एल्मोच्या आगीत हवेतील प्लाझ्मा वातावरणातील विजेमुळे प्रज्वलीत झाल्यासारखा दिसतो. या नीळसर रंगाच्या दीप्तीमान कणांना सेंट एल्मोची आग म्हणतात. प्रामुख्याने वादळात हे प्रकार दिसून येतात. परंतु एयर ट्रॅफिकनेही सांगितले की वादळ वगैरे या मार्गात नाही, मार्ग निर्वेध आहे.
विमानात धूर मात्र दाटतच होता. तो कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्याबरोबर जळाल्याचा गंधकाचा दर्पही विमानात जाणवत होता.
अचानकपणे खिडकीशी बसलेल्या एका लहान मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले की विमानाच्या एका इंजिनामागे मला आग दिसली. इतर अनेक प्रवाश्यांनाही विमानाच्या इंजिनांमागे आग दिसत होती.
अचानकपणे चौथ्या क्रमांकाच्या इंजिनातून आग निघून ते बंद पडले. रॉजरने तात्काळ त्या इंजिनांची शटडाउन ड्रिल सुरु केली. इंधनाचा पुरवठा खंडित केला. एका मिनिटात दुसर्या क्रमांकाचे इंजिन बंद पडले. आणि काही सेकंदाच्या अंतराने इतरही इंजिने बंद पडली!
बॅरीने भयचकित झाला आणि म्हणाला,' हे अविश्वसनिय आहे, आपली चारही इंजिने बंद पडली आहेत.'
कोणत्याही इंजिनाशिवाय बोईंगचे ७४७ जातीचे विमान आता वेगाने खाली समुद्राकडे येत चालले होते. दर १५ किलोमिटर्स ना १ किलोमीटर इतक्या भयावह वेगाने ते समुद्राकडे झेपावू लागले.
रॉजरने गणित करून मांडले की आपण बहुदा फक्त १६९ किलोमिटर्स अंतर असे कापू शकू.
मूडीने तत्काळ एयर ट्रॅफिकला चारही इंजिने बंद पडून आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याचे कळवले. (तत्कालीन इंडोनेशियाच्या एयर ट्रॅफिकच्या माणसाने चुकीचे ऐकले की फक्त चौथे इंजिन बंद पडले आहे. )
जावा बेटावर उभा असलेला पर्वत या विमानाच्या मार्गात होता. हा अडथळा पार करून जाण्यासाठी किमान ३७०० मिटर्सची उंची आवश्यक होती अन्यथा विमानाचा कपाळमोक्ष.
पायलट क्रूने परत इंजिने सुरू करण्याची ड्रिल केली. पण कोणतेही इंजिन सुरू झाले नाही. रॉजरने ही ड्रिल करत रहायची असे ठरवले. या सर्व घटनांमुळे विमानातील प्रवासी हबकलेच होते.
रॉजरने घोषणा केली, ' आपल्या प्रवासात एक छोटा अडथळा उभा राहिला आहे. विमानाची चारही इंजिने बंद पडली आहेत. आम्ही सर्व प्रकारे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आशा आहे या गोष्टीने तुमच्यावर फार ताण आला नसेल!'
थोड्यावेळातच विमानातला हवेचा दाबही खाली आला आणि ऑक्सिजन पुरवणारे मास्क प्रवाश्यांसमोर खाली आले. बहुतेकांनी आपले काही खरे दिसत नाही ही खुणगाठ मनाशी बांधली.
क्रू ने ठरवले की जर विमानाने आवश्यक ती उंची राखली नाही तर विमान परत वळवायचे आणि समुद्रावर उतरण्याचा प्रयत्न करायचा. तोवर इंजिने सुरू करण्याची पद्धती वापरत प्रयत्न सातत्याने सुरू ठेवायचे.
यावेळे पर्यंत विमान ४१०० मिटर्सवर येऊन ठेपले. आणि अचानकपणे सुखद धक्का बसला - चौथे इंजिन सुरू झाले. त्यामागोमाग इतर सर्व इंजिने सुरू झाली. सर्वांनी एकच जल्लोष केला.
विमानाने परत ११५०० मिटर्सची सुरक्षित उंची गाठली आणि...
आणि परत तीच सेंत एल्मोची आग पायलटना समोर दिसू लागली. दोन नंबरचे इंजिन परत बंद पडले. आता मात्र मूडीने विमान कमी उंची वरूनच उडवण्याचा निर्णय घेतला.
विमान सुमारे ३५०० मिटर्स वरून जाऊ लागले. इतर तिन्ही इंजिने काम करत राहिली.
विमानाने जकार्ताला उतरण्याची परवानगी मागितली. परवानगी होती शिवाय अग्निशमन दलाचे ट्रक्स तयारच उभे होते.
उतरतांना पायलटस च्या लक्षात आले की त्यांना काचेतून धावपट्टी आणि इतर काहीच दिसत नाहीये. फक्त धुरकट असे दिवे दिसत आहेत. विमानाचे लँडिंग लाईटस काम करत नव्हते असे लक्षात आले. ग्लाईडस्कोप धड मिळत नसल्याने शेवटी कसेबसे 'अंतर मापक' वापरत, प्रयत्नपूर्वक हे विमान जमिनीवर उतरवण्यात त्यांना यश मिळाले.
विमान उतरल्यावर विमानात एकच जल्लोष झाला. सर्वजण आनंदाने एकमेकांना मिठ्या मारू लागले आयुष्याची दोरी सलग राखल्याबद्दल देवाचे आभार मानू लागले.
---
आता ही भानगड झाली कशी?
जावा बेटावरचा गालूंगंग नावाचा ज्वालामुखी या काळात जागृत झाला होता. या ज्वालामुखीने हवेत मोठाच धूर सोडला होता. या धूरात ज्वालामुखीची राखही मिसळली होती. या धूरात विमान घुसले. त्याबरोबर ही राख घर्षणाने पेटल्या सारखी दिसू लागली आणि सेंट एल्मोची आग असल्याचा संशय पायलटसना आला. पण ते तसे नव्हते. हे खरबरीत राख विमानाच्या इंजिनातही घुसली. परंतु तेथील सुमारे २०० सेल्सिअसच्या तापमानामुळे हे कण वितळले त्याची एक पेस्ट तयार झाली. ती सर्वत्र पसरत इंजिन जाम होऊन बंद पडले.
मात्र इंजिन बंद पडले आणि गार झाले तसेच ते खालीही आल्याने तेथे राख नव्हती. आतापर्यंत तापमानामुळे पेस्ट झालेली ही राख घट्ट झाली आणि वार्याच्या जोराने उडून गेली. मूडीच्या सातत्याच्या प्रयत्नाने इंजिने सुरु झाली.
त्या राखेमुळेच विमानाच्या काचाही घासल्या जाऊन त्यातली दृष्यता गेली.
या नंतरही असे प्रकार याच मार्गावर झाल्याने, हा हवाई मार्ग काही काळ बंद करण्यात आला.
चौकशी नंतर सर्व प्रकारच्या ज्वालामुखीच्या राखेमध्ये विमाने नेण्यावर बंदी घालण्यात आले.
वाचने
6180
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
हे घ्या अजुन एक व्हिडिओ
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
अरे वा!
In reply to हे घ्या अजुन एक व्हिडिओ by सहज
येस
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
jhakas detailing.. Mast
जबरदस्त ...
हा
In reply to जबरदस्त ... by छोटा डॉन
चांगली आणि नवीन माहीती.
निनाद अन् गवि
मुख्य प्रॉब्लेम असा आहे की
In reply to निनाद अन् गवि by ब्रिटिश टिंग्या
गवि/निनाद असे
In reply to मुख्य प्रॉब्लेम असा आहे की by गवि
मालिका?
In reply to गवि/निनाद असे by गणेशा
नाही. निनाद,तुझ्या लेखाबाबतीत
In reply to मालिका? by निनाद
सहमत ...
In reply to निनाद अन् गवि by ब्रिटिश टिंग्या
प्रयत्न करेन
In reply to सहमत ... by छोटा डॉन
मस्तच. वाचताना पुढे काय झालं
सहीच
चांगली माहिती दिलीत
२०००
भा. पो.
In reply to २००० by निनाद
अरे वा निनाद केव्हढी माहिती
घोळ
In reply to अरे वा निनाद केव्हढी माहिती by स्पंदना
अय्यो!! सॉरी सॉरी. पण आता
In reply to घोळ by निनाद
मान गये भौ..... गविंच्या
अतिशय जबरदस्त लिखान खुप
निनादशेठ मस्त लेखन. आधी
:)
In reply to निनादशेठ मस्त लेखन. आधी by परिकथेतील राजकुमार
इथेच तो सरेन्डर
शहारे..
गगनविहारी तर आहेतच आता जोडीला
नाही हो!
In reply to गगनविहारी तर आहेतच आता जोडीला by रेवती
छान लेख!
थरारक!
छान लिहिले आहे
थरारक. लेख आवडला. अभिज्ञ.
लेख आवडला. अजुन वाचायला
सुरेख लेख. अनवट लेख.. खूप