✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोंधळ विश्वचषक मोहिमेचा..!

व
विकाल यांनी
गुरुवार, 02/10/2011 - 12:09  ·  लेख
लेख
गोंधळ ... धर्म. क्रिकेटचा धर्म. राजधर्म. लोकधर्म. भारताचा धर्म! जिन्कण्याचा धर्म! उर्मीचा धर्म! धर्मकार्याची सुरुवात गोंधळाने करण्याची परंपरा...! या २०११ विश्वमोहिमेची सुरुवात आई भवानीला साकडं घालून करूयात...! गोंधळ मांडीला..आज या गोंधळाला यावे..... गणराज गणपती लवकर यावे... अंबाई..शिवाई लवकर यावे... लवकर यावे...लवकर यावे... भाळी विजयाचे दान द्यावे... पराक्रमाचे अतुल दान द्यावे..! भवानी आई लवकर यावे...आता लवकर यावे...! गोंधळाला ये आई आता गोंधळाला ये..... सचिनला विजयी स्फुर्ती दे...! गोंधळाला ये भवानी आता गोंधळाला ये..... धोनीच्या बाहूत गजबळ दे..! गोंधळाला ये तुळाई आता गोंधळाला ये..... वीरुला शत अश्वबळ दे...! गोंधळाला ये शिवाई आता गोंधळाला ये..... गंभीरला लक्ष आशीर्वाद दे..! गोंधळाला ये जनाई आता गोंधळाला ये..... सुरेशला चित्ता चपळाई दे..! गोंधळाला ये भिवाई आता गोंधळाला ये..... युवीला अंगी एकाग्राई दे..! गोंधळाला ये सर्वाई आता गोंधळाला ये..... युसुफला रक्षण अखंडायी दे..! गोंधळाला ये पद्माई आता गोंधळाला ये... भजनला फिरत चौखंडी दे..! गोंधळाला ये प्रभाई आता गोंधळाला ये..... झहीरला अंगार विलक्षण दे..! सहस्त्रासूर मर्दीनी.., शन्खचक्रधारीणी अग्निरूपस्वरूपचन्डिका...धावून येई...! अंगात भिनू दे शौर्य..अपरंपार.. रक्षण कर, देई धैर्य..सदैव.. विजय पताका तुज कमानी... फडकावीन दिन २ एप्रिल रविवारी...! || आईचा उदो....उदो....||
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4160 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

छान !

अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 13:18 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...

छोटा डॉन
गुरुवार, 02/10/2011 - 13:42 नवीन
धन्यवाद विकालशेठ, ह्या सदराची सुरवात आपल्या 'गोंधळा'ने झाली ही भाग्याची गोष्ट आहे. आभारी आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

ह्या सदराची सुरवात आपल्या

निखिल देशपांडे
गुरुवार, 02/10/2011 - 18:02 नवीन
ह्या सदराची सुरवात आपल्या 'गोंधळा'ने झाली ही भाग्याची गोष्ट आहे.
असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+२

गणपा
गुरुवार, 02/10/2011 - 18:13 नवीन
चांगभलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

एकदम झकास

गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 18:05 नवीन
एकदम झकास
  • Log in or register to post comments

आभारी आहे.

विकाल
गुरुवार, 02/10/2011 - 18:25 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा