ते पीठातून करता येते की नाही माहीत नाही. पण साधारणपणे भाजणी म्हणजे वेगवेगळी धान्ये आधी भाजून मग एकत्र दळायची असे काहीसे असते. आमची आई दिवाळीच्या आधी असे सगळे करत असते. त्यामुळे माहीत.
बाकी जाणकार प्रतिक्रिया देतीलच.
तांदूळ पीठी २ वाट्या, बेसन १ वाटी, कणिक १/२ वाटी, उडदाचे पीठ १/२ वाटी, मूग डाळीचे पीठ १/२ वाटी,धणे जीरे पावडर, ओवा पावडर, हे सगळे सुट्टे भाजून मग एकत्र करून बघावे. मी यातले मूग आणि उडदाचे पीठ न घालता बाकीची पीठे घालून थालिपीठे करते. खाण्यालायक नक्कीच होतात.
ऑल द बेस्ट. :)
पण तुमचा स्थानिक देशी वाणी केप्रची वगैरे तयार थालिपिठाची भाजणी ठेवत नाही काय? अटलांटात आता काही वाणी अगदी नियमितपणे नाही, तरी बरेचदा ठेवताना दिसतात.
नाहीतर मग दोनतीन वर्षांतून जेव्हा केव्हा भारतवारी करत असाल तेव्हा बॅगा भरून घेऊन येणे हा एक उपाय. किंवा भारतातून कोणी येत असेल तर त्याच्याबरोबर. चांगला दोनतीन वर्षे पुरेल एवढा ष्टाक मागवायचा. आम्ही हेच करतो. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" संदर्भः पु.ल.)
आमच्याकडचा वाणी चितळेंचं इडली मिक्स ठेवतो, केळकरांचा वर्हाडी ठेचा ठेवतो.. पण भाजणी आणत नाही. बिचार्याला सांगितलं तर समजतही नाही काय सांगतात ते.
आमच्याकडे आहे एक वाणी, बर्यापैकी नियमितपणे ठेवतो. सरदारजी आहे. (म्हणजे मालक नव्हे. मालक गुजराती मुसलमान आहे. हा तिथे काम करतो.) त्याला व्यवस्थित कळते आणि माहिती असते सगळी. तुमच्यामाझ्यापेक्षा अस्खलितपणे अस्सल गावरान मराठी बोलतो. (लोणावळ्याचा आहे.)
झिप लॉकच्या पिशवीत ठेवुन आणि शक्यतीतकी हवा काढुन फ्रिज किंवा फ्रिजर मध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. ( मी भाजणीच पीठ गेल वर्षभर फ्रिजमध्ये ठेवलय. जेव्हा गरज लागते तेव्हा काढतो.)
उत्तर क्र. ०१ भाजणीची थालपीठं करणेत यावीत, मग ती कडक उन्हात वाळवणेत यावित, आणि पिठ काय, मिक्सर मधुन पण करता येईल किंवा खुप जास्त असेल तर चक्कीवरुन करुन आणा. हाकानाका.
इथं फॉर इथिओपिया की काय ?
असो, भाजणिच्या थालपिठं करण्यासाठी पिठ कसं करायचं ते आईला विचारुन सांगतो, थोड्या वेळात.
अवांतर - अजुन एक एकोळी धागा, खाण्याचा पुर्वतयारी संदर्भात '' जनातलं मनातलं ' मध्ये - मिपा अजुन गंडलेलच आहे काय ?
अहो हर्षद मला वाटत शिल्पातैंना इथे म्हणजे परदेशात तयार पिठे मि़ळतात असे म्हणायचे असेल असे वाटते. इथे चक्की/गिरणी कुठली आलीये हो. आणि खाजगी चक्की विकत मिळते असे ऐकले आहे पण फार महाग असते ती. माझ्या एका ओळखीच्या बाईंची तर मागच्या दिवाळीला तर मोडली सुद्धा, चकलीची भाजणी करुन.
आणि एकोळी धागा आहे मान्य आहे, पण आमच्यासारख्यांना यातुन काही माहीती, नविन कल्पना मिळाल्या तर मदतच होते.
१ कप ज्वारीचे पीठ,१ कप बाजरीचे पीठ,१/२ कप डाळीचे पीठ,१/२ कप तांदूळाचे पीठ,पाव कप कणीक,पाव कप मूगाचे पीठ,पाव कप उडीदाचे पीठ, पाव कप सोयाबीन पीठ,१ चमचा मेथीची पूड,पाव कप नाचणी पीठ,२/३ चमचे धणे-जीरे पूड हे सर्व एकत्र करुन मायक्रोवेव्ह मधे ८ मि. भाजा.प्रथम ३ मि नंतर २ मि नंतर १/१ मि आतल्या आत(मायक्रोवेव्ह् मधे) हलवा.या मिश्रणची साधारण १ कि भाजणी तयार होईल.
तेलाच्या फोडणीत खमंग कांदाबिंदा घालून वरुन भाजणी पेरुन..जरा कोरडेच... पाणी बघून बघून घालत.
मी भाजणीत पाणी घालुन घट्तसर मळुन घेते व मग कान्दे चिरुन फोडणीत घालुन हिच भिजवलेली भाजणी हळु हळु मोकळी करन आत सोडते मग चान्गली परतते. मग थोड्यावेळ झाकण ठेवुन परत परतते म्हणजे ति अजुन छान मोकळी होते.
तसंच मला थालीपीठ आणि भाकरी हे दोन्ही पदार्थ थापून झाल्यावर उचलून तव्यावर टाकता येतील असे बनवता येत नाहीत.
कितीही प्रयोग केले तरी थापून थालीपीठरूप झालेला गोळा तव्यावर टाकण्यासाठी उचलला (उलथने किंवा हातावर) की भेगाळलेल्या जमिनीसारखा तुकडे तुकडे होऊन खाली पडतो.
कोरडा झालाय म्हणून पाणी घालावे तरी तो उचलताना उलथन्याएवढा चौकोन सोडला तर बाकीचा परत खाली गळून पडतो.
प्लॅस्टिक पिशवीवर थापले, पीठ लावून थापले, तेल लावून थापले, तरी तेच.
म्हणून मग मी तव्यावर डायरेक्ट थापतो. अर्थात हे एकाच थालिपीठाबाबतीत करता येतं. कारण मग तवा तापतो.
म्हणून एका थालीपीठाला एक तवा खर्ची पडतो.
घरात दोन तवे असल्याने मी एका वेळी दोनच थालीपीठे करु शकतो..
* प्लास्टिक पिशवीवर थापले, पीठ लावून थापले, तेल लावून थापले, तरी तेच.
प्लॅस्टिक पिशवीवर थापताना आधी काहिहि लावु नका. गोळा प्लस्स्तिकवर ठेवा मग थोडे तेल बोटांना लावुन थापायला घ्या, थापले जाइलच. तव्यावर घालताना आधी हळुच प्लॅस्टिक वरुन एका बाजुने हळुहळु मोकळे करुन हातावर घ्या न मग तव्यावर हळुच घाला. ह्या कामात धसमुसळेपणा कामाचा नाही, नाजुकपणाने काम करायला हवे.
प्लॅस्टिकवर आधी काहीही न लावता थापणे, नाजुकपणे, हलक्या हाताने.. थापला जातो व्यवस्थित. तव्यावर टाकताना प्लॅस्टिक उचलून सोडवायला गेला की संपूर्ण किंवा अर्धासुद्धा अखंड निघत नाही. लपके निघून येतात.
मला वाटतं मुळात तो पिठाचा गोळा भिजवण्यात गंडतं काहीतरी.
एक वाटी ज्वारीचे पिठ घेउन त्यात एक कांदा बारीक चिरुन घालावा, कोथिंबीर भरपुर,तिखट मिठ आवडीनुसार(चवीनुसार), थोडे जिरे व ओवा , सगळे एक्त्र मळा व तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर
थालीपिठ थापा, कडेने थोडेसे तेल सोडा व मंद आचेवर थालीपिठ भाजा. हे एकाच बाजूने भाजतो आम्ही,
भाजणी साठी कोणतीही पिठे कमीजास्त प्रमाण झाले तरि चालते, पण पिठे भाजून घेऊ नयेत, नुसतिच एकत्र मिसळून थालिपिठे करा.
माझी आजी अगदी अशीच नुसत्या ज्वारीच्या पीठात कांदा, कोथिंबीर, तिखट,मीठ, हिंग, हळद एवढ्या जिन्नसांवर अतिशय स्वादिष्ट थालिपीठं करायची आम्ही सगळी नातवंडे भरपुर हादडायचो. गेले ते दिवस... आता आजीला कधी भेटायला मि़ळतयं तेही माहीती नाही. :(
बाकी निवेदिताताई माझा पत्ता व्यनि करते बर का, व भाजणीची वाट पहाते. :)
प्रतिक्रिया
ते पीठातून करता येते की नाही
ते पीठातून करता येते की नाही माहीत नाही. पण साधारणपणे भाजणी म्हणजे वेगवेगळी धान्ये आधी भाजून मग एकत्र दळायची असे काहीसे असते. आमची आई दिवाळीच्या आधी असे सगळे करत असते. त्यामुळे माहीत.
बाकी जाणकार प्रतिक्रिया देतीलच.
तांदूळ पीठी २ वाट्या, बेसन १
तांदूळ पीठी २ वाट्या, बेसन १ वाटी, कणिक १/२ वाटी, उडदाचे पीठ १/२ वाटी, मूग डाळीचे पीठ १/२ वाटी,धणे जीरे पावडर, ओवा पावडर, हे सगळे सुट्टे भाजून मग एकत्र करून बघावे. मी यातले मूग आणि उडदाचे पीठ न घालता बाकीची पीठे घालून थालिपीठे करते. खाण्यालायक नक्कीच होतात.
ऑल द बेस्ट. :)
शंका
In reply to तांदूळ पीठी २ वाट्या, बेसन १ by प्राजु
पिठे कशी भाजायची?
लाडवासाठी बेसन भाजतो तशीच
In reply to शंका by पंगा
लाडवासाठी बेसन भाजतो तशीच फक्त कोरडीच, तूप घालयचं नाही.
ओह
In reply to लाडवासाठी बेसन भाजतो तशीच by प्राजु
ठीक.
धन्यवाद.
मीपण अशीच करतो
In reply to तांदूळ पीठी २ वाट्या, बेसन १ by प्राजु
मीपण अशीच काही करतो.
तांदळाचे पीठ, ज्वारी-किंवा-बाजरीचे पीठ, कणिक, कुठल्यातरी डाळीचे पीठ. प्रमाणे कमीजास्त. यातील बहुतेक प्रयोग खाण्यालायक झालेले आहेत.
भिजवून वाळवलेली, मग भाजलेली धान्ये मिसळून दळलेले पीठ... ती अस्सल चव मात्र नुसत्या भाजक्या पिठांच्या मिश्रणात येत नाही.
शक्य नसावे
तयार पिठांतून करता येणे बहुधा शक्य नसावे.
पण तुमचा स्थानिक देशी वाणी केप्रची वगैरे तयार थालिपिठाची भाजणी ठेवत नाही काय? अटलांटात आता काही वाणी अगदी नियमितपणे नाही, तरी बरेचदा ठेवताना दिसतात.
नाहीतर मग दोनतीन वर्षांतून जेव्हा केव्हा भारतवारी करत असाल तेव्हा बॅगा भरून घेऊन येणे हा एक उपाय. किंवा भारतातून कोणी येत असेल तर त्याच्याबरोबर. चांगला दोनतीन वर्षे पुरेल एवढा ष्टाक मागवायचा. आम्ही हेच करतो. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" संदर्भः पु.ल.)
मी तर गेल्या वर्षी ४ किलो
In reply to शक्य नसावे by पंगा
मी तर गेल्या वर्षी ४ किलो भाजणी आणली होती आणि फ्रिज करून ठेवली आहे.
आता त्यातली बरीच कमी झालेली आहे.
आमच्याकडचा वाणी चितळेंचं इडली मिक्स ठेवतो, केळकरांचा वर्हाडी ठेचा ठेवतो.. पण भाजणी आणत नाही. बिचार्याला सांगितलं तर समजतही नाही काय सांगतात ते.
फ्रीझ करण्याची...
In reply to मी तर गेल्या वर्षी ४ किलो by प्राजु
...गरज नसावी. तशीही चांगली राहते.
आमच्याकडे आहे एक वाणी, बर्यापैकी नियमितपणे ठेवतो. सरदारजी आहे. (म्हणजे मालक नव्हे. मालक गुजराती मुसलमान आहे. हा तिथे काम करतो.) त्याला व्यवस्थित कळते आणि माहिती असते सगळी. तुमच्यामाझ्यापेक्षा अस्खलितपणे अस्सल गावरान मराठी बोलतो. (लोणावळ्याचा आहे.)
असो.
अटलांटातील काही भाग माहिती आहेत
In reply to फ्रीझ करण्याची... by पंगा
हे दुकान कुठले?
बकहेड का डिकेटर?
क्लेरमाँट रोड
In reply to अटलांटातील काही भाग माहिती आहेत by गोगोल
आय-८५च्या क्लेरमाँट रोड एक्झिटजवळ.
टिकते का?
In reply to शक्य नसावे by पंगा
वर्षानुवर्षे,किमान एक वर्ष तरी टिकते का? कशी?
माझ्यामते कितीही कोरड्या डब्यात किंवा कशीही ठेवली तरी काही महिन्यांतच त्याला जाळी धरते.
झिप लॉकच्या पिशवीत ठेवुन आणि
In reply to टिकते का? by गवि
झिप लॉकच्या पिशवीत ठेवुन आणि शक्यतीतकी हवा काढुन फ्रिज किंवा फ्रिजर मध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. ( मी भाजणीच पीठ गेल वर्षभर फ्रिजमध्ये ठेवलय. जेव्हा गरज लागते तेव्हा काढतो.)
"भाजणीच्या थालिपीठाचे पीठ कसे
"भाजणीच्या थालिपीठाचे पीठ कसे बनवायचे?" -
उत्तर क्र. ०१ भाजणीची थालपीठं करणेत यावीत, मग ती कडक उन्हात वाळवणेत यावित, आणि पिठ काय, मिक्सर मधुन पण करता येईल किंवा खुप जास्त असेल तर चक्कीवरुन करुन आणा. हाकानाका.
इथं फॉर इथिओपिया की काय ?
असो, भाजणिच्या थालपिठं करण्यासाठी पिठ कसं करायचं ते आईला विचारुन सांगतो, थोड्या वेळात.
अवांतर - अजुन एक एकोळी धागा, खाण्याचा पुर्वतयारी संदर्भात '' जनातलं मनातलं ' मध्ये - मिपा अजुन गंडलेलच आहे काय ?
चक्की
In reply to "भाजणीच्या थालिपीठाचे पीठ कसे by ५० फक्त
खुप जास्त असेल तर चक्कीवरुन करुन आणा. हाकानाका.
अहो हर्षद मला वाटत शिल्पातैंना इथे म्हणजे परदेशात तयार पिठे मि़ळतात असे म्हणायचे असेल असे वाटते. इथे चक्की/गिरणी कुठली आलीये हो. आणि खाजगी चक्की विकत मिळते असे ऐकले आहे पण फार महाग असते ती. माझ्या एका ओळखीच्या बाईंची तर मागच्या दिवाळीला तर मोडली सुद्धा, चकलीची भाजणी करुन.
आणि एकोळी धागा आहे मान्य आहे, पण आमच्यासारख्यांना यातुन काही माहीती, नविन कल्पना मिळाल्या तर मदतच होते.
चकली ताईंचा ब्लॉग
चकली ताईंचा ब्लॉग बघा एकदा. त्यावर भाजणी कशी करायची ते सांगितल्याचे स्मरते
झटपट भाजणी
१ कप ज्वारीचे पीठ,१ कप बाजरीचे पीठ,१/२ कप डाळीचे पीठ,१/२ कप तांदूळाचे पीठ,पाव कप कणीक,पाव कप मूगाचे पीठ,पाव कप उडीदाचे पीठ, पाव कप सोयाबीन पीठ,१ चमचा मेथीची पूड,पाव कप नाचणी पीठ,२/३ चमचे धणे-जीरे पूड हे सर्व एकत्र करुन मायक्रोवेव्ह मधे ८ मि. भाजा.प्रथम ३ मि नंतर २ मि नंतर १/१ मि आतल्या आत(मायक्रोवेव्ह् मधे) हलवा.या मिश्रणची साधारण १ कि भाजणी तयार होईल.
करुन बघते...
In reply to झटपट भाजणी by प्राजक्त
करुन बघते...
कढइत भाज म्हणजे जास्त खमंग
In reply to करुन बघते... by शिल्पा ब
कढइत भाज म्हणजे जास्त खमंग होइल भाजणी.. ..दळताना भाजणी थोडी सरसरीत ठेव (अगदी बारिक पिठ करुन नकोस) ... थालिपिठे छान खुसखुशीत होतिल.
मोकळी भाजणी
थालीपीठाऐवजी मोकळी भाजणी म्हणून एक वेगळाच खमंग पदार्थ माझ्या आजीने शिकवला होता माझ्या ब्याचलर दिवसांत.
पण ब्याचलर नव्हे तर सर्वांनाच आवडेल असा आहे.
गोळा मळून थालीपिठे करण्याऐवजी उपम्यासारखे भाजणी वापरून बनवायचे, तेलाच्या फोडणीत खमंग कांदाबिंदा घालून वरुन भाजणी पेरुन..जरा कोरडेच... पाणी बघून बघून घालत.
पटकन तयार, नो कॉम्प्लिकेशन्स आणि टेस्ट झकास.
ऑफकोर्स थालीपीठ ग्रेट आहेच.
तेलाच्या फोडणीत खमंग
In reply to मोकळी भाजणी by गवि
तेलाच्या फोडणीत खमंग कांदाबिंदा घालून वरुन भाजणी पेरुन..जरा कोरडेच... पाणी बघून बघून घालत.
मी भाजणीत पाणी घालुन घट्तसर मळुन घेते व मग कान्दे चिरुन फोडणीत घालुन हिच भिजवलेली भाजणी हळु हळु मोकळी करन आत सोडते मग चान्गली परतते. मग थोड्यावेळ झाकण ठेवुन परत परतते म्हणजे ति अजुन छान मोकळी होते.
म्हणजे
In reply to तेलाच्या फोडणीत खमंग by पर्नल नेने मराठे
पेरलेलं पिठलं आणि ओतलेलं यातल्या फरकासारखं.
तसंच मला थालीपीठ आणि भाकरी हे दोन्ही पदार्थ थापून झाल्यावर उचलून तव्यावर टाकता येतील असे बनवता येत नाहीत.
कितीही प्रयोग केले तरी थापून थालीपीठरूप झालेला गोळा तव्यावर टाकण्यासाठी उचलला (उलथने किंवा हातावर) की भेगाळलेल्या जमिनीसारखा तुकडे तुकडे होऊन खाली पडतो.
कोरडा झालाय म्हणून पाणी घालावे तरी तो उचलताना उलथन्याएवढा चौकोन सोडला तर बाकीचा परत खाली गळून पडतो.
प्लॅस्टिक पिशवीवर थापले, पीठ लावून थापले, तेल लावून थापले, तरी तेच.
म्हणून मग मी तव्यावर डायरेक्ट थापतो. अर्थात हे एकाच थालिपीठाबाबतीत करता येतं. कारण मग तवा तापतो.
म्हणून एका थालीपीठाला एक तवा खर्ची पडतो.
घरात दोन तवे असल्याने मी एका वेळी दोनच थालीपीठे करु शकतो..
* प्लास्टिक पिशवीवर थापले,
In reply to म्हणजे by गवि
* प्लास्टिक पिशवीवर थापले, पीठ लावून थापले, तेल लावून थापले, तरी तेच.
प्लॅस्टिक पिशवीवर थापताना आधी काहिहि लावु नका. गोळा प्लस्स्तिकवर ठेवा मग थोडे तेल बोटांना लावुन थापायला घ्या, थापले जाइलच. तव्यावर घालताना आधी हळुच प्लॅस्टिक वरुन एका बाजुने हळुहळु मोकळे करुन हातावर घ्या न मग तव्यावर हळुच घाला. ह्या कामात धसमुसळेपणा कामाचा नाही, नाजुकपणाने काम करायला हवे.
हेही करुन पाहतो..
In reply to * प्लास्टिक पिशवीवर थापले, by पर्नल नेने मराठे
हेही करुन पाहतो..
पण ... तसं आठवलं तर मीही असेच केले होते.
प्लॅस्टिकवर आधी काहीही न लावता थापणे, नाजुकपणे, हलक्या हाताने.. थापला जातो व्यवस्थित. तव्यावर टाकताना प्लॅस्टिक उचलून सोडवायला गेला की संपूर्ण किंवा अर्धासुद्धा अखंड निघत नाही. लपके निघून येतात.
मला वाटतं मुळात तो पिठाचा गोळा भिजवण्यात गंडतं काहीतरी.
तेल घालता कि नाही भिजवताना ?
In reply to हेही करुन पाहतो.. by गवि
तेल घालता कि नाही भिजवताना ?
मीनाकुमारी
शेवटी मीनाकुमारी बेदम जाड झाल्यावर तिच्या चेहेर्याचे वर्णन माझा एक मित्र 'भोकांचे थालीपीठ' असा करत असे.
बाकी भाजणीचे पीठ कसे करायचे यावर तज्ञांनी प्रकाश टाकलाच आहे.
धन्यवाद...आणि चुचे, तयार
धन्यवाद...आणि चुचे, तयार पीठाचीच भाजणी कशी करायची आहे मला...काय आणि कुठे दळु?
अग तुझा प्र्श्न नहि बै सम्जला
In reply to धन्यवाद...आणि चुचे, तयार by शिल्पा ब
अग तुझा प्र्श्न नहि बै सम्जला मला :-/
म्हंजे आमच्याकडे दळणासाठी
In reply to अग तुझा प्र्श्न नहि बै सम्जला by पर्नल नेने मराठे
म्हंजे आमच्याकडे दळणासाठी गिरण्या नाहीत.;)
बाकी मी भारतातून येताना तीनेक किलो किंवा सामान जेवढी बसेल तेवढी भाजणी आणते.
मध्यंतरी संदीप चित्रेने पुरवलेल्या माहितीनुसार ज्यु जर्सीत उपासाची आणि साधी भाजणी पुरवणारे मराठी कुटुंब आहे म्हणे!
आमच्या इथेही इंडीयन ग्रोसरीत भाजणी मिळत नाही.
चला आता मिच पाठवते सगळ्य़ांना
In reply to म्हंजे आमच्याकडे दळणासाठी by रेवती
चला आता मिच पाठवते सगळ्य़ांना भाजणी...
नुसते ज्वारीचे पिठ असेल तरीही थालीपीठ मस्त होते
एक वाटी ज्वारीचे पिठ घेउन त्यात एक कांदा बारीक चिरुन घालावा, कोथिंबीर भरपुर,तिखट मिठ आवडीनुसार(चवीनुसार), थोडे जिरे व ओवा , सगळे एक्त्र मळा व तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर
थालीपिठ थापा, कडेने थोडेसे तेल सोडा व मंद आचेवर थालीपिठ भाजा. हे एकाच बाजूने भाजतो आम्ही,
भाजणी साठी कोणतीही पिठे कमीजास्त प्रमाण झाले तरि चालते, पण पिठे भाजून घेऊ नयेत, नुसतिच एकत्र मिसळून थालिपिठे करा.
माझी आजी
In reply to नुसते ज्वारीचे पिठ असेल तरीही थालीपीठ मस्त होते by निवेदिता-ताई
माझी आजी अगदी अशीच नुसत्या ज्वारीच्या पीठात कांदा, कोथिंबीर, तिखट,मीठ, हिंग, हळद एवढ्या जिन्नसांवर अतिशय स्वादिष्ट थालिपीठं करायची आम्ही सगळी नातवंडे भरपुर हादडायचो. गेले ते दिवस... आता आजीला कधी भेटायला मि़ळतयं तेही माहीती नाही. :(
बाकी निवेदिताताई माझा पत्ता व्यनि करते बर का, व भाजणीची वाट पहाते. :)
वा
वा! चांगले उपाय दिले करून पाहतो.
आमच्याकडे कधी कधी पळसुल्यांच्या कृपेने मिळते.
मग दोन चार किलो घेउन ठेवतो! :)