सल्ला हवाय .....
मी डोंबिवलीत मध्ये जागेचा एक सौदा दलाला मार्फत केला होता. त्या सौद्यात मी माझे काही पैसे जागा मालकाला देऊन झाले होते परंतु जागा मालकाच्या काही कौटुंबिक कारणाने त्याने तो सौदा मोडला आणि त्याने मला मी देलेल्या रकमेचे धनादेश दिले , दुर्दैवाने ते धनादेश वटले नाहीत. यावेळी तो मालक म्हणतो आहे कि तो पैसे रोखीने देईल , पण असे सांगत सांगत ८ दिवस उलटून गेले आहेत आता तो फोन उचलत नाही आणि मला आणि ब्रोकर दोघानाही भेटण्यास टाळाटाळ करत आहे . त्या संबंधी मी आणि ब्रोकर दोघेही पोलिसांकडे गेलो असता मला कोर्टात केस करा असा सल्ला देण्यात आला आहे . मी सौदा करताना १०० रु बॉन्ड पेपर वर टोकन करार नामा केला आहे आणि त्यात मी देलेल्या रकमेचा उल्लेख हि आहे तसेच ब्रोकर सह २ जण साक्षी दार आहेत ( मी हि पैसे धनादेशाने देले होते जे त्याने लगेच वटवून घेतले). तरी मी धनादेश न वटल्या बद्दल त्यावर कशी केस करू शकेन? त्यात साधारण किती वेळ आणि खर्च येईल. कोणी मिपाकर यावर मार्गदर्शन करेल का? सध्या मी या प्रकरणामुळे खूप आर्थिक अडचणीत आलो आहे.
========================================
सल्ला आणि मदतीच्या अपेक्षेत
चिपळूणकर
वाचन संख्या
4507
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या दलालाला पकडा आता... हि
विषय
तुमच्या प्रकरणास खालीलपैकी
चिपळुणकर
वेताळ बाबा लई भारी उपाय
हनुमान वसुली एजन्सी
कुंद्या !! टार्याला व्यनी कर
In reply to हनुमान वसुली एजन्सी by टारझन
चांगला उपाय!!
In reply to हनुमान वसुली एजन्सी by टारझन
+१
कायदेशीर प्रक्रिया