नमस्कार मिपाकरांनो...
गेल सुमारे वर्षभर मी मिपावरच लेखन, पाककृती सगळ वाचतो आहे. आज पहिल्यांदाच काही लिहिण्याची (अशुद्ध मराठीत) हिम्मत करतो आहे. मिपावरच लेखन, प्रतिक्रिया या सगळ्या उच्च कोटीतल्या असल्याने पहिल्याच प्रयत्नात तस उंच काही लिहिता येईल अस नाही. पण बर्याच दिवसांपासूनचा किडा आज इतक मस्त (झणझणीत) जेवण झाल्यामुळे बाहेर पडू पाहत आहे. त्याला वाट द्या :)
मी आज 'घुटे' या अस्सल मराठी (मावळी) आमटीच्या प्रकाराची पाककृती देत आहे. ही आमटी मी मिपावरच कधीतरी वाचली आहे पण हा फक्त (माझ्यादृष्टीने) पाककृतीत सांगून संपवायचा पदार्थ नाहीये, याला एक सुंदर गावाकडची पार्श्वभूमी आहे. मी ‘शिवापूर’ या पुण्याजवळच्या एका ऐतिहासिक खेड्यातला. छत्रपती इथे लहानपणी काही वर्ष राहिलेले. जिजाऊ साहेबांच्या चोळी-बांगडीच्या वहिवाटीचे आणि बलात्कारी गुजर पाटलाचे गाव रांझे, शिवापूरच्याच बाजूला निसवलेले. दादोजींनी वसवलेली आमराई आणि तिच्यातालाच एक आंबा धन्याच्या अपरोक्ष खाल्ला म्हणून बाराबंदीची एक बाही कापली गेलेली माझ्याच गावाने पहिली. या आमराईला आता ‘खेड-शिवापूर बाग’ अस म्हणतात. आता इथले आंबे नव्हे तर अंजीर आणि भेळ प्रसिद्ध
झाले आहे :)
मिर्झा राजा जयसिंह, दिलेरखान, मुरार जगदेव, शाहिस्ताखान यांची घोडी शिवापूरच्याच पाठीवरून गेलेली. कारण शिवापुराहून जरा टाचा उंच करून पाहिलं कि पुरंदर, तोरणा, राजगड, सिंहगड, वरंध यांचे खांदे दिसायला लागतात. दीड कोसांवर कोंढणपुरची तुकाई देवी आणि पुढे अर्ध्या कोसावर कोंढाणा तोलून असलेली कल्याण आणि अवसरवाडी हि गावं. याच तुकाई देवीच्या जत्रेत राजांनी अनेक वेळा पागोट्यानच्या कुस्त्या पाहून जाताना तुकाईची साडी चोळी केलेली.
तर अशा या सर्व शिवाकालाच्या ठेवी माझा गाव अजूनही छाती फुगवून राजांनी बांधलेली मंदिरे, बांध अशा गोष्टींमार्फत येणाऱ्या जाणार्यांना दाखवण्याचा प्रयत्न करीत असते. तशाच काही चालीरीतीतून आणि तेव्हाच्याच चुलींवरून झिरपत झिरपत अजूनही शेतात दरवर्षी हजेरी लावणारी, फक्त पळसाच्या पानांनी काड्यांचे टाके मारून जोडलेल्या पत्रावळीत चव आणणारी आणि बैलांच्या मागच्या हकार्यानी, भातलावणीच्या अस्सल गवळणीनी नादावलेली हि घुट-भाताची पाककृती लिहिताना मला आज इतक्या वर्षांनतरही चारही बाजूंनी हिरव्या डोंगरांनी घेरलेल्या शेतातल्या भात खाचरांमध्ये डोक्यावरून इरलं घेऊन चालतानाचा कातर प्रत्यय येतोय. हि मेजवानी शेतात काम करणाऱ्या, बोलवून आणलेल्या गडी माणसांना दुपारच्या जेवणात भातलावणीच्या वेळी देतात. उडदाची डाळ हि सर्व डाळीमध्ये श्रीमंत !! म्हणून घुट याच डाळीच होत असावं.
हि एवढी वातावरण निर्मिती पुरे होईल असं समजून मुद्द्यास हात घालतो. (वाचक सुद्न्य बल्लव आहेत, ह्या हिशोबाने प्रमाण देत आहे. बाकी मीही भावनांना समजूनच पाककृती प्रत्यक्षात उतरवत आलो आहे !)
साहित्य : एक वाटी उडीद डाळ, (वैयक्तिक)उग्रपणानुसार आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता.
फोडणीसाठी: तेल, मोहरी, हिंग आणि जिरे.
कृती: आधी उडीद डाळ शिजवून, घोटून घ्या. मध्यंतरामध्ये आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर यांचे मस्त
वाटण करून घ्या. तापलेल्या (प्रधान्येकरून) लोखंडी भांड्यात फोडणी करून वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
शिजवून घोटलेली डाळ घाला. आपल्या अंदाजानुसार मीठ घाला. एक उकळी आली कि कोथिंबीर पेरून पुन्हा एक
उकळी पर्यंत वाट बघा. आली कि उतरवा आणि बाह्या मागे सारून भाताबरोबर किंवा शिळ्या भाकरीबरोबर ओरबाडा :)
(हीच पद्धत मुगाच्या डाळीसही लागू पडू शकते.)
ता. क. : घुटे खाऊन तृप्त होई पर्यंत हि पाककृती जगास ओरडून सांगावी हे आमच्या मंद बुद्धीस न उमगल्यामुळे या पाककृतीचे फोटू काढू शकलो नाही, गरिबास येक वेळ माफी करावी. तरी हा प्रयत्न जगून वाचून आपल्या पसंतीस उतरलाच तर आमच्या खजिन्यातील बाकी सर्व रत्नांचा तुम्हास चित्रमय प्रवास घडवू या वचनावर आमच्या मिशीतील अनेक केस उधार राहण्यास तयार आहेत :) हे कळावे. धन्यवाद !
वाचन संख्या
16791
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
नो फोटू
छान
मिपावर मागे एकदा शाल्मलीनं ही
शाल्मली..
In reply to मिपावर मागे एकदा शाल्मलीनं ही by रेवती
उडदाचं वरण करतात त्याला काय
In reply to शाल्मली.. by स्वाती दिनेश
मस्तच
छान लिहलय...अजुन तुमच्या गावा
सहमत
घुट मी माझ्या एकटी पुरत करुन
आमच्याकडे सुध्दा असेच होते.
In reply to घुट मी माझ्या एकटी पुरत करुन by स्पंदना
आहा
जोशीले व कच्ची कैरी यांच्याशी
व्वा ! करुन बघते आजच माझी एक
तांदूळ घातले की सूप म्हणून
In reply to व्वा ! करुन बघते आजच माझी एक by मितान
छान
मस्त , माजेहे सासवडची मावशी
एक शंका..
बुळबुळित
In reply to एक शंका.. by गणपा
@एक शंका. उडदाच्या डाळी मुळे
धन्स निवेदिता-ताई.
In reply to @एक शंका. उडदाच्या डाळी मुळे by निवेदिता-ताई
थँक्स निवेदिता ताई , छान टीप
In reply to @एक शंका. उडदाच्या डाळी मुळे by निवेदिता-ताई
खुपच मस्त. मी पण मावळातीलच
हिरव्या मिरचिचा खर्डा विसरला
छान!
धन्यवाद :)
घुटं केलं घुटं सांगु नका कुठं!
अचानक आज हा पदार्थ आठवला.
तोंपसु....
In reply to अचानक आज हा पदार्थ आठवला. by पिलीयन रायडर
इडलीसाठी तांदुळ भिजवत बसावे
In reply to तोंपसु.... by संजय पाटिल
अत्यंत आवडते
खोबरे आहे ते उत्तम, पण....
In reply to अत्यंत आवडते by चौकटराजा
पण एकंदरीत एखाद्या डाळीचे
In reply to खोबरे आहे ते उत्तम, पण.... by फेदरवेट साहेब
अभिनंदन, लेखनाचा हेतू मला स्पष्ट कळला नव्हता
In reply to पण एकंदरीत एखाद्या डाळीचे by सूड
बेअरिंग फार लवकर सुटत गेलं
In reply to अभिनंदन, लेखनाचा हेतू मला स्पष्ट कळला नव्हता by फेदरवेट साहेब
हॉय. पास झालो मराठी भाषा
In reply to बेअरिंग फार लवकर सुटत गेलं by पिलीयन रायडर
अकलेचा फर्मास टेंभा ,
In reply to अभिनंदन, लेखनाचा हेतू मला स्पष्ट कळला नव्हता by फेदरवेट साहेब
आजच घडलेला किस्सा..
In reply to अभिनंदन, लेखनाचा हेतू मला स्पष्ट कळला नव्हता by फेदरवेट साहेब
जातीचा उल्लेख जातीय नाही...
In reply to खोबरे आहे ते उत्तम, पण.... by फेदरवेट साहेब
+ १, पटेश. इथे जातीचा उल्लेख
In reply to जातीचा उल्लेख जातीय नाही... by चौकटराजा
पेपरवेट साहेब,
In reply to खोबरे आहे ते उत्तम, पण.... by फेदरवेट साहेब
इथे मिपावर जातीयवादाच्या
In reply to पेपरवेट साहेब, by अप्पा जोगळेकर
हायला! घुटाची पाकृ मिपावर
टायपो नाही.
In reply to हायला! घुटाची पाकृ मिपावर by आदूबाळ
धन्यवाद! मस्त शब्द आहे!
In reply to टायपो नाही. by राही
कॅल्शिअमसाठी डॉक्टरनी घुटं
हे घुटं मला फार आवडतं..
हे घुटं मला फार आवडतं..