चांदण्यारात्री गवताच्या पात्यावरच्या दवाबिंदुला फुंकर मारून त्या ओघळणार्या मोत्यांना पाहताना...
वार्याच्या खोड्यांमुळे नदीच्या हलणाऱ्या चंदेरी पदराला पाहून...
पहाटेच्या गार वार्यात कासेला बिलगून पच पच आवाज करून दुध पिताना वासराला पाहून...
मंदिराच्या धुपाने भरलेल्या गाभार्यात घंटानादात मंद तेवणाऱ्या सामायीला पाहून...
सांजवेळी वाळूत हळुवारपणे पावलांना शिवून परत मागे पळून जाणार्या अल्लड लाटांना पाहून...
एखाद्या तेजोवालायाधारी तपास्वीसारखा स्वतःच्या द्वैताची आहुती देऊन अद्वैत दिनकरला सागरात विलीन होताना साक्ष देताना...
वाटतं आयुष्य इथेच थांबावं...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1661
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ..
सुंदर
शब्द .. विशेषने खुपच जबरदस्त
छान
ओ काकु .. ती कविता आहे ...
In reply to छान by कच्ची कैरी
कविता छान ! वाटतं आयुष्य इथेच
कवितेच्या एकेका ओळीत एकेक