आज माघ चतुर्थी, श्री गणेशाचा जन्मदिवस. त्यानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
पुणे नासिक महामार्गावरील मंचर पासून अवघ्या २.५ कि.मी. अंतरावर असणारे आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग हे गाव निसर्गसंपन्न डोंगररांगांच्या कुशीत वसले आहे. लेण्याद्रि गिरिजात्मजाचे हे मुख असुन अर्धपीठ म्हणून हि याचा उल्लेख आहे , सदर देवस्थान करिता थोरले बाजीराव पेशवे यांनी दर साल एक रुपया ची सनद दिली होती ,तीच सनद इंग्रजांच्या काळात देखील चालू असल्याचे कागदोपत्री दिसून येते.सदर मंदिराच्या समोरच उत्तरेला लेण्याद्री च्या गिरीजात्मजाची पाठ असून दोन्ही मंदिरांची उंची सारखीच आहे.एका छोट्याशा बंधाऱ्या च्या काठावर हे गणेश मंदिर आहे. बंधाऱ्या तील हिरवेगार चकाकणारे पाणी, भव्य आकार, भोवतालचा रमणीय परिसर व सह्याद्री पर्वताची पार्श्वभूमी हे सारे पाहून मन प्रसन्न, आनंदी होते.या उत्सवाच्या काळात हजारो गणेशभक्त श्री मोरयाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावतात.देवस्थानच्या वतीने प्रवचन, कीर्तनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम,भजनाच्या गजरात श्रींची सवाद्य मिरवणूक,महानैवेद्य व्यवस्था केलेली असते.
वर उल्लेखलेली सनद मोडी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये तेथे फलकावर लावली आहे.
असे म्हणतात कि याच्या दर्शना शिवाय अष्टविनायक यात्रा अपूर्णच रहाते,
तेव्हा मिपा वरील गणेश भक्तां साठी हि माहिती ,
श्री गणेशाला आणि सर्व गणेश भक्तांना विनम्र अभिवादन.
वाचने
12563
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपती बाप्पा मोरया !! गणपती
फोटु छाण आहेत ... वरुन तिसरा
टार्या खरा पुण्यवान
In reply to फोटु छाण आहेत ... वरुन तिसरा by टारझन
फोटू दिसत नाहीयेत
कारण
In reply to फोटू दिसत नाहीयेत by स्पा
पुण्यवान
वडगांव काशिंबेग
माफ करा आजानुकर्ण
In reply to वडगांव काशिंबेग by आजानुकर्ण
गणपती बाप्पा मोरया... माघी
गणपती बाप्पा मोरया
एकूण इतिहास पाहीला तर असे
In reply to गणपती बाप्पा मोरया by प्रचेतस
सहमत
In reply to एकूण इतिहास पाहीला तर असे by llपुण्याचे पेशवेll
>>>>हिंदू धर्माचे पुनरुत्थान
In reply to सहमत by प्रचेतस
धन्यवाद
In reply to >>>>हिंदू धर्माचे पुनरुत्थान by अवलिया
तिरुपती बालाजी.
In reply to एकूण इतिहास पाहीला तर असे by llपुण्याचे पेशवेll
मंदिरांची सत्यता.....
आम्हाला जाणकार म्हटल्यामुळे
In reply to मंदिरांची सत्यता..... by डावखुरा
अहो माझ्या आजवरच्या
In reply to आम्हाला जाणकार म्हटल्यामुळे by llपुण्याचे पेशवेll
या विषयावर शरद अधिक
In reply to मंदिरांची सत्यता..... by डावखुरा
माहिती छान दिली आहे, मला हे
मागील आठवड्यात अष्टविनायक
छोटीशी भर
वर्षाच्या २४ चतुर्थीना
In reply to छोटीशी भर by प्रशु
छान माहिती गणपती बाप्पा
धन्यवाद