बर्याचदा मिपावर नवीन काही आले की ते आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्यावर लोक कसे कसे असू शकतात त्याची जाणीव होते.
पानभर लेखावर दाणकन दिलेल्या पानभर प्रतिक्रिया, सटासट दिलेले संदर्भ, खपकन काढलेले जुने/ नवे मुद्दे (अनासपुरे स्टाईल), प्रतिक्रियांमधे असलेला आणि दाखवून दिला गेलेला विरोधाभास, भराभर आलल्या लिंका, एकमेकांची खेचाखेची आणि बरेच काही.....
सगळे बघितले की वाटते ही माणसे 'ल....य भारी' असतील.
काही विद्वज्जनांचे वर्च्युअल चेहरे देखील डोक्यात फिट्ट झालेत. काही लोक षटीसामाटी तरी हसत असतील का किंवा त्यांना विनोद अजिबात कळत नाही का अशा पद्धतीचे वाटतात. अतिशय पोरकट आणि खेचू प्रतिक्रियेवर आलेली समीक्षापूर्ण, गंभीर आणि पानभर प्रतिक्रिया कधी कधी ' काय शॉट आहे राव डोक्याला' असे म्हणायला भाग पाडतात.
काही लोक निव्वळ टवाळी करण्यासाठी येतात. तर काही आपले बोळे काढण्यासाठी. हे बोळेकाढू स्वतःच्या इतके प्रेमात असतात की असे वाटते प्रत्यक्ष भेटले तर गदागदा हलवून 'रां**, जरा उठून जगाकडे बघ की रे भा*' असे म्हणावे. वय किती, पगार किती, बोलतात किती???
काही लोक प्रत्यक्ष प्रचंड वैताग असले तरी इकडे 'अगदी म्हणजे अगदी सगळं कसं छान चाललंय वगैरे असं' म्हणणारे नायगावकरी.
महिला मंडळ बर्याचदा छानपैकी गूडीगूडी, तरल, स्वप्नांना शब्दबद्ध करणारं लिहिणारं. सन्माननीय आणि 'ठळक' हा शब्दही 'पुसट' करणार्या अपवादांबद्द्ल नाही मी बोलत. तो विषय वेगळा.
मिपावरील चान चान मंडळींनी बनवलेल्या तरला दलालला काँप्लेक्स येईल अशा सुंदर पाकृ बघूनच पोट भरते.
दृष्ट लागू नये म्हणून लावल्या जाणार्या 'काळी तीट' सारखे काही लोक आणखीच मजा आणतात. विषयाशी पूर्ण विसंगत, मी एकटाच शहाणा/णी, वास्तव जगात असलेल्या पद, प्रतिष्ठा, संपती, वय (?) यांचा कळत नकळत आलेला आणि आंतरजालावर वावरताना न सोडता आलेला अहंकार, स्वतःचेच खरे म्हणण्याची वृत्ती, त्यातून होणारे वाद विवाद मजा आणतात.
जवळपास तीन वर्षे मिपा वाचतोय. वर लिहिलेल्या गोष्टी जाणवल्या. लिहिल्या. कुणाचा हिरमोड, अपमान करण्याचा हेतू अजिबात नाहीये. एवढेच म्हणेन की हा मिसळ्पाव सगळ्यांचीच बौद्धिक भूक भागवतोय. अगदी चौरसच नाही तर सर्वरस आहार देऊन.
वाचन संख्या
4272
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त, छोटासा लेख.
उगाच नाही हं लोकं तुला "
बंड्या पळ
In reply to उगाच नाही हं लोकं तुला " by टारझन
लोक कसे कसे असू शकतात हे
बर्याचदा मिपावर नवीन काही
प्यारे
काय हर्षद राव... आमच्या हापिस
आवडलं हो निश्चितच, फक्त अपवाद
लन्च नंतर मोठ्या उत्साहात
मस्त एकदम .. आवडले लिहिलेले
अजून एक....
सूर्यपुत्र = शनि शनि हा
In reply to अजून एक.... by सूर्यपुत्र
तरीच....
In reply to सूर्यपुत्र = शनि शनि हा by शुचि
या पहा शनिमहात्म्यातील ओळी
In reply to तरीच.... by सूर्यपुत्र
स्वतःचा हात स्वतःला लागत नसतो
In reply to अजून एक.... by सूर्यपुत्र
अहोऽऽऽ
In reply to स्वतःचा हात स्वतःला लागत नसतो by मुलूखावेगळी
कुणालातरी हे काम करणे आवश्यकच
In reply to अहोऽऽऽ by सूर्यपुत्र
+१
समाज जीवनाचा आरसा
हॅ हॅ हॅ
In reply to समाज जीवनाचा आरसा by सहज
इथे काही आयडी आहेत त्यांची
प्यारे१
मिपा वर सगळ्यात जास्त उणीव