चेरी केक अनेक प्रकारांनी बनवता येतो त्यापैकी हा चेरी केक तुम्हाला माहित आहेच.
आजच्या चेरी केक साठी साहित्य- १२५ ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ४ अंडी, २५० ग्राम मैदा,१ चिमूट मीठ,२.५ चमचे बेकिंग पावडर, १/४ कप अॅपल किवा ऑरेंज ज्यूस, १ चमचा लिंबाचा रस + १ चमचा लिंबाची सालं किसून,
५०० ग्राम बरणीतल्या /टिन मधल्या पाकातल्या लाल चेरी
(ह्या चेरी आंबटगोड असतात म्हणून फ्लेवरला वॅनिला किवा तत्सम कोणताही इसेन्स न घालता लिंबाचा रस+ सालं घाला.लिंबाचा इसेन्स मिळाला तर ह्या बरोबर तोही १/२ चमचा घाला.)
कृती- पाकातल्या चेरी चाळणीवर टाकून पाक निथळत ठेवा.
बटर चांगले फेटा,त्यात साखर मिसळा आणि परत फेटा. अंडी फोडून त्यात घाला व फेटा. लिंबाचा रस व किसलेली सालं घाला , लेमन इसेन्स असेल तर तो घाला.
मैदा + बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ एकत्र करा व ते वरील मिश्रणात थोडे,थोडे घाला व फेटा. मिश्रण एकजीव झाले की संत्रा किवा अॅपल ज्यूस घाला.
केक मोल्ड ला बटर लावा, त्यावर वरील मिश्रणातल्या निम्म्यापेक्षा थोडे जास्त मिश्रण घाला. त्या मिश्रणावर चेरीज पसरुन घाला व उरलेले मिश्रण घालून चेरी झाकून टाका.
१७० अंश से ला प्रिहिटेड अवन मध्ये ४० ते ४५ मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच- केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा. मिश्रण न चिकटता सुई/सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या.
पिठीसाखरेने सुशोभित करा.



वाचन संख्या
5360
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मागील केक करुन बघितला छान
स्वातीतै, चार दिवस तू कुठेतरी
हा हा हा ...
In reply to स्वातीतै, चार दिवस तू कुठेतरी by परिकथेतील राजकुमार
हवा पालट करायला पुणे एक छाण
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
>>हवा पालट करायला पुणे एक छाण
In reply to हवा पालट करायला पुणे एक छाण by टारझन
वरील दोन्ही महाभागांशी सहमत.
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
+१
In reply to वरील दोन्ही महाभागांशी सहमत. by गणपा
आमच्याकडं काय छान हवा आहे
In reply to +१ by नंदन
अरे काय आहे हे!
वा!
मस्तं झालाय केक .फोटो सुध्दा
मनातलं बोललात!
In reply to मस्तं झालाय केक .फोटो सुध्दा by धनुअमिता
हा केक अंडी न घालता कसा करायचा हे सांगाल का? ......मलाही सांगा..
In reply to मस्तं झालाय केक .फोटो सुध्दा by धनुअमिता
मास्टरशेफ
एक सुधारणा
In reply to मास्टरशेफ by कच्ची कैरी
अग्ग्ग्ग्ग्ग्ग! अशक्य्....केव
तू खरंच, पुन्हा एकदा भ्रमण
हेच म्हणतो..
In reply to तू खरंच, पुन्हा एकदा भ्रमण by प्राजु
अरे काय चाल्लाय काय हे! किती
केक एकदम टेंम्टिंग..
मस्त दिसतोय केक. एकदा करुन
अशक्य! तो शेवटा फोटो पाहून
धन्यवाद