अविनाशराव, काय चुकले हो साहेबांचे? जीभाच काय, यांचे तर हात, पाय वगैरे पण छाटले पाहिजेत. किती त्या गरिब बिचार्या राजकारण्यांना छळावे?
आणि तुम्ही जे म्हणता कि वाळू माफिया, भू माफिया, तेल माफिया यांच्याबद्दल बोलताना राजकारणी लोक शेपुट घालतात कारण तो त्यांचा साईड बिझनेस असतो ना. मग आपल्याच धंद्याबद्दल असे वाईट-साईट बोलून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारुन घेण्याइतके ते मूर्ख नक्किच नाहीत.
आणि मिडीया असले काहीतरी नाही ते विषय काढून त्यांना जेरीस आणायचा प्रयत्न करतात, मग त्यांना दंडुके नाही मारायचे तर काय आरती ओवाळायची?
पवार यांची मुक्ताफळे ऐकताच सर्व पत्रकार कार्यक्रमातून निघाले. हे पाहून ते पुन्हा भडकले. ‘मला माहीत आहे, हे असेच करणार. यांना तर दंडुके मारले पाहिजेत,’ असे ते म्हणताच पोलीस अधीक्षक व कमांडो धावत आले. त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. उपस्थित सर्व पत्रकारांनी या दादागिरीच्या वक्तव्याचा निषेध केला.
आ? म्हणजे मंत्री काहीतरी बोलले आणी ताबडतोब कमांडो धावत आले मारायला?बातमी में कुछ तो काला है.
(मी घड्याळ्,चेन्,कडे वापरत नाही)
अॅक्चुली पत्रकारांना दंडूके मारून फार काही होणारच नाही. उलट ते अजूनच पेटतात. आपल्या दाढीवाल्या मामांना तत्कालीन शिवसैनिक नारायण राणे व नंतर 'पत्रकार' संजय राऊतांनी मारहाण केली होतीच की. त्यानंतर टॉनिक मिळाल्यासारखा दाढीवाल्या मामांचा अश्वमेध जो उधळलाय, तो आपण सर्वच पाहतो आहोत.
भारी समर्थता.क.: युवराज उद्धव साहेबांनी तसेच सौ. सौ. सौ. निलम ताई ताई ताई गोर्हे यांनीही अजित पवारांचा निषेध केला. कीव करण्यासारखी गोष्ट म्हणजे, वारसाहक्काने गादीवर आलेल्या कलानगर मधील युवराजांनी दिल्लीतल्या युवराजांवर कोणत्या नैतिकतेने घराणेशाहीचे आरोप केले होते? सौ. सौ. सौ. निलम ताई ताई ताई गोर्हे का बोलतात हेच मुळात एक कोडे आहे.
प्रतिक्रिया
काय चुकले?
-
आगदी बरोबर आहे...
बिहार झाला आहे महाराष्ट्राचा.
आणि आता
हा काय
अपेक्षा...
सगळेच एका माळेचे मणी.
आजचा सवाल
अश्वमेध