गणपास समर्पित
तसा मी कधी कधी जेवण बनवतो.
पण आज म्हटलं कि गणपाने दिलेली पाकृ वापरून पाव भाजी बनवून बघावी म्हणून हा प्रपंच.
तर मंडळी गणपा वंदन करून केलेली पावभाजी
गणपाने सांगितल्याप्रमाणे अपूर्व तयारी म्हणजे
३ बटाटे
थोडे मटार
थोडी फुल कोबी
आणि मग पूर्व तयारी
२/३ कांदे बारीक चिरून घेतले
लगेहाथ टोम्यातोलाही (इची भैना ह्यो तो काय ठीक नाय होवून ऱ्हायला भाऊ ) सुरीचा इंगा दाखवला.
लसून आणि आले मिक्सर मधून काढले आणि त्यात २ हिरव्या मिरच्या पण टाकल्या. खानदेशी माणूस म्हटलं कि .................
आता वेळ झाली कांदा पारदर्शक बनवायची (काही जणांना पारदर्शक गोष्टींचं फार फार आकर्षण असते तो भाग वेगळा)
तर कांदा तेलात तळून पारदर्शक केला आणि मग त्यात आले लसून आणि मिरची चा घोळ बनवून टाकला आणि तो हि चांगला परतून घेतला
ठसका आणायची वेळ आलेली आहे म्हणून त्यात चांगला ३/४ चमचे तिखट टाकले आणि मंद अग्निवायुवर ३/३ मिनिट तळू दिले.
टोमातोची आहुती ......
मग आवश्यकतेनुसार मिठाचा मारा आणि वरून त्यात लोण्याचा गोळा टाकला तो फुर्र्दीशी वितळला कुठे मी आणि कुठे फोटू खीचू यंत्र (शक्तिमान कडून साभार) अशी अवस्था झाली.
मग सरते शेवटी त्यात कोथिंबीर टाकून शेवटचा हाथ फिरवला.
हुशस्स्स्श झालेएकदाचे
आता करा सजावट कठीण काम बाबा
पुन्हा एकदा कांदा चिरला आणि लिंबू कापला.
त्या कांद्यामुळे माझे डोळे पाणावले (सध्या मिपावर डोळे पाणावायची साथ आलेलीच आहे.)तिथे कॅमेऱ्याची काय कथा म्हणून शेवटचा फोटो धूसर झालाय कॅमेऱ्याच्या डोळ्याला पण पाणी आले होते.
गुडगाव मध्ये मुंबईचे पाव मिळत नाही म्हणून दुधाची तहान ताकावर.
तर मंडळी हा माझा मिपावरील पहिला प्रयत्न आहे.आतपर्यंत फक्त वाचनमात्र भूत होतो.
सहकार्य अपेक्षित
.
वाचने
5373
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
वा वा वा! पु. पा. कृ. शु.!
अरे वा तु इरसालच आहेस बाबा
आजकाल मीपावर येउच नये असं
मस्त मस्त....मस्त.... मला फ़ार
In reply to मस्त मस्त....मस्त.... मला फ़ार by निवेदिता-ताई
फ़ोटोही...............झक्कास
मस्त
श्री. इरसाल, आपण दोघे गणपाज
चवदार
खालून तिसरा फोटो...
आयला राव तुम्हीबी....
कॅमेराच्या डोळ्यातले पाणी
हे हे हे चला अजुन एकाला
सिमला मिर्ची घालायची राहिलि
धन्यवाद मिपाकरहो,