मी slovakia ला आल्यावर केलेली सगळ्यात पहिली recipe.
साहित्य :
बोनलेस चिकन - ५०० ग्रॅम
ढोबळी मिरची - १/२
कांदा - १/२
दही - ३ चमचे
आले लसुन पेस्ट - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
काळी मिरी पावडर - १/२ चमचा
आचारी मसाला (बेडेकर चा तयार लोणच्याचा मसाला वापरला तरी चालेल) - १ चमचा
बटर - २ चमचे
मिठ चवीनुसार
चाट मसाला चवीनुसार
कबाब भाजण्यासाठी वापरतात, त्या सळ्या किंवा लाकडाच्या sticks
कॄति :
१. चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. त्याच प्रमाणे ढोबळी मिरची व कांद्याचे मोठे तुकडे करावे.
२. चिकनला दही, आले लसुन पेस्ट , लाल तिखट, गरम मसाला , काळी मिरी पावडर , आचारी मसाला व मिठ लावुन १-२ तास marinate करावे. ह्या मधेच कांदा व ढोबळी मिरची टाकुन marinate करावे.
३. oven २५० degree celcius वर १० min preheat करावा.
४. सळ्यांना थोडे बटर लावावे.
५. प्रत्येक सळई मधे ढोबळी मिरची, चिकन आणि कांदा ह्या क्रमाने लावावे.
६. ह्या सळ्या oven मधे ठेवुन २५० degree celcius वर १० min ठेवाव्यात.
७. १० min नंतर oven मधुन काढुन बटर लावावे आणि परत oven मधे ठेवावे.
८. ५-७ min नंतर कबाब तयार होतील.
९. serve करताना वरून चाट मसाला लावावा.
टिप :
१. शाकाहारी लोकांनी ह्या मधे चिकन एवजी पनीर किंवा मश्रुम वापरावे.
२. हे कबाब oven किंवा grill मधे करु शकतो.

वाचन संख्या
9033
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
आभारी आहे.
In reply to मस्त! by स्वाती२
अरे वाह!! पटकन होणारा प्रकार
हो. पटकन आणि मस्त.
In reply to अरे वाह!! पटकन होणारा प्रकार by प्राजु
मृणालीनी ताई, तुम्हि आमच्या
In reply to हो. पटकन आणि मस्त. by Mrunalini
@वडिल धन्यवाद,
In reply to मृणालीनी ताई, तुम्हि आमच्या by वडिल
>> तुम्हि आमच्या मिपा च्या
In reply to मृणालीनी ताई, तुम्हि आमच्या by वडिल
शुचीताइ... तुम्हि आगीशी
In reply to >> तुम्हि आमच्या मिपा च्या by शुचि
अरे अरे, ह्यात भांडण्या सारखे
In reply to शुचीताइ... तुम्हि आगीशी by वडिल
नाही ग मृणाल सॉरी. मस्त आहे
In reply to अरे अरे, ह्यात भांडण्या सारखे by Mrunalini
अरे, सॉरी काय त्यात?? its k.
In reply to नाही ग मृणाल सॉरी. मस्त आहे by शुचि
मृणाल ताइ.. ज्याना स्वयपाक
In reply to नाही ग मृणाल सॉरी. मस्त आहे by शुचि
हाहाहावडील तुम्ही फार खोडकर
In reply to मृणाल ताइ.. ज्याना स्वयपाक by वडिल
चला रे सगळ्यांनो ... तयारीत
In reply to हाहाहावडील तुम्ही फार खोडकर by शुचि
मशृम ची एलर्जी आहे आमच्या
हो. skewers वापरले तरी
टोफु बद्द्ल तुमच काय मत आहे
In reply to हो. skewers वापरले तरी by Mrunalini
टोफु मी अजुन कधी केले नाहीये.
In reply to टोफु बद्द्ल तुमच काय मत आहे by वडिल
तुमचा इन्ग्रजी ब्लॉग
In reply to टोफु मी अजुन कधी केले नाहीये. by Mrunalini
फोटो कोणी काढले ?तुमच्या मि
आली रे!
चिकन कबाब म्हणजे जीव की
गणपा तुझी मिपावरची मोनोपली
In reply to चिकन कबाब म्हणजे जीव की by गणपा
:-)
In reply to गणपा तुझी मिपावरची मोनोपली by वडिल
@वडिल आणि वाहीदा
In reply to :-) by वाहीदा
कबाब :)
मस्त.
सगळ्यांचे आभार. ह्या