सरकारी आकाशवाणी मुंबई केंद्रावर सकाळी ७:१५ वाजता 'दिलखुलास' हा जवळपास ३० मिनिटांचा कार्यक्रम प्रसारीत होतो. राज्यातली सगळी आकाशवाणी केंद्रे त्याचे प्रसारण करतात. निरनिराळी सरकारी खाती अन त्यातील प्रमुख अधिकारी यांची एखादी मुलाखत किंवा त्या खात्याचे हाती घेतलेले कार्यक्रम असा त्या कार्यक्रमाचे स्वरूप असते. थोडक्यात सरकारी योजना कशा प्रकारे आहेत अन त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते किंवा त्या त्या अधिकार्यांनी कसे काम केले याची जंत्री यात सादर केली जाते. सरकारी आकडेवारीही त्यात असते. तरीपण एकप्रकारचा रटाळवाणा कार्यक्रम असतो हे नक्की.
कुठल्याही शहरी किंवा ग्रामीण कुटूंबात आजकाल सकाळची घाई सारखीच झाली आहे. सकाळी शाळेची घाई, कामावर जाण्याची घाई असते. अशा महत्वाच्या वेळी जवळजवळ महत्वाचा अर्घा तास आकाशवाणी वाया घालवते. कोणी म्हणेल की सरकारी योजना सगळ्या लोकांना माहीत होण्यासाठी असले कार्यक्रम असावेत वैगेरे. अहो पण सरकारी आकडेवारीच्या जंजाळात सामान्य माणसाला का अडकवतात ते अधिकारी? अन त्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, आकडेवारीशी कसे खेळले जाते हे सामान्य माणसाला चांगलेच समजते.
हा कार्यक्रम गेल्या २ वर्षापासून चालू आहे. योजना बदलल्या जातील, आकडेवारी फुगवणे चालूच राहील म्हणून हा कार्यक्रमही चालूच राहील अशी आपण सरकारी आकाशवाणीकडून अपेक्षा करावी का?
वाचन संख्या
1851
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरकारीकाम आणि आकाशवाणी
प्रतिसाद आवडला. अगदि
In reply to सरकारीकाम आणि आकाशवाणी by नीलकांत