Skip to main content

मी नथुराम गोडसे बोलतोय .............

लेखक चिप्लुन्कर यांनी शुक्रवार, 04/02/2011 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
या नाटकाचा काल ठाण्यात पुन्हा एक प्रयोग हाउस फुल झाला . नथुराम या व्यक्ती रेखे बद्दल समाजात २ मतप्रवाह आहेत . काही गांधी प्रेमी फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे . मिसळपाव प्रेमीना या बद्दल की वाटते जाणून घेण्यास उत्सुक . ================================ सावरकर भक्त , नथुराम समर्थक -- चिपळूणकर

वाचने 15949
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by अप्पा जोगळेकर

राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने मुस्लिम्बहुल भागात म्हणजे आजच्या पाकिस्तानात मजबूत मार खाल्ला आणि मुस्लिम लीग मात्र दणकून जिंकली हे खरे नाही. १९३७ च्या निवडणूकीत मुस्लिम्-बहुल पंजाब आणि बंगालात अनुक्रमे युनियनिस्ट पार्टी (सर फझल-इ-हुसेन) आणि कृषक प्रजा पार्टी (फझलुल हक) यांचे सरकार आले होते. मुस्लिम लीगचे नव्हे. तसेच सरहद्द प्रांतातदेखिल काँग्रेसचे खान अब्दुल गफार खान यांचे सरकार निवडून आले होते.

विस्कळित स्वरूपात लिहिलेल्या धाग्याच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रियांचा जमेल तसा घेतलेला परामर्ष : १. प्रस्तुत धागा : शिळ्या कढीला नवा ऊत. २. "नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक बटबटीत आहे. कंटाळवाणे बटबटीत. ज्यात नुसती बोंबाबोंब भाषणबाजी आहे. विचार करणार्‍या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही - यात काय हाती लागेल असा प्रश्न पडतो. ३. सर्व अमुक प्रकारचे लोक तमुक असतातच असे नाही पण तमुक मात्र अमुक असतात या प्रकारच्या विधानांमधे द्वेष स्मगल करून आणलेला असतो; आव मात्र संतुलित विधाने केल्याचा असतो. थोडक्यांत असे की , गांधीविरोध, नथुरामप्रेम, हिंदुत्ववाद, काँग्रेसविरोध या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी मांडायच्या असतील तर काही नीट विधाने करावीत, काय असतील ती आर्ग्युमेंट्स मांडावीत. आपल्या स्वतःच्याच अजेंड्याला थोडा तरी आदर हवा असेल तर विस्कळित, "इनोदी" , सनसनीखेज़ विधाने करायच्या ऐवजी आपल्या विचारांचा व्यूह मांडावा.

In reply to by मुक्तसुनीत

मुसु तुम्ही अनिल बर्वेंचे 'थँक्यू मि. ग्लाड' वाचले/पाहिले असेलच. 'नथुराम' वाचून/पाहून मला त्या नाटकाची आठवण का झाली कुणास ठाउक. :) बाकी गांधी वि नथुराम या लढाईबद्दल म्या अज्ञ पामराने काय बोलावे. पुन्हा एकवार झालेल्या रणधुमाळीत एकही नवा मुद्दा मिळाला नाही हे मात्र खरे. एकुण ही लढाईदेखील शाकाहार/मांसाहार, देव आहे/नाही या वादांप्रमाणेच 'सनातन' ठरणार असे दिसते. -(विराम)

In reply to by मुक्तसुनीत

विचार करणार्‍या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही - यात काय हाती लागेल असा प्रश्न पडतो.
"(प्रत्येक हिंदुद्वेष्टा हा विचारवंत नसतो, पण) प्रत्येक विचारवंत हा हिंदुद्वेष्टा असतो" या (सुप्रसिद्ध) प्रेमाइसास ग्राह्य धरता, आपल्या वरील वाक्यात कोठेतरी काँट्राडिक्षण इन टर्म्स होत आहे असे वाटत नाही काय? तपासून पाहू. प्रत्येक विचारवंत हा हिंदुद्वेष्टा असतो. ----------------------------------------------------- (१) म्हणजेच, हिंदुत्वद्वेष्टा नसलेला कोणताही माणूस हा विचारवंत असू शकत नाही. ----- (२) आता 'हिंदुत्ववादी माणसा'ची नेमकी व्याख्या खात्रीशीरपणे सांगू शकणार नाही (आणि सुदैवाने पुढील आर्ग्युमेंट करण्यापूर्वी तशी व्याख्या केलीच पाहिजे असे कोणतेही बंधन निदान या संकेतस्थळावर तरी अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही), परंतु 'हिंदुत्ववादी माणूस' म्हणवून घेण्यासाठी 'हिंदुत्वद्वेष नसणे' एवढे किमान क्वालिफिकेषण बाळगूण असणे अपेक्षित असावे, अशी अटकळ आहे. ------------------------------------------------------------- (३) त्यापुढे, 'विचारवंत' या शब्दाच्याही नेमक्या व्याख्येबद्दल खात्री नाही (डिस्क्लेमर वरीलप्रमाणेच), परंतु 'विचार करणारा कोणताही माणूस' हा 'विचारवंत' ठरावा, असे मानण्यास जागा आहे. ------------------------------------------------------ (४) म्हणजेच, वरील (२) आणि (३) यांस अनुसरून, हिंदुत्ववादी असलेला कोणताही माणूस हा विचारवंत असू शकत नाही. -------------------------- (५) (कारण 'हिंदुत्ववादी असणारी माणसे' हा वरील (३) ला अनुसरून 'हिंदुत्वद्वेष्टी नसलेल्या माणसां'चा उपसंच आहे.) याचाच अर्थ, वरील (५) आणि (४) यांस अनुसरून, हिंदुत्ववादी असलेला कोणताही माणूस हा 'विचार करणारा माणूस' असू शकत नाही. ----------- (६) वरील (६) ला अनुसरून, आपल्या विधानातील 'विचार करणार्‍या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही' या भागात एक प्रचंड काँट्राडिक्षण इन टर्म्स आहे, असे सुचवावेसे वाटते. क्यूईडी. अर्थात, क्वाइट ईज़िली डन!
डिस्क्लेमर: आपल्या विधानात 'विचार करणार्‍या कुठल्याही माणसा'ऐवजी 'विचार करू शकणार्‍या कुठल्याही माणसा'चा उल्लेख असता, तर वरील सर्व विवेचन हे गैरलागू ठरते! (मात्र, त्या परिस्थितीत आमच्या दिवंगत आत्याबाईंना आम्ही मोठ्या प्रेमाने "काकाऽऽऽऽऽऽऽ" अशी हाकही मारली असती, हेही तितकेच खरे!) तसेही, हिंदुत्ववादी माणसे ही विचार करू शकतात अथवा नाही, याबाबत कोणतेच भाष्य करू इच्छीत नाही. मात्र, शक्य असो वा नसो, करत नाहीत अशी आजवर केवळ शंका बाळगून होतो. त्या शंकेचे आज (सिद्धतेसहित) खात्रीत पर्यवसान झाले, आणि तेही एका स्वयंघोषित हिंदुत्ववाद्याच्याच गृहीतकाच्या आधारावर, याबद्दल परमसंतोष होतो.

नथुराम चे कृत्य नक्कीच समर्थनीय नाही पण गांधींचा अति उदो उदो पण नकोसा वाटतो , वास्तविक कोन्ग्रेस फक्त गांधी या नावाचा उपयोजित ब्रांड म्हणून वापर करते ....

In reply to by jaydip.kulkarni

वास्तविक कोन्ग्रेस फक्त गांधी या नावाचा उपयोजित ब्रांड म्हणून वापर करते ....
हे तर बहुधा गांधींच्या हयातीतच (शेवटीशेवटी) सुरू झाले असावे. पण यात गांधींचा काय दोष?

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे घाला येता कामा नये. समोरील व्यक्तीचे मत (नाटक, चित्रपट, भाषण, लेख वा कलाकृती) पटत नसेल तर ते व्यक्त करण्याचे सनदशीर मार्गच चोखाळले पाहिजेत. झुंडशाही, हुल्लडबाजीला अजिबात स्थान असता कामा नये. कुणीही कायदा हाती घेणे योग्य नाही. सदर नाटक बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राडेबाजीचा केलेला उपयोग निषेधार्हच आहे. अर्थातच, जे ह्या नाटकाला लागू होते तेच तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, जेम्स लेन आणि एम एफ हुसेन यांच्या बाबतही लागू होते. त्यांच्या विरोधात झालेली झुंडशाहीदेखिल तितकीच निषेधार्ह होती/आहे.

In reply to by सुनील

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे घाला येता कामा नये.
या वाक्याशी फारशी सहमती नाही. लोकशाही असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच लोकशाही असते.
समोरील व्यक्तीचे मत (नाटक, चित्रपट, भाषण, लेख वा कलाकृती) पटत नसेल तर ते व्यक्त करण्याचे सनदशीर मार्गच चोखाळले पाहिजेत. झुंडशाही, हुल्लडबाजीला अजिबात स्थान असता कामा नये. कुणीही कायदा हाती घेणे योग्य नाही. सदर नाटक बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राडेबाजीचा केलेला उपयोग निषेधार्हच आहे. अर्थातच, जे ह्या नाटकाला लागू होते तेच तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, जेम्स लेन आणि एम एफ हुसेन यांच्या बाबतही लागू होते. त्यांच्या विरोधात झालेली झुंडशाहीदेखिल तितकीच निषेधार्ह होती/आहे.
यावर १०१% सहमती.

In reply to by प्रियाली

यावर १०१% सहमती.
या वाक्याशी फारशी सहमती नाही. टक्केवारी असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच (१००%च) असु शकते. ;-)

In reply to by Nile

या वाक्याशी फारशी सहमती नाही. लोकशाही असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच लोकशाही असते +२ सहमत आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील मर्यादित स्वरूपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते आणि जास्त पूर्वग्रह आणि हट्टीपणाच असतो. असे आमचे वैयक्तिक मत आहे. काही लोक पेन उचलून अभिव्यक्ती सादर करतात, काही लोक दगड उचलून. शेवटी दोन्ही गोष्टींमधे विवेकाचा अभाव असणे हे सांमतर्य जाणवतं.

विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे
अगदी सहमत. आणि ते चालू राहिले म्हणून तरी काय होणार आहे? मुळात ते नाटक अतिशय बटबटीत बोजड आहे. कंटाळवाणे कॄत्रिम संवाद आणि सुमार पटकथा. विरोधकांनी ते बंद पाडण्याची मोहीम उभारली तर तेवढीच पब्लिशिटी जास्त होईल.