✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बोलट.

ध
धमाल मुलगा यांनी
Wed, 02/27/2008 - 12:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12108 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

हं..

स्वाती दिनेश
Wed, 02/27/2008 - 13:10 नवीन

ध मु, तुला आलेला अनुभव सुन्न करणारा होता खरेच.
'निवडुंग' चित्रपटाची आठवण झाली.
स्वाती

  • Log in or register to post comments

आयला

इनोबा म्हणे
Wed, 02/27/2008 - 13:11 नवीन

आयला धम्या...तू एवढा विचार करत असशील असे वाटले नव्हते

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

  • Log in or register to post comments

इनोबा,

धमाल मुलगा
Fri, 02/29/2008 - 12:06 नवीन
अरे, मला तरी कुठ॑ वाटल॑ होत॑ ???
चालायच॑च् ...येतो कधीमधी झटका.

त्यातून मिसळबोध वाचनात आल्यामुळे "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" चे तत्त्व अ॑गिकारावेसे वाटल॑.

असो, आता मी पूर्ण बरा झालो आहे.

आपला,
- वैचारिक झटक्यातून सावरलेला
ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

नशा....

प्रभाकर पेठकर
Wed, 02/27/2008 - 15:03 नवीन

प्रेक्षागृहात मिळणार्‍या टाळ्यांची नशा इतर कुठल्याही नशेच्या तुलनेत पराकोटीचीच असते. कारण, इतर नशा कांही तासांत ओसरतात पण ही नशा ओसरत नाही, वाढतच जाते.
बोलटाला आपण बोलट आहोत ह्याचे भान येतच नाही. नट बनण्याच्या महत्त्वाकांक्षेत आणि मिळणार्‍या टाळ्यांच्या लाटांवर तो किनार्‍यापासून बराच लांब वाहत जातो आणि टाळ्या मिळेनाशा झाल्या, लाटा उचलून धरेनाशा झाल्या की बोलट गटांगळ्या खाऊ लागतो. नाकातोंडात पाणी जाऊन वास्तवाची जाणीव व्हायला लागते पण किनारा बराच दूऽऽऽर राहिलेला असतो. कित्येक 'नटां'वरही अशी वेळ येते.

ह्यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा वकूब ओळखून पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे रहावे. दर दोन-पाच वर्षांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे मुल्यमापन करून भविष्याची बेगमी करून ठेवावी. कुठलीही हौस आपले 'व्यसन' बनणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

हल्लीचे अभिनेते बर्‍यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.

  • Log in or register to post comments

पेठकरकाकांशी सहमत!

राजमुद्रा
Wed, 02/27/2008 - 15:10 नवीन

बाकी पेठकरकाकांचे प्रतिसाद आपल्याला जाम आवडतात. सगळे प्रतिसाद अगदी विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले असतात. मला नाही वाटत आजपर्यंत त्यांच्या प्रतिसादाने कुणी दुखावलं असेल. उलट दुखावलेल्यांना फुंकर घालण्याचे काम त्याचे प्रतिसाद करतात. धन्यवाद पेठकरकाका!

राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments

हम्म्म....

प्रभाकर पेठकर
Wed, 02/27/2008 - 15:20 नवीन
वयोमानानुसार माणसात बदल होत जातोच शेवटी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा

हे तर प्रत्येकालाच

प्राजु
Wed, 02/27/2008 - 20:30 नवीन

अनुभवावं लागतं. "नटसम्राट" मध्ये डॉ. लागूं ची भूमिका म्हणजे या अशा कलाकारांसाठी पुढे यणार्‍या भयंकर आयुष्याची चेतावणीच म्हणायला हवी.  वेळीच सावध व्हावे. ग्लॅमर हे वयाप्रमाणे कमीच होणार पण आपण उतार वयात भिकेला लागणार नाही ह्याची काळजी घेणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे.

धमालाचा हा अनुभव फार काही सांगून जातो.

-(नाट्यवेडी) प्राजु

  • Log in or register to post comments

नटसम्राट पाहून एक आख्खी पिढी

निनाद मुक्काम …
गुरुवार, 02/03/2011 - 15:29 नवीन
नटसम्राट पाहून एक आख्खी पिढी सुधारली . माझे आज्जी आजोबा हे त्याच पिढीचे प्रतिनिधी . हाताचा पैसा /घर /स्थावर मालमत्ता स्वताच्या हयातीत मुलांच्या सुनांच्या हाती द्यायची नाही . ''आम्ही निवर्तल्यावर कुर्ल्याच्या चाळीची काय वासलात लावायची आहे ( इमले /मनोरे (गगनचुंबी ) बनवायचे आहेत ते बनवा'' ) इति आज्जी आजोबा बाकी नटाला कैफ /उन्माद(लोकप्रियतेचा ) ह्या नादात कधी वारुणी त्याच्या शरीर व पर्यायाने आयुष्य /कारकीर्द पोखरते . हे त्याचे त्यालाच कळत नाही . भगवान दादा ह्यांच्या बंगल्यातून चाळीतील प्रवास बद्द्दल एकदा ते म्हणाले .नुसत्या दारूच्या बाटल्या (रिकाम्या ) न फेकता भंगारात दिल्या असत्या तर एखादी जागा सहजच विकत घेतली असती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

बोलट

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/28/2008 - 01:22 नवीन

बोलट म्हणजे काय ते मलाही योगेश च्या एकांकिकेतूनच कळले होते...१९९९ च्या पुरुषोत्तम मध्ये पाहिली होती

छान लिहिलंत....

  • Log in or register to post comments

बोलट

मुक्तसुनीत
गुरुवार, 02/28/2008 - 03:03 नवीन
'जनार्दन नारो शिंगणापूरकर' ची आठवण झाली ! :-)
  • Log in or register to post comments

सुंदर..

विसोबा खेचर
गुरुवार, 02/28/2008 - 08:15 नवीन

धमाला,

छोटेखानी, परंतु सुरेखच लिहिलं आहेस रे. आवडलं!

और भी लिख्खो..

तात्या.

  • Log in or register to post comments

आभार !

धमाल मुलगा
Fri, 02/29/2008 - 17:06 नवीन
हा माझा अनुभव मी इथे आपल्या सगळ्या॑बरोबर वाटून घेतला, आणि जरा मन हलक॑ हलक॑ झाल॑.

हा अनुभव वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला सर्वा॑चा मनःपुर्वक आभारी आहे.

असाच लोभ ठेवा ही विन॑ती.

आपला,
- ध मा ल.
  • Log in or register to post comments

एकटा असतांना ........

सुधीर कांदळकर
Fri, 02/29/2008 - 20:13 नवीन

मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.

तुझ्या घरी कोणी नाही का? त्यांच्याबरोबर गप्पा मार. जालावर चॅट कर. काहीहि कर पण दारू नको.

मद्यप्राशन हे केवळ मित्रांच्या संगतीत गप्पा मारण्यासाठी तेवढा वेळ हॉटेलमध्ये बसण्याचे निमित्त म्हणून असावे. एकटा असतांना गजल लावून वाचन कर. जास्त मोकळा वेळ असेल तर संगीत शीक.

  • Log in or register to post comments

धमाला! छानच लिहिलं आहेस.

चतुरंग
Fri, 02/29/2008 - 20:30 नवीन

कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे.
'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!

माझा एक अगदी जवळचा मित्र ह्यात गुरफटला आणि त्यातून त्याला बाहेर काढताना काय यातना झाल्या त्या आठवल्या की अंगावर काटा येतो, तेव्हां जपून!

चतुरंग

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

@ सुधीरकाका व चतुर॑गराव,

धमाल मुलगा
Mon, 03/03/2008 - 11:17 नवीन
एकटा असताना मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे. काका, ज्या आपलेपणाने आणि काळजीने आपण सा॑गताय, त्याबद्दल खर॑च आभारी आहे. नाहीतर हल्ली कोण कोणाला विचारतो? असो, एकट॑ असताना काय किवा मित्रा॑सोबत काय, उठसुठ "घेणे" नक्कीच करत नाही! आणि ह्यापुढे तस॑ वाटल॑च तर आपला प्रेमाचा सल्ला नक्कीच विचारात घेईन. हे जे॑व्हा घडल॑ ते॑व्हा का कोण जाणे फार एकट॑ एकट॑ वाटत होत॑ आणि वेळ कसा घालवावा अगदीच उमजेना, म्हणून... कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे. काय हे चतुर॑गराव, तुम्ही सगळे मोठे आहात माझ्याहून, हक्क आहे तो तुमचा सगळ्या॑चा. आणि उपदेशाच॑ म्हणाल तर मी त्याला प्रेमळ सल्ला म्हणेन. शेवटी कळपातल॑ अवखळ कोकरू वाहावत चालल॑ तर त्याला तुम्हीच सगळे वठणीवर आणणार ना? 'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं! आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, ती ठेवेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चूकून

धमाल मुलगा
Mon, 03/03/2008 - 11:19 नवीन
चूकून दोनदा प्रतिसाद आला. प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

उत्तम

विवेकवि
Mon, 03/03/2008 - 12:59 नवीन
लेखन उत्तम आहे........ आवडले मला ............ असेच कधी तरी छान लिहा......... धन्यवाद....... मिनु जोशी.
  • Log in or register to post comments

उत्तम

विवेकवि
Mon, 03/03/2008 - 19:10 नवीन
अति उत्तम ........... असेच चालत रहा........ आपलीच मिनु जोशी.
  • Log in or register to post comments

ऊत्तम

विवेकग
Fri, 03/07/2008 - 14:48 नवीन
नमस्कार साहेब.... माझे नाव (बाकी नावात काय आहे)???????? विवेक गरगटे ........ खुप छान आहे..... विवेक गरगटे...
  • Log in or register to post comments

खूपच छान लेख आहे..

स्वाती राजेश
Sun, 03/09/2008 - 04:16 नवीन
खूपच छान लेख आहे.. लेखाबरोबर प्रतिक्रिया ही तितक्याच चांगल्या आणि मार्गदर्शक आहेत. अशी परिस्थिती सुप्रसिद्ध मराठी नट गणपत पाटील यांची होती. कोल्हापूर मधे आम्ही असताना पाहिले आहे. हल्लीचे अभिनेते बर्‍यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे. पेटकरांशी सहमत.
  • Log in or register to post comments

शिकार आणि पोकळ्वाडीचे

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/03/2011 - 15:05 नवीन
शिकार आणि पोकळ्वाडीचे चमत्कार्रचा म्होरला भाग कधी येतोय तुम्ही आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या पुढला भाग ?
  • Log in or register to post comments

बोलट..

हेम
गुरुवार, 02/03/2011 - 16:41 नवीन
'जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली'मधील ही व्यक्तीरेखा अमर आहे. पुलंच्या शब्दांत...'जनू 'बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नांवाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे 'बोलट', अशी एक विष्णुदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. ह्या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे, परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता.....' ..खरं तर त्यांचा ओझरता उल्लेख लेखांत कुठेतरी यायला हवा होता.
  • Log in or register to post comments

धमालराव

विलासराव
गुरुवार, 02/03/2011 - 20:34 नवीन
सध्या छान लिहिलय असेच म्हणतो. बा़की अभ्यास चालु केलाय नुकताच आम्ही. पात्रता आल्यावर उपदेष करुच.
  • Log in or register to post comments

आमेऽन!

धमाल मुलगा
गुरुवार, 02/03/2011 - 20:50 नवीन
:) आमेऽन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

हंम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

चिंतामणी
Fri, 02/04/2011 - 00:44 नवीन
.................................................................................. ............................................................................................. ......... ............. ................. ............ सुन्न चिंतामणी
  • Log in or register to post comments

हे वाचायचं राहील होतं. अनुभव

सखी
Fri, 02/04/2011 - 19:57 नवीन
हे वाचायचं राहील होतं. अनुभव चांगला शब्दबध्द केला आहे. वर पेठकर, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे कुठं थांबायच हे कळलं पाहीजे, दुर्देवाने ब-याचदा तोवर वेळ निघुन गेलेली असते.
  • Log in or register to post comments

छान

शहराजाद
Sun, 02/06/2011 - 03:01 नवीन
छान लिहिलं आहेस. पु. लं. चा बोलट आठवला.
  • Log in or register to post comments

उत्तम...बाकी सगळ्यांनी वर

शिल्पा ब
Sun, 02/06/2011 - 10:14 नवीन
उत्तम...बाकी सगळ्यांनी वर लिहिलेलंच आहे.
  • Log in or register to post comments

मस्त जमलंय धमु. झकास लिहिलंय

अप्पा जोगळेकर
Sun, 02/06/2011 - 13:09 नवीन
मस्त जमलंय धमु. झकास लिहिलंय तुम्ही. 'व्यक्ती आणि वल्ली' मधला जनार्दन नारो शिंगणापूरकर आठवला.
  • Log in or register to post comments

बोलट भावला भावा

मनराव
Wed, 02/09/2011 - 18:33 नवीन
बोलट भावला भावा
  • Log in or register to post comments

मनापासून आणि कळकळीने लिहीलंय

नगरीनिरंजन
Wed, 02/09/2011 - 18:49 नवीन
मनापासून आणि कळकळीने लिहीलंय रे धम्या...खूप छान! पण तरूणपणी धुंदीत जगून, भरपूर मौज करून झाली म्हातारपणी फरपट तर काय बिघडलं असं वाटतं कधीकधी. च्यायला म्हातारपणासाठी पैका वाचवता वाचवता मध्येच गचकलो तर काय घ्या? सालं तारूण्यात मुक्तपणे नाय जगलं की मग म्हातारपणी केसरीच्या टूर करणं नशिबी येतं. :-)
  • Log in or register to post comments

मस्त लेख. धम्या आठवतय का हे

विजुभाऊ
Tue, 10/04/2011 - 17:59 नवीन
मस्त लेख. धम्या आठवतय का हे कधीकाळी लिहीत होतो
  • Log in or register to post comments

हल्ली ते फक्त वाचतात आणि

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 10/05/2011 - 17:51 नवीन
हल्ली ते फक्त वाचतात आणि वाचनात वेळ जात असल्याने लिहायला वेळ मिळत नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वस्तुस्थिती

चेतन सुभाष गुगळे
Tue, 10/04/2011 - 18:44 नवीन
<< हा शब्द आहे तसा बर्‍यापैकी जुन्या काळचा. नारायणराव-बालग॑धर्व या॑च्याकाळचा. नायकाची काम॑ करणारा तो "नट" आणि हल्ली ज्याला "सपोर्टी॑ग ऍक्टर" म्हणतात तो म्हणजे "बोलट". >> शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं तर नटीला (अभिनेत्री) नट म्हणायला हवं आणि नटाला (अभिनेता) बोल्ट. << खरच, का अस॑ होत असेल? का हे नाट्यक्षेत्र एव्हढ॑ बदनाम आहे? का हे लोकनीट जगत नाहीत? का ह्या॑ची फरफट होते? का ह्या॑ना कोणी वाली नाही? >> नाटकात काम करण्याचा अनुभव मलाही आहे. त्यावरून सांगतो. तीन अंकी नाटक असतं, ते संपल्यावर यातली बहुतांश मंडळी ४ था अंक (अपेयपान) साजरा करतात (मोहन जोशी आणि सतीश तारेंचे किस्से माहीत असतीलच ना?) आणि काही तर त्यानंतरही ५ वा अंक (अशय्यासोबत) करतात. आमच्यासारखे जे याला विरोध करतात, त्यांना बहुतेकदा तीन अंकी नाटकात डावलले जाते. हौशी एकांकिका सादर करण्यापुरता मर्यादित वाव अशांना मिळतो.
  • Log in or register to post comments

>> शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं

नावातकायआहे
Wed, 10/05/2011 - 16:12 नवीन
>> शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं (कस?) तर नटीला (अभिनेत्री) नट म्हणायला हवं आणि नटाला (अभिनेता) बोल्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

आमच्यासारखे जे याला विरोध

धन्या
गुरुवार, 10/06/2011 - 04:35 नवीन
आमच्यासारखे जे याला विरोध करतात, त्यांना बहुतेकदा तीन अंकी नाटकात डावलले जाते. हौशी एकांकिका सादर करण्यापुरता मर्यादित वाव अशांना मिळतो.
कित्ती कित्ती चांगले हो तुम्ही.
शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं तर नटीला (अभिनेत्री) नट म्हणायला हवं आणि नटाला (अभिनेता) बोल्ट.
कसं ते जरा इस्कटून सांगता का? धमुदादा, प्रकटन छान लिहिलं आहेस. मन सुन्न होतं वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

इस्कटून

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/06/2011 - 19:33 नवीन
ते अ‍ॅनाटॉमिकल मोडमध्ये बोल्ले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नाही हो. आमच्या अल्पमतीनुसार

धन्या
गुरुवार, 10/06/2011 - 21:32 नवीन
नाही हो. आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वेड पांघरून पेडगावला जाऊ नका.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 10/07/2011 - 12:23 नवीन
<< आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. >> << नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे >> चांगलाच अभ्यास की तुमचा. मग तुम्हाला असा प्रश्न पडायलाच नको. की तुम्हाला उत्तर माहिती असूनही ते माझ्याकडूनच हवे आहे? ठीक आहे तुम्हाला हवेच आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्याच माहितीच्या आधारे देतो. कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल फिमेल कशाच्या आधारे ठरवितात? जरा तोच निकषा तुमच्या या नट बोल्ट नावाच्या मेकॅनिकल इंजिनियरींगच्या टर्म्सना लावा की. हा निकष लावला की मग कुलुप चावी, इलेक्ट्रीकच्या पिना, नट बोल्ट इत्यादी अनेक व्यवहारातील गोष्टींना मेल फिमेल च्या उपमा दिल्या जातात हे इथली चित्रे पाहिली की लगेच कळेल (खरे म्हणजे ते तुम्हाला आधीच कळले आहे ह्या बद्दल मला खात्री आहे). http://blogorelli.typepad.com/b_l_o_g_o_r_e_l_l_i/2007/10/is-the-10-sin-b.html जरा ही चित्रे ही पाहा. नट http://www.badog.biz/catalog/images/nut.jpg बोल्ट http://www.bombayharbor.com/productImage/0812294001230089250/Hex_Bolt.jpg http://www.arrowboltandscrew.com/images/main_structural_bolts.jpg नट - बोल्ट http://174.123.135.195/uploads05/51/A/Stainless_steel_nuts_and_bolts126668170.jpg http://www.mhent.co.in/images/pic_1.jpg http://irishnewsreview.files.wordpress.com/2011/07/bolt.jpg http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/47/Bolt-with-nut.jpg http://blogorelli.typepad.com/photos/uncategorized/2007/10/24/nut_bolt.jpeg आता यापेक्षा जास्त इस्कटून सांगितलं ना तर माझं या संकेतस्थळावरचं सदस्यत्वच इस्कटून टाकलं जाईल.. (तुमची तीच इच्छा आहे का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

लेखाच्या सुरुवातीला जरा

आशु जोग
गुरुवार, 10/06/2011 - 21:17 नवीन
लेखाच्या सुरुवातीला जरा वेगळीच कल्पना झाली. वाटलं , असेल दारुबाजीवरचा ! पण नंतर गाडी सुसाट सुटली. लिखाण आणि विषय दोन्हीही भावले (अशा लेखांसाठीच मिसळ ओळखली जावी ही इच्छा)
  • Log in or register to post comments

धम्याचा आय्डी हॅक झाला होता

मृत्युन्जय
गुरुवार, 10/06/2011 - 22:32 नवीन
धम्याचा आय्डी हॅक झाला होता तेव्हा हा लेख पडला आहे की धम्या एकेकाळी लेखपण लिहायचा? ;)
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय. पण आहे कुठे हा

स्वानन्द
Fri, 10/07/2011 - 13:16 नवीन
छान लिहीलंय. पण आहे कुठे हा सद्ध्या??
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा