मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खारे शंकरपाळे

स्वाती दिनेश · · पाककृती
रविवारी आजी आजोबा गेले ऑस्ट्रीयन आल्प्स मध्ये हिंडायला. त्यांना अशा ट्रीपमध्ये च्यावम्याव खायला म्हणून नेहमी खारे शंकरपाळे आवडतात.(रेड वाइन बरोबरचा त्यांचा आवडता चकणा आहे तो..) ह्या वेळी मी थोड्या वेगळ्या प्रकारे हे शंकरपाळे केले. ह्यावेळी थोडे वेगळे मसालेही त्यात घातले. हे शंकरपाळे जास्त पटकन होतात, कुटायला लागत नाही, मेहेनत कमी असे लक्षात आले म्हणून ही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी.. साहित्य- १ वाटी डाळीचे पीठ (बेसन),२ वाट्या मैदा, २ चमचे रवा, २ मोठे चमचे दही किवा अर्धी वाटी ताक, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा ओवा, १ चमचा धनेजीरे पूड,१ मोठा चमचा ड्राय बेसल लिव्ज,चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल कृती- वरील सर्व पदार्थ एकत्र करा. २ चमचे तेलाचे मोहन घालून घट्टसर भिजवा. १५-२० मिनिटे झाकून ठेवा. नंतर पोळी लाटून, शंकरपाळे काता आणि मध्यम आचेवर तळा.

वाचने 8903 वाचनखूण प्रतिक्रिया 23

रेवती गुरुवार, 02/03/2011 - 18:38
स्वातीताई, मी तुमच्या शेजारी 'रेवती आजी' म्हणून रहायला येते.;) आल्पस् मध्ये फिरायला जायचीही तयारी आहे. खारे शंकरपाळे करायचं तेवढं तू बघ.;)

In reply to by रेवती

प्राजु गुरुवार, 02/03/2011 - 20:58
मस्त आहे आयडीया.. मी ही येईन आल्प्स मध्ये फिरायला. आपण दोघी जाऊ स्वातीताईच्या शेजारी रहायला. :)

सखी गुरुवार, 02/03/2011 - 22:51
स्वाती मस्त दिसतात शंकरपाळे. आधी गोडाने (केकने) मारले, आता तु आणि गणपा खा-या, तिखट पदार्थाने मारणार असं दिसतय.

५० फक्त गुरुवार, 02/03/2011 - 23:11
स्वाती ताई, लई भारी, माझ्या ३४ दातांपॅकी एकच तिखटाचा आहे बाकी सगळे गोड्च, पण करुन बघेन आणि सांगेन. माझी बायको तिखट मिठाच्या पु-या लई भारी बनवते, आता तिची परिक्षा झाली की सांगतो (विनंती करतो) तिला मग मी पण टाकतो फोटो. हर्षद.

स्वातीताई अन् गणपा यांचे आयडीज बॅन करावेत अशी विनंती मी येथे करीत आहे! :)

कवितानागेश Fri, 02/04/2011 - 14:12
चांगले तळले जाण्यासाठी या प्रकारच्या पोळ्या किती जाड ठेवाव्यात? थालिपीठाएवढ्या की भाकरीएवढ्या ? तसे मिलीमीटर मध्ये सांगितले तरी चालेल! ;) हा छान आहे पदार्थ, एकदम सोप्पा.

स्वाती दिनेश Sat, 02/05/2011 - 12:18
रेवती,प्राजु.. कधी येताय आल्प्स फिरायला? कच्ची कैरी, कसूरी मेथी चालेल की, मग बेसल लिव्ह्ज नको घालू.. लीमाउजेट, आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड पोळी लाटायची. हर्षद, पुर्‍यांची वाट बघते. सर्व खवय्यांनो, धन्यवाद. स्वाती