✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भीमाशंकर -भाग २- नागफणीवर

प
प्रचेतस यांनी
Wed, 02/02/2011 - 10:02  ·  लेख
लेख
भीमाशंकर -भाग १- गुप्त भीमाशंकर ........पायर्‍या चढून परत पठारावर येतो. आता पुढचे लक्ष्य असते ते हनुमान तळे व त्यापुढील नागफणीचा कडा. बस स्टँड पासून पायर्‍यांकडे जातांना एक रूंद वाट उजवीकडे वळते तीच वाट आपल्याला हनुमान तळ्यापाशी घेउन जाते. जवळजवळ दीड किलोमीटर लांबीची ही वाट अगदी सुरुवातीला झाडांमधून जाते व पुढे आपल्याला जंगलाचा र्‍हास स्पष्टपणे दिसतो. कदाचित सड्यासारख्या जमिनीमुळे पण इथे झाडे वाढली नसावीत. मधूनच एक हुप्प्या दात विचकून जाताना दिसला. आता हनुमान मंदिर दिसू लागले व थोड्याच वेळात हनुमान मंदिर व तिथल्या बांधीव तळ्यापाशी आलो. शेजारच्याच काही कुटीरांमध्ये साधुबुवा राहातात. मंदिर व तळे त्याच्या नावाला साजेसेच आहे. कारण इथे हनुमानाचे खूप वंशज आहेत. अगदी भरपूर संख्येने माकडे. हनुमानाचे दर्शन घेतले. हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूलाच नागफणीला घेउन जाणारी वाट आहे. नागफणी हे नागाच्या फड्यासारखा आकार असलेले भीमाशंकराचे सर्वोच्च शिखर. सुरुवातीला छोट्याश्या कातळावरून तिरपे जात एक दाट झाडीतून जाणारा तीव्र चढ लागला. तो चढून वरच्या टप्प्यावर गेलो. आता परत वर वर चढत वरच्या पठारावर पोहोचलो. आलीच नागफणी. नागफणीचा आकार खोगीरासारखा आहे. दोन बाजूंना उंचवटे व मध्ये निमुळता खोगीरासारखा भाग आणि पलीकडे तुटलेला कडा. आम्ही भरभरा उजव्या बाजूच्या उंचवट्याकडे गेलो. वरतून फारच जबरदस्त देखावा दिसतो. खाली पदरगड आपल्या खड्या कातळभिंती सावरून उभा असतो. त्यापाठीमागे पेठच्या कोथळीगडाचे मनोरम दर्शन होत असते. समोर तुंगी आपल्या त्रिकोणी शिखरानिशी सज्ज असतो तर उजवीकडे सिद्धांचा कसदार सिद्धगड आपण काकणभर अधिकच सरस आहोत हे सिद्ध करत असतो. स्वच्छ हवेत तर येथून दिसणारे दृश्य तर फारच सुरेख असते. आम्हाला मात्र धुकटामुळे अंधूक दृश्यांवरच समाधान मानावे लागले. इतक्यात मधल्या खोगीरापाशी बसलेल्या बहिणी पळत वर येउ लागतात. वर येउन म्हणतात माकडे पाठीमागे लागली आहेत. त्यांच्यापाठोपाठच माकडांची (र्‍हीसस जात. ही तापट असते)एक मोठी टोळी येउन थडकते. म्होरक्या दात विचकत अंगावर येउ लागतो. कॅमेरा आधी सुरक्षित ठेवला जातो. आम्ही शांत राहूनही माकडे आक्रमक रूप दाखवून अंगावर येउ पाहतात. बहिणींचा धीर सुटू लागतो. शेवटी मी व माझा भाउ जवळचीच एक काठी हाती धरतो. आता माकडांचा म्होरक्या २ फूट मागे सरतो पण दात विचकणे व अंगावर चाल करणे अजून थांबलेले नाही. आता आम्ही काठी उगारतच मोठ्याने ओरडत त्याच्या अंगावर धाउन जातो. आम्हाला तसे करण्याशिवाय गत्यंतरच नाही कारण जायची वाट माकडांनी अडवलेली आहे व बाजूला सरळसोट कडा. आता मात्र माकडे घाबरलीयत. आम्हालाही अवसान आलेले आहे. काठी उगारतच आम्ही पुढे जातो. माकडे आता मागे सरलीयत. म्होरक्या आता खूप लांब जाउन दात विचकून दाखवतोय. पण आता त्याच्यात हिंमत नाहीये. आम्ही उंचवटा उतरून खोगीरावर आलोय. आता माकडे गायबच झालीयत. त्यांनी पराभव मान्य केलेला दिसतोय. आमचे नागफणीचे दर्शनही झालेले असते व एक अविस्मरणीय अनुभवही पदरात पडलाय. परत तीव्र उतार उतरून आम्ही मंदिरापाशी येतोय. हातात अजूनही काठी आहे. मंदिरापही असलेल्या माकडांना आम्ही उगाचच काठी फिरवून त्यांना पळवून लावतोय. माकडे भितीने लांब पळतायेत. वरचा त्यांचा तो म्होरक्या कुठेही दिसत नाहीये. तिथून निघालो व परत बस स्टँडपाशी आलो. मुंबई पॉइंटपाशी थोडा वेळ थांबून परत सिद्धगड पाहीला. गाडीत बसलो. भीमाशंकर सोडले. वाटेत घोडेगावला वाजता जेवण केले व रात्रीपावेतो पिंपरीत पोहोचलो. हनुमान मंदिर- हनुमान तळे व तेथील पुतळा माकडे दाखवतोय. तीव्र चढ चढून वर येतांना पदरगड नागफणीचे टोक मधला खोगीरासारखा भाग वरून दिसणारे विहंगम दृश्य. याच जागी माकडे आली भीमाश़ंकराचे सदाहरीत वन परतीच्या वाटेवर मुंबई पॉईंट समाप्त

Book traversal links for भीमाशंकर -भाग २- नागफणीवर

  • ‹ भीमाशंकर -भाग १- गुप्त भीमाशंकर
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10960 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

प्रबळ

कच्ची कैरी
Wed, 02/02/2011 - 11:07 नवीन
माझ्या भीमाशंकरला जाण्याची इच्छा तुम्ही टाकलेल्या फोटोंमुळे व वर्णनामुळे प्रबळ होत चालली आहे .
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Wed, 02/02/2011 - 11:08 नवीन
मस्तच फोटू
  • Log in or register to post comments

र्‍हिसस जात...!

इन्द्र्राज पवार
Wed, 02/02/2011 - 11:38 नवीन
दोन्ही भाग वाचल्यानंतर (तसेच फोटोंचाही आनंद घेतल्यानंतर...) भीमाशंकरची वारी,....अर्थात मित्रांसमवेत... करण्याचा निश्चय केला आहे, इतकेच म्हणू शकतो. माकडांचा "अग्रेसिव्ह" पणा हा नवखाच दिसतोय, कारण ज्या ज्या पर्यटनक्षेत्री आम्ही गेलो आहोत, त्या त्या ठिकाणी अशी फुटकळ माकडे इकडेतिकडे नाचत बागडत असतातच, पण अंगावर चालून येण्याचा प्रकार कुठे आढळला नाही. प्रवासी काहीतरी खायाला देणार इतपत त्या जमातीला जन्मजात असल्यासारखे ज्ञान असल्याने तेवढ्यापुरतेच ते जवळीकीला येतात असे दिसत्ये. पण श्री.वल्ली यानी उल्लेख केलेली ही 'र्‍हिसस' जात भीमाशंकर परिसरातच आढळत असावी असा कयास आहे. "नागफणीचे टोक" हा फोटो अगदी मोहवून टाकणारा आहे. लकी मॅन मि.वल्ली. इन्द्रा
  • Log in or register to post comments

र्‍हिसस ही

प्रचेतस
Wed, 02/02/2011 - 12:20 नवीन
या जातीची माकडे पर्यटनक्षेत्री, सह्याद्रीच्या कडेकपारीत प्रामुख्याने आढळतात. बहुतेक पर्यटऩक्षेत्री खायच्या विपुलतेने ही सहसा आक्रमक होत नाहीत. तरी बरेच वेळा दात विचकणे, पिशव्या हिसकावून घेणे हे प्रकार तर सर्रास करतात. आमच्याकडे तेव्हा खायचे काहीही नव्हते तसेच दुर्गम प्रदेशात असल्याने ही माकडे जास्त आक्रमक झाली असावीत. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर जातांनाही ही माकडे उन्हाळ्यात पाण्यासाठी माणसांवर नेहमीच हल्ले करतात. आम्हालाही हा अनुभव तिथे आलेला आहे. यांना पळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे काठी घेउन जाणे. काठीला ही माकडे घाबरतात. फटाके वाजवणे हाही एक मार्ग होय पण तो वापरू नये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सुरेख प्रवास वर्णन आणि

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/02/2011 - 13:59 नवीन
सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो. हा भाग देखील आवडला.
  • Log in or register to post comments

श्री. वल्ली, जबरदस्त झालाय

५० फक्त
Wed, 02/02/2011 - 14:29 नवीन
श्री. वल्ली, जबरदस्त झालाय भाग, ककै सारखेच वाटते आहे कधी एकदा जात्तो आहे असं वाटतंय. अतिशय धन्यवाद. हर्षद.
  • Log in or register to post comments

ओघवत्या शैलीत सजलेले लेखन

निनाद मुक्काम …
Wed, 02/02/2011 - 17:42 नवीन
ओघवत्या शैलीत सजलेले लेखन त्याच सोबत उत्तम चित्रे व त्यातील सदाहरित वन (वृत्त पत्रातील काही बातम्यानुसार हा शब्द काही वर्षात भीमा शंकर पुरता उरणार नाही .माणसाच्या हावरट पणा व हैव्यास पहिला तर त्या माकडांची कृती मला अगदीच शुल्लक वाटते . बाकी ह्या माकडाच्या जात व त्याच्या स्वभावाचे वर्णन केल्यामुळे आगामी पर्यटन आगाऊ काळजी घेतील (काठी हातात घेतील .) अश्या ठिकाणी फिरल्याने पर्यटन होतेच .पण मानसिक स्वास्थ्य सुध्धा लाभते . असाच महारष्ट्र फिरत रहा. ( नि आम्हाला दाखवत जा )
  • Log in or register to post comments

खुप रीस्की आहे हो, हे. फोटो

नरेशकुमार
Wed, 02/02/2011 - 18:45 नवीन
खुप रीस्की आहे हो, हे. फोटो पाहून खुप भिती वाटली. किति खोल दरि दिसते तुम्हि जिथे बसले होते तिथे बाजुला. (वरुन ६ व्या & ७ व्या फोटोत)
  • Log in or register to post comments

एव्हढेही

प्रचेतस
Wed, 02/02/2011 - 19:58 नवीन
एव्हढेही काही रिस्की नाहीये. तुटलेला कडा जवळजवळ १५०० फूट तरी आहेच. अगदी सरळसोट. भिती बाळगण्याचे तसे काही कारण नाही. उगाच जास्त वाकून पाहू नये इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

मस्त एकदम

गणेशा
Wed, 02/02/2011 - 20:01 नवीन
मस्त एकदम
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय

विनायक बेलापुरे
गुरुवार, 02/03/2011 - 04:20 नवीन
फोटो सुद्धा छान आले आहेत. अत्यंत निसर्गरम्य परिसर. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असा.
  • Log in or register to post comments

आता मे महिन्यात जाणार आहे

कंजूस
Mon, 03/27/2017 - 07:43 नवीन
आता मे महिन्यात जाणार आहे खांडसमार्गे. त्यावेळी शेकरुंचा हैदोस असतो पायय्रांजवळच्या आंब्यांवर,उंबरांवर. पाऊस लागला की फळे पिकतात व ती शेकरू खात नाहीत. कच्ची खातात.त्या शोधात दूर आत रानात पांगतात. चमकणारी वनस्पती जुलैच्या अमावस्येला दिसते
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन वल्ली सर !

प्रसाद गोडबोले
Wed, 03/29/2017 - 16:10 नवीन
सुरेख लेखन वल्ली सर ! दोन वेळेला भीमाशंकरला जाणे झाले आहे , एकदा तर तंगडतोड सावळा ते भीमाशकर असा ३० एक किमीचा फुल्ल जंगल ट्रेक तेही भर पावसात केला आहे पण ह्या फोटोतील ठिकाणे अनोळखी वाटतात. हे असे फोटो पाहुन सह्याद्री च्या परत परत प्रेमात पडायला होते !
  • Log in or register to post comments

सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो.

NAKSHATRA
Mon, 12/14/2020 - 12:17 नवीन
सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो.
  • Log in or register to post comments

सुरेख वर्णन. गुप्त भीमाशंकर,

पॉइंट ब्लँक
Fri, 12/18/2020 - 22:48 नवीन
सुरेख वर्णन. गुप्त भीमाशंकर, नागफणी हि ठीकाणे माहिती नव्हती आधी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर वर्णन अन अप्रतिम

चौथा कोनाडा
Mon, 12/21/2020 - 17:11 नवीन
अतिशय सुंदर वर्णन अन अप्रतिम प्रचि !

प्रचेतस

👌 दोन वर्षांपुर्वी आम्ही पतिपत्नींनी इथं केलेली अस्मरणीय भटकंती आठवली. दोन दिवस तिथल्याच ब्लू मरऑन रिसॉर्टला राहिलो होतो. लेखातील सर्व ठिकाणांना भेट दिली होती. पाहिली होती ! खुप धमाल आलेली. भोरगिरीच्या परिसरात देखील भटकलो होतो !
  • Log in or register to post comments

जबरदस्त

NAKSHATRA
Mon, 12/21/2020 - 18:49 नवीन
सुरेख वर्णन
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा