http://www.misalpav.com/node/16226 - भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील
भावड्याने अशी धमाल सुरुवातीलाच उडवल्यानंतर आमच्या त्याच्याकडून अपेक्षा चांगल्याच वाढल्या. आणि भाउमहाराजांनीही पुरेपुर अपेक्षापूर्तीचं दान आमच्या पदरात भरभरून टाकलं.
एकदा हिंदी गृहपाठासाठी निबंध लिहायचा होता. भावड्याने आयत्या वेळी कुणाचातरी निबंध उतरून काढला.
सरांकडे तो निबंध तपासण्यासाठी गेला. सरांनी निबंध तपासला. त्याच्यातल्या चुका शोधून समासात त्या लाल अक्षरात लिहिल्या.आणि सर जेव्हा अखेराकडे आले तेव्हा तो निबंध अपूर्णच होता. बहुधा भावड्याचं वेळेचं गणित बरोबर जुळलं नसावं. अपूर्ण निबंध पाहून सरांनी शेवटी भावड्याला लाल अक्षरात निबंधाची 'पूर्तता करो' अशी आज्ञा दिली.भावड्याकडे वही परत आल्यावर नेहमीच्या खाक्याप्रमाणे त्याने सरांनी शोधलेल्या चुका, शिरस्त्याप्रमाणे प्रत्येकी पाच वेळा अशा लिहून काढल्या. आणि शेवटची 'पूर्तता करो' ही आज्ञादेखील
पूर्तता करो
पूर्तता करो
पूर्तता करो
पूर्तता करो
पूर्तता करो
अशी चक्क पाच वेळा लिहून सरांकडे उलटी फिरवून त्यांनाच गृहपाठ पूर्ण करण्याचा आदेश दिला.
हिंदीतच एक पं. नेहरूंविषयी एक धडा होत.त्यात काही मुलं दिल्लीतल्या रस्त्याकडेच्या एका झाडाची जांभळं खात असतात. तर चाचाजींची गाडी जाताना पाहून ती सगळी मुलं जाभळं खाण्याचं विसरून जातात असं काहीसं एका धड्यात होतं. चाचणी परीक्षेत त्यावर 'बच्चे जामुन खाना क्यो भूल गये'? असा प्रश्न विचारला होता. भावड्याने 'बच्चे जामुन खाना भूल गये कारण बच्चोंको जामुन खाने का कटाळा(पक्षी कंटाळा) आला था' असे उत्तर देउन सरांच्या तोंडाला फेस आणला.
भावड्याची अशी मजा बर्याच वेळा चालत असे.
मराठीत वाक्प्रचारांचा अर्थ लिहायचा असे. एकदा भावड्याला अर्थ लिहिण्यासाठी वाक्प्रचार आला. 'माया पातळ होणे'. -भावड्याचं उत्तर होतं. 'कोड्याश्यात(कोड्यास-कोरड्यास,कालवण) पाणी जास्ती घालणे म्हण्जे ते समद्यांना पुरातं'. ( अर्थात -पुरेसं होतं )
इतिहासात 'महादजी शिंदे यांचे दरबारात वजन का वाढले' असं विचारलं होतं. आम्ही आमच्या अल्पमतीनुसार 'युद्ध जिंकल्याने महादजी शिंदे यांचे दरबारात वजन वाढले' असं उत्तर लिहिलं. सर्वज्ञ भाउमहाराजांचं उत्तर होतं . --भाकरी ज्यादा खाल्यानी महादजी शिंदे यांचे दरबारात वजन वाढले.
एकदा 'कुळकर्णी गावाला का गेले'? याचं उत्तर भावड्याला पेपरात काही केल्या सुचेना. शेवटी स्वतःचा वेटो वापरून भावड्याने उत्तरादाखल 'कुळकर्णी गावाला गेले' असं लिहिलं. आणी पेपर सेटरची खाशी जिरवली.
सगळ्यात कहर झाला मराठीच्या सत्र परीक्षेत. तिथं आकलन नावाचा प्रकार असे. आठ दहा ओळींचा परिच्छेद देऊन त्यावर प्रश्न विचारले जात. शेजारधर्माविषयीचा एक उतारा प्रश्नपत्रिकेत होता. एकमेकांबरोबर प्रेमाने, आदराने रहावे. त्यायोगे समाजातील साहचर्य, सद्भाव वाढीला लागतो. शेवटी सारेच जण आनंदाने, गुणागोविंद्याने राहतात. हे आकलन परीक्षार्थींना व्हावे अशी प्रश्नकर्त्यांची अपेक्षा. भाउराया ह्या तकलादू आकलनाच्या कधीच पार गेलेला. त्याचं आकलन काही वेगळंच. वयाच्या पहिल्या दशकातच भावड्याला वैश्विक आकलन झालेलं. त्यामुळं रुढ आणि मूढ उत्तरं भावड्याकडून कशी बरी यावीत?
पहिला प्रश्न होता.
-प्रेम कुणावर करावे?
आमचं उत्तर- प्रेम शेजार्यांवर,आजूबाजूच्या लोकांवर करावे.
भावड्याचं उत्तर- प्रेम शेजार्याच्या मुलीवर करावे.
दुसरा प्रश्न होता.
-एकमेकांवर प्रेम केल्याने काय होते?
आमचं उत्तर- एकमेकांवर प्रेम केल्याने समाजातील सद्भाव तसेच साहचर्य वाढते.
भावड्याचं उत्तर- एकमेकांवर प्रेम केल्याने पोरं होतात.
सरांनी जेव्हा हे वर्गात वाचून दाखवलं तेव्हा उडालेला हाहाःकार मी अजूनही विसरलेलो नाही .
वाचने
5011
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेरकी आहे बेणं
आयला!!!
ह्म्म्म्म
In reply to आयला!!! by धमाल मुलगा
अं???
In reply to ह्म्म्म्म by आदिजोशी
मस्त
अल्टी, प्रत्येकात एक भावड्या
विनोद पानचट असले तरी रंगवुन
छान लिहिले आहे ... आवडले ..
आठवण झाली
लिहाना मग ... वाचायला उत्सुक
In reply to आठवण झाली by कच्ची कैरी
लिहाना मग ... वाचायला उत्सुक
In reply to आठवण झाली by कच्ची कैरी
लिव्हा, लिव्हा, लिव्हा,
In reply to आठवण झाली by कच्ची कैरी
लिहा लिहा.......वाचायला तयारच
In reply to लिव्हा, लिव्हा, लिव्हा, by नरेशकुमार
मस्त, मनोरंजन झाले. ह ह पु
=)) = )) =)) =)) =))
In reply to मस्त, मनोरंजन झाले. ह ह पु by रेवती
चुकिचे उत्तर दिले नव्हते.
In reply to =)) = )) =)) =)) =)) by टारझन
चीनची
, त्याला पोकळ बांबू चे फटके
In reply to चीनची by चिरोटा
भावड्याची पुढची प्रगती
अजुन येउ द्या...
आमच सन्ज्या पन असलच
आई ग!
वाकुऽऽन????
In reply to आई ग! by स्वैर परी
खुर्चीतून पडायची वेळ आलेली
अजून एक किस्सा
पश्चिम सूचना
In reply to अजून एक किस्सा by स्मिता.