यावेळी दलिया जरा जास्तच आणला गेला. दलियाची खिचडी घरात कोणाला विशेष आवडत नाही. आणि गोड तरी किती करून खाणार. म्हणुन जालावर दलियाच्या रेसिपी शोधताना दलिया इडली सापडली. दोन तीन ठिकाणच्या रेसिपी एकत्र करून तयार झालेली ही दलिया इडली ! ज्यांना तांदूळ कमी खायचा आहे किंवा चालतच नाही अशा खवैय्यांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. ट्राय करा !
सामग्री :
१ कप दलिया
अर्धा कप उडीद किंवा मुगाची डाळ
१०-१२ मेथी दाणे
अर्धा कप दही
जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, तेल वगैरे फोडणीचे साहित्य
१ मोठा चमचा चणा डाळ
अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा
मीठ
दलिया आणि डाळ ७-८ तास वेगवेगळे भिजत घाला. दलियामध्ये भिजवताना भरपूर पाणी घाला. कारण ते जास्त शोषले जाते. मेथी दाणेही भिजत घाला.
मग एकत्र वाटून घ्या. साधारण नेहमीचे इडलीचे पीठ असते तेवढे बारीक नि पातळ मिश्रण तयार करून घ्या.
एका कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग नि चणा डाळ घालून फोडणी तयार करा. ती वरच्या मिश्रणात मिसळा.
आता त्यात दही, मीठ आणि खायचा सोडा घाला. चांगले फेटून घ्या. इडलीपात्राला तेलाचा हात लावुन त्याच्या इडल्या लावा. १५ मि इडल्या वाफवुन झाल्या की इडलीपात्र न उघडता तसेच बाजूला ठेवा. त्या इडल्या गार झाल्यावर काढायला जास्त सोप्या जातात.
मग गरम गरम सांबार आणि चटणीसोबत खायला घ्या.
इडली केली की आई दोसा पण करते याची सवय असल्याने लेकीने आजही दोशाचा हट्ट धरला. मग काय ! याच पिठाचा मस्त दोसा तयार झाला.
दलियाच्या इडल्या तांदळाच्या इडल्यांएवढ्या फुगत नाहीत आणि गरम खाणार असाल तर थोड्या चिकट पण वाटतात.
फर्मेंट करण्यासाठीचा वेळ यात वाचतो.
या प्रमाणात साधारण मध्यम आकाराच्या २०-२२ इडल्या होतात.
वाचने
9766
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेगळीच पाकृ आहे. इडली
सजावट पण छानच
हेच म्हणतो
In reply to सजावट पण छानच by धनंजय
पौष्टिक
In reply to सजावट पण छानच by धनंजय
वा! प्रकार नविन दिसतो आहे.
ए काय ग असे फोटो टाकतेस?
निषेध
मस्त आहे नविन
पीठ वाटून अव्हनमध्ये ठेवते
In reply to मस्त आहे नविन by निवेदिता-ताई
रेवतीतै, या दलियाच्या
In reply to पीठ वाटून अव्हनमध्ये ठेवते by रेवती
छान आहे नवा प्रकार करुन
मस्त..
फोटो काढुन ठेवा आणि लगेच येउ
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
मितान एक नवीन प्रकार जिभेसाठी
मोडलो असतो?
In reply to मितान एक नवीन प्रकार जिभेसाठी by डावखुरा
तो लाल-सा
In reply to मोडलो असतो? by आजानुकर्ण
वा मस्त!
मितान सुरेख ग !!! भुक लागली
मितान सुरेख ग !!! भुक लागली
In reply to मितान सुरेख ग !!! भुक लागली by पर्नल नेने मराठे
एकदम झाकास्स
ख ल्ला स !! फोटु + वर्णन =
व्वा! कधी येऊ हादडायला?
बोले तो सोल्लड !
फोटो वैगरे मस्तच !! पण दलिया
पण दलिया म्हंजे काय ???
In reply to फोटो वैगरे मस्तच !! पण दलिया by सूड
अस्सं होय !! पण ह्याच्या कशा
In reply to पण दलिया म्हंजे काय ??? by चिंतामणी
सु दे, दलिया म्हणजे गव्हाचा
In reply to अस्सं होय !! पण ह्याच्या कशा by सूड
मितान, इडली म्ह़णजे मी आणि