Skip to main content

फक्त पुण्यातच अस होऊ शकत...

लेखक मनराव
Published on मंगळवार, 01/02/2011
मध्ये एकदा मी आणि माझा मित्र, काही खरेदी निमित्त शनिपार जवळ गेलो होतो. खरेदी आटोपून झाल्यावर आमच्या पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठी आम्ही लक्ष्मिरोड वर पावगी वाड्यातील दुकनात (नाव आठवत नाही) गेलो. आमच्या नशिबाने तिथे पनीर रोल आणि बर्गर चांगला मिळाला (तेवढीच दुकानाची जाहिरात ) म्हणून मग त्यावर यथेच्छ ताव मारला. ते संपवून मग जवळच्याच एका अमृततुल्य मध्ये जाऊन दोन कटिंग सांगितल्या, कारण पुण्यात चहा प्यावा तर अमृततुल्य मधेच आणि ते सुधा कटींगच. चहा आल्यावर त्याचा अस्वाद घेत आम्ही दोघेही त्या दुकानाबाहेर गप्पा मारत उभे असताना, तिथे एक वल्ली समोर येऊन उभी राहिली. तिने डायरेक्ट कॉलरला हात घातला, आमच्या पैकी कोणाच्या न्हवे तर स्वतःच्याच. कॉलर थोडीशी दुमडून आमच्या कडे बघितलं आणि प्रश्न फेकला, "अहो, या कॉलर वर टेलरच नाव आणि नंबर आहे का ?". मी आणि माझा मित्र एकदम स्तब्ध, एकदा आम्ही एकमेकान कडे पाहत होतो आणि एकदा त्या व्यक्ती कडे. काही सेकंदांनी भानावर आल्यावर मी त्याला (त्याच्या) शर्टच्या कॉलर वर लिहिलेलं नाव आणि नंबर सांगितला. त्याने हि एकदम शिताफीने तो त्याच्या मोबाइल मध्ये डाइयल करून घेतला.त्याच्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर मिळाल्यावर, धन्यवाद म्हणून शेजारीच असलेल्या जयहिंद दुकानं मध्ये तो माणूस भर भर निघून गेला. त्याला बघून वाटलं बहुदा त्याला टेलर बरोबर द्वंद्व खेळण्याची इच्छा होती. या सगळ्या मध्ये आमचा चहा पिण्याचा इंटरेस्ट कुठच्या कुठे पळून गेला आणि मागे राहिला तो हा किस्सा. चहा संपवून निघताना मित्राने लगेच पुष्टी दिली, 'फक्त पुण्यातच अस होऊ शकत'...

याद्या 6954
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

'फक्त पुण्यातच अस होऊ शकत'... अगदी बरोबर ....हाहाहा!!!!!!!

यात आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे हे समजले नाही. जर तुम्हाला त्याने अंडरप्यांटचा नंबर विचारला असता तर थोडे आश्चर्य वाटू शकले असते.

In reply to by आजानुकर्ण

यात आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे हे समजले नाही.जर तुम्हाला त्याने अंडरप्यांटचा नंबर विचारला असता तर थोडे आश्चर्य वाटू शकले असते.
श्री. अजानुकर्ण ह्यांना हा प्रश्न पडलेला पाहून आश्चर्य वाटले. लेखक व त्यांचे मित्र ह्यांना नुसत्या चेहर्‍यावरुन साक्षर समजुन संबंधीत इसमाने काही वाचून दाखवण्याची विनंती केली हे सगळ्यात मोठे आश्चर्य नाही काय? लेखकाने तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

In reply to by आजानुकर्ण

अजानुकर्ण काकांशी सहमत. हे पुण्यातच कशाला कोणत्याही शहरात होऊ शकते. पुण्या ऐवजी ठाणे लिहीले असते तरे चालले असते.

काय महान किस्सा आहे... सबंध पृथ्वीतलावर तर सोडा .. पुण्यातही हा किस्सा सोळा सहस्त्र वर्षांनी घडुन आला असणार. मनराव , तुम्ही किती लक्की आहात तुम्हाला माहित नाही ... एक तर तुम्हाला पुण्यातलं अमृततुल्य ढोसायला मिळालं , आणि त्यात हा अप्रतिम किस्सा म्हणजे तुमचा जन्म सार्थकी लागला .. आता डॉळे मिटायला मोकळे :) -स्वभावराव

In reply to by नरेशकुमार

पुन्यात पाय ठेवला, अता देह ठेवायला माउलीं सरखं बळ नाही अम्च्यात....... त्यात अमच्यावर तुमची क्रुपा आहे......

In reply to by मनराव

देहात (बळंबळं) बळ आनन्यासाठी बरेच खात्रीलायक उपाय आहेत. पन ते ह्या धाग्यावर अवांतर ठरतील. जरा वेगळा धागा काढा. मग खरडा खरडी करुयात. कसे.....

In reply to by मनराव

>>पुन्यात पाय ठेवला, अता देह ठेवायला माउलीं सरखं बळ नाही अम्च्यात आँऽऽऽऽऽ, असे कसे होऊ शकते? तुम्ही जेव्हा पुन्यात पाय ठेवला, तेंव्हाच त्याच पावलांवर तुमचा देह सुद्धा ठेवला असेलच ना? की तुम्हाला पाय आणि देह वेगवेगळे आहेत??? ;)

In reply to by मनराव

तुमी पुन्यात पाय ठेवल्याचा परिनाम आहे, चक्क टारझन सुद्धा भाषा शुद्ध ठेवायला लागला. अजुन पुढे काय काय होनार....... देव जाने.

In reply to by Pearl

काय महान किस्सा आहे... सबंध पृथ्वीतलावर तर सोडा .. पुण्यातही हा किस्सा सोळा सहस्त्र वर्षांनी घडुन आला ""असणार"". मनराव , तुम्ही किती लक्की आहात तुम्हाला माहित नाही ... एक तर तुम्हाला पुण्यातलं अमृततुल्य ढोसायला मिळालं , आणि त्यात हा अप्रतिम किस्सा म्हणजे तुमचा जन्म सार्थकी लागला .. आता डॉळे मिटायला मोकळे हे काय राव आहे की "ण" आता काय मणराव लिहायला लावाल का काय त्यांना....

असा किस्सा जगात कुठेही घडु शकतो.. उगाच आमच्या पुण्याला बदनाम करायचा डाव आवडला नाही. (वर्च्युअल) पुणेकर

अरेच्या, ते तुम्हि होता व्हंय................ मला काय म्हैत राव, त्या दिवशी जे काय घडंल ते इथं खरडाल म्हनुन. ठिक आहे, पुढ्च्या येळेस बघुन घेतो. अ‍ॅक्च्युली त्या दिवशी टाळकं लयी हाल्ल होतं.

असा एक किस्सा माझ्यासोबतहि झाला होता.... त्याचे झाले असे की मी नि माझा मित्र दोघेही जे. एम. रस्त्यावरून जात होतो... डेक्कन कॉर्नर च्या सिग्नल जवळ "अपना घर" मध्ये उभे असताना.... समोर एक कार नि तिच्या मागोमाग एक रिक्षेवाला थांबलेला.... सिग्नल लाल होते त्यामुळे कारवाल्याने गाडी बहुधा बंद केली असावी... आणी हिरवा दिवा लागल्यावर त्याची गाडी काही सुरु होईना... अर्ध्या मिनिटाचा कालावधी गेला.... रिक्षेवाला हळूहळू तापू लागला... दिवा पुन्हा लाल होतो की काय याची काळजी आम्हाला लागलेली... तेवढ्यात राग अनावर होऊन तो रिक्षेवाला बाहेर आला.. आम्हाला वाटले चांगलेच द्वंद्व पाहायला भेटणार... त्याने बाहेर आल्यावर कारवाल्या माणसाला शिवी हासडली "बधीर...." मी नि माझा मित्र तिथेच हसायला लागलो... जर माझ्या गावात असे काही झाले असतं तर रीक्षेवाल्याने त्याला फैलावर तर घेतलेच असते नि लाखोली वाहिली असती ती वेगळीच... ही सुधा गोष्ट फक्त पुण्यातच होऊ शकते...

In reply to by आजानुकर्ण

हा हा हा .. भोसरी मधे मात्र एक वेगळाच किस्सा घडला ... प्रसंग वरचा .. सेम टू सेम .. कार वाल्याची कार बंद पडल्यामुळे तो ऑलरेडी वैतागला होता , आणि मागुन एक रिक्षावाला एवढा हॉर्न देत होता की मला वाटलं तो हॉर्नी च झालाय म्हणुन ;) मग कार वाला बाहेर निघाला. त्याच्या नंबरप्लेट वरचं घडीचिन्ह बहुतेक रिक्षावाल्यानं पाहिलं नसावं. मग त्यानंतर कारवाल्याने रिक्षा वाल्याला छाण मढवला होता :) - (घडी वाले) भजीत गवार

In reply to by टारझन

मग नक्कीच त्या रीक्षेवाल्याची बारा वाजून बारा मिनिटे झाली असतील.... (घडी च वाले)... पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे...

In reply to by आजानुकर्ण

>>याला सुसंस्कृतपणा म्हणतात. घाणेरडी शिवीगाळ करायला डेक्कन कॉर्नर म्हणजे शिवसेनाभवन आहे की काय? प्रश्नच नाही. अहो, पुणेरी रिक्षावाला म्हणजे मूर्तिमंत सुसंस्कृतपणा !!!! सुसंस्कृतपणा म्हणजे काय हे समजावून सांगायला हल्ली शाळांमध्ये पुणेरी रिक्षावाल्याला भेटायला सांगतात म्हणे. व्यवस्थापन वाले हल्ली मुंबईच्या डब्बेवाल्याचा अभ्यास करतात तसे सोशल स्टडी वाले सुसंस्कृतपणाचा अभ्यास करण्यासाठी पुणेरी रिक्षावाल्याला निवडतील असे मानायला हरकत नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आत्ता हेच बघा ना... पोष्ट केल्यापासून आतापर्यंत नु. म. वी., होळकर विद्यालय, अभिनव आणी तत्सम कैक शाळांचे व्य.नि. मला आलेले आहेत.... माझ्या भ्रमण ध्वनीचा आतला डब्बा पार दुथडी भरून वाहतोय... सर्व जण मला त्याचा "सभ्य" अशा रीक्षेवाल्याचा नंबर मागत आहेत.... त्याची व्याख्यान मला आयोजित करावी असा विचार आहे काहींचा.... आमच्या गल्लीतील बायका-पोरांना उपस्थिती लावायला सांगतो... तेवढंच "सोशल वर्क"....

In reply to by वपाडाव

त्या रिक्शा वाल्याचा नंबर आज तक किंवा स्टार माझा वरिल वहिनिला...अर्र.......वाहिनीला देउन पुढे त्याचा सत्कार करावा......

In reply to by मनराव

>>>त्या रिक्शा वाल्याचा नंबर आज तक किंवा स्टार माझा वरिल वहिनिला...अर्र.......वाहिनीला देउन पुढे त्याचा सत्कार करावा...... काय वहीनी आणी काय वाहिनी... कुणाला तरी द्या म्हणजे सार्थक... नंबर हो... शेवटी काय जग स्वैर व स्वच्छंदी आहे...

In reply to by वपाडाव

अरे वा इतके चांगले रिक्षावाले फक्त पुण्यातच भेटतील . जरा रिक्षावाल्याचा न्म्बर टिपून ठेवला असता तर बरे झ्झले असते. पुण्यात आल्यावर त्यालाच संपर्क केला असता अमोल

ही मस्त आयडीयाची कल्पना आहे! कॉलींग कॉलींग .... ऑफीशीयली अवांतर अलाऊड धागा कसा करता येतो ह्याचे उत्तम उदाहरण! असे अनेक खरडफळे तयार झाले की मिपा एक मस्त विशाल चॅटरूम होईल. ,, क्या बात है!

In reply to by अरुण मनोहर

मुळ चर्चा सुयोग्य दिशेने चालू असताना हा अवांतर प्रतिसाद चर्चेचा रोख बदलु शकतो. क्रुपया अवांतर प्रतिसाद देउ नये. (ह. घ्या. हे. सां. न. ल.)

In reply to by नरेशकुमार

हा धागाच अवांतर प्रतिसाद चुंबक असल्यामुळे इथे फक्त अवांतर प्रतिसादच येणार हे डिझाईन प्रमाणेच चालले आहे की!