बिनामैद्याच्या ऑरेंज केकची कृती असहकार यांच्या मुलीसाठी दिली आणि लगेच ऑरेंज केक करावासा वाटू लागलाच, पण सहजरावांच्या म्हणण्याप्रमाणे एऽवढी बदाम पावडर...? मग जरा वाढत्या वजनाची आणि दिनेश आणि केसुंनी जाहीर केलेल्या( आणि सुरु न केलेल्या ) डायट प्रोग्रामची काळजी म्हणून जरा कमी कॅलरीवाला ऑरेंजकेक करायचे ठरले.
साहित्य- २०० ग्राम मैदा, १५० ग्राम बटर/तूप, १२५ ग्राम साखर, ४ अंडी, १.५ चमचा बेकिंग पावडर,चिमूटभर मीठ, १ चमचा ऑरेंज इसेन्स + १ चमचा संत्र्याची किसलेली सालं. ऑरेंज इसेन्स नसेल तर २ चमचे संत्र्याची किसलेली सालं, पाव कप ऑरेंज ज्यूस,टिनमधील संत्री २५०-३०० ग्राम- ही संत्री साखरेच्या पाकातली असल्यामुळे साखर कमी घाला. जर ही संत्री उपलब्ध नसतील तर फ्रेश संत्री सोलून घाला पण साखर १५० ग्राम घाला.
कृती-संत्री चाळणीवर घाला, जास्तीचा पाक निथळू दे. पण यातला पाक जरा घट्टच असतो, टिण्ड पाइनॅपल
इतका पातळ नसतो त्यामुळे सगळा पाक निथळला जात नाही.
बटर फेटून घ्या, साखर घालून फेटा. अंडी फोडून घाला ,संत्र्याची साले व इसेन्स घाला आणि फेटा. मैदा+ बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करा आणि ते थोडे थोडे वरील मिश्रणात घाला. मिश्रण एकसारखे झाले की त्यात संत्र्याचा रस घाला.
केक मोल्डला बटर लावून घ्या.त्यावर हे मिश्रण घाला, त्यावर संत्री घाला.
पाकातली संत्री जड असतात त्यामुळे ती वर न राहता केकच्या आत व तळाशी जातात.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से ला ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच- केक झाला की नाही ते केकमध्ये सुरी घालून पहा. जरी केक झाला असला तरी तो अवन मध्ये तसाच ५ मिनिटे राहू द्या. नंतर बाहेर काढून ठेवा व अजून पाच मिनिटांनी जाळीवर काढा , गार होऊ द्या, नंतर तुकडे करा.
वैधानिक इशारा- ऑरेंज केकच्या टेम्टिंग वासाने केक पूर्ण गार होण्याची वाट न पाहताच स्लाइस करुन खाण्याचा धोका आहे. :)


याद्या
7148
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
शॉल्लेट ! आता माँजिनीजवर धाड
वाव!!!!
चहा बरोबर ऑरेंज केक चं
मस्तच...
हो
In reply to मस्तच... by खादाड अमिता
संत्र हा आपला वीक पॉईंट
:-)
यम्म यम्म यम्मि !
सहजराव, मला सहकारीचा अनुभव
अवन
In reply to सहजराव, मला सहकारीचा अनुभव by ५० फक्त
मस्त
अरे काय चाललंय हे? लाळसुद्धा
यम यम
अरे बंद करा ह्या
हाहा
In reply to अरे बंद करा ह्या by प्यारे१
हा केक मस्तच दिसतोय. मी
स्वाती ............अंडी न
अंडी
In reply to स्वाती ............अंडी न by निवेदिता-ताई
स्वाती ताई नुसते फोटोवर नाही
मस्त!
अर्ध्या कापलेल्या केकच्या
आम्ही पाहिलाच नाही..
बहिष्कार
स्वातीताई..
धन्यवाद
म स्त
छान
स्वातीताई, फोटो दिसत नाहीयेत.
मस्तंच
मी स्वातीताईचे धागे उघडतच
केक केला