ही मुस्कटदाबी का?
हिंदुहृदयसम्राटांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेला हा धागा
धागाकर्त्याच्या विनंतिनुसार हा धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.
या तळटीपेसकट आता बंद झाला आहे. याचा अर्थ धागाकर्त्याने या धाग्यात काहीही लिहावे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची सोय बाकी असू नये अशी योजना संपादक मंडळाने करुन दिली आहे असे दिसते. या धाग्यात धागाकर्त्याने काही मौलिक वाक्ये लिहीली आहेत. उदा:
तुला डोळे आहेत का रे पावट्या?
नकली नावं पांघरून इकडे तिकडे ओकत फिरणारे कद्रू लोक तुम्ही..
लोकांना फालतू त्रास देण्याशिवाय काय करू शकणार आहात?
कुणाची दहशत कुठे आहे हे तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे.
कुठेतरी ** मारली असेल शिवसैनिकांनी म्हणून इकडे बडबड करताय..
काय धडा घ्यायचा आणि काय नाही हे तू मला सांगू नकोस..
तुझी हिडीस मनोवृत्ती दिसली तेवढी बास..
आणि खराच दम असेल ना पार्श्वभागात तर सेनाभवना समोर उभे राहून पहिल्या ओळीतील शब्द बडबडून दाखव..
फुकटचा सल्ला स्वतःकडेच ठेव.
शिवसेना का वाढत नाही (आणि का वाढणार नाही) याची उत्तरे धागाकर्त्याने स्वतःच अशा भाषेद्वारे देऊन ठेवली आहेत, हे बरे झाले. पण मिसळपाव हे काही शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र नाही. मग असा धागा वाचनमात्र ठेवण्याचे मूळ लेखकाला स्वातंत्र्य कुणी दिले? अशा ठाकरी भाषेला संयत भाषेतही कुणी उत्तर देऊ नये अशी सोय करण्यामागचे काय प्रयोजन आहे?
अवांतरः 'फुलोरा' मध्ये हल्ली मिसळपाववरील लेखकांचे बरेच लेख येऊ लागले आहेत. त्यामुळे मिसळपावच्या धोरणांत काही बदल झाले आहेत काय? तसे असल्यास या संकेतस्थळाचे मालक (किंवा चालक) तसा खुलासा का करत नाहीत?
ज्या धाग्याबद्दल येथे प्रश्न विचारले गेले आहेत तो मूळ धागा अप्रकाशित करण्यात आलेला आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रस्तुत कारवाईनंतर हा धागाही वाचनमात्र करण्यात आलेला आहे. - संपादक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
+१
शिक्षणाचा दर्जा का वाढत नाही
कोण शिक्षणक्षेत्रात आहे नाही
जम्या नही
महाराष्ट्रातील एक काळ
+ १ यशवंता.
धन्यवाद पुपे!
असे स्वातंत्र्य नाही
कुणी कुठे आणि कसला प्रतिसाद
माझेही चाराणे.
फोरम वर जाहीर धागे काढणं
सहमत
मूळ विषय
झेंडा
च्यायला...काय दिवस आलेत ?