आज १ विचार वाचनात आला-
तो हा की "प्रशंसा का पहेला भोग भगवान को लगाये." ज्याप्रमाणे अन्नग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रसाद दाखवतो त्याप्रमाणे कोणीही आपली स्तुती केली तर तिचा मनोमन त्याग करून ती प्रथम ईश्वराला समर्पित करा.
"त्वदीयम वस्तु गोविन्दम तुभ्यमेव समर्पयेत"
स्तुतीपासून कटाक्षाने दूर रहा. यामुळे तुमच्या मनात अहंकाराचे बीज रोवले जाणार नाही. गर्वाने तुम्ही आंधळे होणार नाही. तुम्हाला अनाठायी(?) अभिमान वाटणार नाही इ.इ.
मग माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले ते असे की "हेल्दी" अहंकार अशी काही गोष्ट असते की नसते? लहानपणी बाळाने पहीले पाऊल टाकले की आई-बाबा, अन्य दादा, काका, ताई टाळ्या वाजवून, प्रशंसोद्गार, बोबड्या पण हुरूप वाढविणार्या बोलांनी काढून बाळाला प्रोत्साहन देतात. आणि ही घटना खरं पाहता खूप खोल ठसा उमटविणारी असते. परमहंस योगानंद यांच्या "ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी" या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे - " Happier memories, too, crowd in on me: my mother’s caresses, and my first attempts at lisping phrase and toddling step. These early triumphs, usually forgotten quickly, are yet a natural basis of self-confidence."
मग लहानपणी पोसला जाणार्या या अहंकाराचे नक्की कितव्या वर्षा पासून "दुराभिमान /अहंकाआमध्ये" रुपांतर होऊ लागते आणि आपण आता कौतुकाचा डोस पुरे असे स्वतःचेच स्वतःला शिकवू लागतो? आपल्या तथाकथित मर्यादा ठरवू लागतो?
एका विशिष्ठ वयापासून आपल्या कानांवरही नकारात्मक वाक्ये, क्वचित "सुभाषिते" आदळू लागतात - "हरबर्याच्या झाडावर चढविणे", "अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" , "स्तुती करावी ईश्वराची , व्यर्थ करू नये नराची" वगैरे वगैरे. आपणही दुसर्याची हातचे राखून प्रशंसा करायला शिकतो. आणि एक दुष्टचक्र बनत जाते ना आपण कोणाची खुल्या मनाने प्रशंसा करू शकतो ना कोणी आपली करत का तर आपली संकुचित विचारसरणी - दुसर्याची स्तुती करणे म्हणजे त्याची पाठ खाजविणे, त्याला मस्का पॉलीश करणे.
माझे तरी मत आहे की आपल्या समाजात प्रशंसा, स्तुती आदि गोष्टींना हवी तितकी प्रतिष्ठा दिलेली नाही. दुसर्याच्या चूका दाखविण्यात आपण एकदम अग्रेसर असतो पण तेच कौतुक करायची वेळ येते तेव्हा मूग गिळून गप्प बसतो. दुसर्याचे दोष दाखविण्याइतका उत्साह आपण लोक दुसर्याची वाखाणणी करण्यात दाखवत नाही. मी असे नाही म्हणत की खोटी प्रशंसा करा पण एखादी गोष्ट आवडली, कौतुकास्पद वाटली तर आवर्जून ती आवडली हे सांगा, तिला गृहीत धरू नका.
वरील विचारातील "अहंकाराची वीषवल्ली पोसली जाण्याची" कल्पना मला तरी खुळचट वाटली. जोपर्यंत एका ठराविक मर्यादेमध्ये निरोगी अहम ची जोपासना होते तोपर्यंत स्वतःबद्दल चांगले जनमत तयार होणे, तसा फीडबॅक (मराठी शब्द?) मिळणे हे चांगलेच.
आपला काय अनुभव आहे स्तुतीसंदर्भात?
याद्या
5787
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिमान व अहंकार
आपला काय अनुभव आहे
अहो पण तुमची स्तुती कोणी केली
In reply to आपला काय अनुभव आहे by Nile
आपल्या समाजात प्रशंसा, स्तुती
ह्म्म... स्तुती आवडत नाही असा
समजा हा लेख मी ऊत्तम आहे असे म्हटले तर
काय सांगू? "उत्तम" म्हणालात
In reply to समजा हा लेख मी ऊत्तम आहे असे म्हटले तर by आत्मशून्य
त्यापेक्षा तुम्ही प्रतिक्रिया
In reply to काय सांगू? "उत्तम" म्हणालात by शुचि
आssssssssssssयम (वोज) जस्ट जोकींग
In reply to काय सांगू? "उत्तम" म्हणालात by शुचि
ब्लाब्लाब्ला...
In reply to समजा हा लेख मी ऊत्तम आहे असे म्हटले तर by आत्मशून्य
शुद्धलेखन मिपावर पूर्वीपासूनच
In reply to ब्लाब्लाब्ला... by आमोद शिंदे
हॅहॅहॅ
In reply to ब्लाब्लाब्ला... by आमोद शिंदे
आपला काय अनुभव आहे
त्यासाठी मोडकांशी नाही
In reply to आपला काय अनुभव आहे by आमोद शिंदे
बरीच माहीती आहे की तुम्हाला..
In reply to त्यासाठी मोडकांशी नाही by llपुण्याचे पेशवेll
बरं मग.
In reply to बरीच माहीती आहे की तुम्हाला.. by शिल्पा ब
घ्या टाळी
In reply to बरं मग. by llपुण्याचे पेशवेll
मग काय? कौतुक केलं एवढंच!!
In reply to बरं मग. by llपुण्याचे पेशवेll
खुलाशाबद्दल धन्यवाद.
In reply to मग काय? कौतुक केलं एवढंच!! by शिल्पा ब
=)) =)) =)) हा पुप्या
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद. by llपुण्याचे पेशवेll
येच बोल्ता है
In reply to =)) =)) =)) हा पुप्या by टारझन
>>>>आमची काय मोडकांशी ओळख
In reply to आपला काय अनुभव आहे by आमोद शिंदे
शुचि,
हम्मम
षडरीपू " काम क्रोध मोह लोभ
आर्ट ऑफ लीव्हिन्ग मध्ये