एगलेस केक
अंड्याशिवायच्या केकच्या पाककृती खूप जणांनी खव तून आणि धाग्यातून विचारल्या आहेत, बिनाअंड्याचा केक मी फारसा करत नाही.. त्यामुळे मी एगलेस केक करणार आणि फटू काढणार मग ती केकृ (केकच्या पाकृला आमच्यात केकृ म्हणतात,:) )मिपावर टाकणार.. ह्यात बराच काळ लोटेल आणि विचारणार्यांचा केक करण्याचा उत्साह निघून जाईल.. म्हणून केकृ देते आहे, संबंधितानी करुन पहावे आणि पुराव्यासाठी ह्या धाग्यावर फोटो टाकावेत. बिनाअंड्याच्या केकच्याही अनेक रेशिप्या आहेत, ह्या पाकृचा फोटो प्रतिसादात आला की (च) दुसरी पाकृ मिळेल.
सुरुवात सोप्या केकने करुया-
हा केक फार पटकन आणि छान होतो. शिवाय क्यालरी पण जरा बेतात आहेत..
साहित्य- १ वाटी मैदा, १ वाटी पिठीसाखर, पाऊण वाटी दही, १ च. चमचा बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ, १ च. चमचा कॉर्नफ्लोअर, ५ च.चमचे तेल, ५ च. चमचे पाणी, २-३ च. चमचे कोको पावडर (कोको फ्लेवर/चॉकलेट फ्लेवर नको असेल तर १ च. चमचा वॅनिला किवा आपल्या आवडीचा इसेन्स)
च. चमचा= चहाचा चमचा म्हणजेच टी स्पून आणि वाटी म्हणजे आमटीची वाटी..;)
(हे म्हणजे रुचिरा ष्टाइल झालं..)
कृती-
तेल + पाणी एका भांड्यात एकत्र करुन भरपूर फेटणे.
त्यात इसेन्स घालून फेटणे.(कोको घालणार असाल तर इसेन्स घालायची गरज नाही.)
दही घालून फेटणे. साखर घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर एकत्र करणे. कोको पावडर घालणार असाल तर तीही त्यात मिसळणे.
चॉकलेट फ्लेवर नको असेल तर कोको पावडर घालू नका, त्या ऐवजी आपण इसेन्स घातलेला आहेच.
हे म्हणजेच मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर +कोको पावडर (ऑप्शनल) वरील मिश्रणात घालून फेटणे.
सर्व वेळी फेटताना भरपूर फेटणे आवश्यक आहे हे आता वाचून वाचून तुम्हाला माहिती झाले आहेच .
१८० अंश से वर प्रिहिटेड अवन मध्ये साधारण ३० मिनिटे बेक करणे.
नेहमीप्रमाणेच -
केक झाला की नाही हे (त्याच्या)पोटात विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहणे.
केक झाला तरी लगेच अवन बाहेर न काढता अवनचे दार उघडून तसाच पाच मिनिटे राहू देणे.
नंतर जाळीवर काढणे, पूर्ण थंड झाला की स्लाइस करणे.
(केक जाळीवर काढला की आणि स्लाइस केले की - फोटो काढणे आणि ह्या धाग्यावर इतरांना जळवण्यासाठी टा़कणे व माझ्याकडून येणार्या पुढच्या बिनाफोटोच्या, बिनाअंड्याच्या रेशिपीची वाट पाहणे)
याद्या
6995
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
रुचिरा श्टाईल केक आवडला..
केक झाला की नाही हे
नाही..
In reply to केक झाला की नाही हे by नरेशकुमार
खर्जातल्या आवाजात ..
मस्त ग एकदम हाकेसरशी धावलीस
धन्यवाद
लय भारी. मी तेल्-पाणी घालून
कोक..
In reply to लय भारी. मी तेल्-पाणी घालून by प्राजु
आधी एगलेस केक
In reply to कोक.. by स्वाती दिनेश
एकदम ph.d
केक मध्ये पी एच डी
In reply to एकदम ph.d by कच्ची कैरी
मदत हवि
बेक
In reply to मदत हवि by धिन्गाना
अजुन एक..
In reply to बेक by स्वाती दिनेश
मदत