मीठावरच्या कराची कहाणी...
इंटरनेटवर भटकंती करत असतांना एक लेख वाचण्यात आला. सदर लेख आमचेच मित्र विशाल कुलकर्णी यांनी लिहीला आहे.
त्यातील काही अंश..
. लेख वाचावासा वाटला तर इथे क्लिक करा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !! भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो !!!!बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल. आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल. ही बागड त्यावेळच्या इनलँड कस्टम्स लाईन (Inland Customs Line) चा एक हिस्सा होती. त्याकाळी १८०३ साली ब्रिटीशांनी भारतातील मिठाचे स्मगलींग रोखण्यासाठी आणि मिठाच्या वाहतुकीवर टॅक्स आकारण्यासाठी म्हणुन तत्कालिन पंजाबपासुन (मुलतान :आताचे पाकिस्तान) ते थेट ओरीसा प्रांतातील सोनापूर या गावापर्यंत ही इनलॅंड कस्टम्स लाईन उभी केली होती. एकुण २५०० मैल (४००० किमी) लांबीची ही कस्टम्स लाईन म्हणजे भारतीयांच्या हक्कांवर आणि मुक्त व्यापार नीतीवर लागलेल्या बंधनाचे अवाढव्य असे मुर्त स्वरुप होते. त्या काळी या कस्टम्स लाईनची चीनच्या भिंतीशी देखील तुलना केली गेली. मिठाची चोरी करणार्या तस्करांना रोखण्यासाठी म्हणुन ब्रिटीशांनी ही कस्टम्स लाईन डेव्हलप केली. १८७२ पर्यंत इनलँड कस्टम्स डिपार्टमेंटने कस्टम ऑफिसर्स, जमादार आणि गस्त घालणारे सामान्य रक्षक असे जवळपास १४००० च्या आसपास लोक या कस्टम्स लाईन्सच्या संरक्षणासाठी म्हणुन तैनात केले होते. सन १८७९ मध्ये मिठाच्या आंतरदेशीय आयात्-निर्यातीवर टॅक्स लावला गेला जो सन १९४६ पर्यंत लागु होता. हाच मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा काढली होती जिचा उल्लेख पुढे येइलच
याद्या
2190
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल.
आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल. ही बागड त्यावेळच्या इनलँड कस्टम्स लाईन (Inland Customs Line) चा एक हिस्सा होती. त्याकाळी १८०३ साली ब्रिटीशांनी भारतातील मिठाचे स्मगलींग रोखण्यासाठी आणि मिठाच्या वाहतुकीवर टॅक्स आकारण्यासाठी म्हणुन तत्कालिन पंजाबपासुन (मुलतान :आताचे पाकिस्तान) ते थेट ओरीसा प्रांतातील सोनापूर या गावापर्यंत ही इनलॅंड कस्टम्स लाईन उभी केली होती. एकुण २५०० मैल (४००० किमी) लांबीची ही कस्टम्स लाईन म्हणजे भारतीयांच्या हक्कांवर आणि मुक्त व्यापार नीतीवर लागलेल्या बंधनाचे अवाढव्य असे मुर्त स्वरुप होते. त्या काळी या कस्टम्स लाईनची चीनच्या भिंतीशी देखील तुलना केली गेली. मिठाची चोरी करणार्या तस्करांना रोखण्यासाठी म्हणुन ब्रिटीशांनी ही कस्टम्स लाईन डेव्हलप केली. १८७२ पर्यंत इनलँड कस्टम्स डिपार्टमेंटने कस्टम ऑफिसर्स, जमादार आणि गस्त घालणारे सामान्य रक्षक असे जवळपास १४००० च्या आसपास लोक या कस्टम्स लाईन्सच्या संरक्षणासाठी म्हणुन तैनात केले होते. सन १८७९ मध्ये मिठाच्या आंतरदेशीय आयात्-निर्यातीवर टॅक्स लावला गेला जो सन १९४६ पर्यंत लागु होता. हाच मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा काढली होती जिचा उल्लेख पुढे येइलच
काही म्हणा, पण आज शुभेच्छा
ज्ञानात भर पडली
शीर्षकाने दिशाभूल झाली राव
विशाल.. जबरदस्त!! खूप सुंदर
विशेष लेख!!!
असुराच्या मताशी सहमत आहे.
In reply to विशेष लेख!!! by असुर
अॅलन ह्युम ....
In reply to विशेष लेख!!! by असुर
यावर दिवाळी अंकात सविस्तर लेख