थत्त्यांचा प्रहार
आमचे परम मित्र नितीन थत्ते हे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतात त्याचबरोबर आपली मते निर्भीडपणे मांडत असतात. त्यांचा आम्हाला आवडणारा गुण म्हणजे जे बरोबर असेल त्याला सहमती देतांना ते मागेपुढे पहात नाहीत.
त्यांच्या मतांचा उल्लेख करत प्रजासत्ताक दिना संबंधी मागील वर्षी काय चर्चा ब्लॉगधारकांमधे झाली होती याचा गोषवारा दैनिक प्रहारने दिला आहे. यात मिसळपावचा उल्लेख आहेच
बघा काय म्हटले आहे
मिसळपाव’ हा काही रूढार्थाने ‘अनुदिनी’सारखा ब्लॉग (एकेकटय़ाचा असतो तसा) नव्हे. तो चर्चा-कट्टा आहे. त्या ‘चर्चा’मध्ये भाग घेणं आणि चर्चा सुरू करणं, ही दोन्ही कामं जो करतो, तो केवळ ब्लॉगलेखक या अर्थानं ब्लॉगर नसतो तर संघटितपणावर विश्वास असणारा तो ‘नेटवर्क-ब्लॉगर’ असतो. नितीन थत्ते हे असे एक नेटवर्क ब्लॉगर आहेत. इतरांनी सुरू केलेल्या अनेक चर्चा पुढे नेण्यासाठी त्यांनी मांडलेले अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरले, असं त्या-त्या चर्चातल्या पुढल्या प्रतिक्रिया सांगतात! तर, नितीन थत्ते यांनी 2009च्या 25 जानेवारीला एक चर्चा सुरूच करून दिली. ‘प्रजासत्ताक दिन’. बुद्धिप्रामाण्यवादी आणि लोकशाहीवादी थत्ते यांचे शब्द असे : ..कैक वेळा माणूस चांगला आहे म्हणून आपण आपल्याला धोरणे मान्य नसलेल्या पक्षाला मत देतो. कधी धोरण चांगले म्हणून वाईट माणूस निवडतो. कधी माणूस चांगला म्हणून वाईट पक्ष निवडतो. जे काही करतो ते आपणच करतो. हीच तर लोकशाही. (येथे कोणी गठ्ठय़ाने मतदान करतात म्हणून शोक करायचे कारण नाही. ठाण्याच्या मतमोजणीत डोंबिवलीची मते मोजणीस येतात तेव्हा चित्र पालटते. गठ्ठय़ाने मते सगळेच देतात) लोकशाहीत आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी असते. एकदा हुकूमशाही स्वीकारली (?) की ती संधी केव्हा मिळेल हे सांगता यायचे नाही. इतके स्वच्छ आणि स्पष्ट विचार ब्लॉगस्फिअरमध्ये कुठल्याही भाषेत आढळतात, तेव्हा आपण वाचतो आहोत याचं बरं वाटतं. पण प्रत्येकदा तसं होईलच असं नाही. मग वाचक म्हणून आपल्याला वेगळा मार्ग शोधावा लागतो, बरं वाटण्याचा..(ठळक ठसा माझा) विस्तृत लेख इथे वाचता येईल - http://www.prahaar.in/collag/blogark/36005.html मिसळ पाव परिवार आणि थत्तेचाचा यांचे अभिनंदन :)
प्रतिक्रिया
अभिनंदन
+१
हेच म्हणतो
+
विजय असो!
त्रिवार
हर्दिक अभिनंदन
वा!!
श्री प्रियाली, श्री चित्रा ?
हाहा
अच्छा
वास्तविक
भेट
मग तर
तसं नाही
समानता
बहुदा
श्रीमती ??? जौंद्या राव नकोच
विकास साहेब राहिले की!
अभिनंदन
थत्तेकाकांचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन ...
समीक्षा नेटके
थत्तेकाकांचे हार्दिक
थत्तेचाचांचे अभिनंदन आणि
अरे वा..
आनंद जाहला.
श्री. नितिन थत्ते यांचे
श्री. नितिन थत्ते यांचे
दरारा....!!
अगदी अगदी. तुमच्यासारख्या
जे बरोबर असेल त्याला सहमती
अभिनंदन
अभिनंदन!
धन्यवाद
वा
थत्ते इफेक्ट !!
अभिनंदन
प्रहार
अभिनंदन!
अभिनंदन!!